Tuesday, March 28, 2017

दुर्गाडी किल्ला ( Durgadi fort )


नमस्कार मित्रांनो .कालच दुर्गाडी किल्ल्यावर जाउन दुर्गादेवीच दर्शन घेऊन आलो.कल्याणमध्ये असलेला दुर्गाडी किल्ला म्हणजे ऐतिहासिक कल्याण शहराचा एक मानाचा तुरा . भारतीय आरमाराचे जन्मदाते छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचा आरमाराची सुरवात ह्याच दुर्गाडी किल्ल्या पासून केली .किल्यावर पाहण्यासारखं जास्त काही नाही आहे .कड़ी शेजारी असलेल्या छोट्याशा टेकडीवर हा किल्ला बांधला आहे. संपूर्ण किल्याचा जीणोर्द्वारा करण्यात आला आहे पण पुरातन विभागाने बांधकाम करताना त्याचे पुरातन ऐतिहासिक बांधकामाचं थोडी हि काळजी न घेता बांधकाम केलं आहे .  त्यामुळे किल्याचा मूळ बांधकाम संपूर्णपणे नाहीस झालं आहे . 
गणेश दरवाजा जवळच गणपति मंदिर 
गणेश दरवाजा
किल्ला हा मुख्य रस्त्याला लागूनच आहे . आपण प्रवेश करताना दरवाजा लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा दरवाजा शेजारीच गणपतीच छोटस मंदिर लागत . पुढे किल्याला एकूण ४ बुरुज लागतात . मंदिराची तटबंधी बऱ्यापैकी शाबूद आहे . गडावरून आपण भिवंडीची खाडी पाहू शकतो . 
किल्यावरचे बुरुज 
किल्याची पुरातन विभागाने केलेली डागडुजी 


किल्याचा इतिहास असा कि १६५४ साली महाराजांनी भिवंडी आणि ठाणे अदिलशाहीकडून जिंकून घेतली आणि महाराजनी भिवंडीच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी  शेजारील टेकडीवर किल्ला बांधायला घेतला . किल्याचा पाया खोदताना तेथे अमाप संपत्ती सापडली हि सर्व भवानी दुर्गा देवीची कृपा समजून महाराजांनी किल्ल्यावरच दुर्गा माताच मंदिर बांधून किल्ल्याच नामकरण दुर्गाडी किल्ला असं केल. 
दुर्गा माता ची सुन्दर मूर्ति




किल्ल्यावरचे मंदिर सुंदर आहे . उभी असलेली दुर्गामातेची मूर्ती सुंदर आणि मनमोहळं आहे त्याचा सुंदर चांदीचा गाभारा गुरुदेव हॉटेलचे मालकांनी  त्याचा जीणोर्द्धार केलाय . मूर्तीचा उजव्या बाजूस गणेशाची आणि डाव्या बाजूस अजून एका दुर्गा मातेची
मनमोहक मूर्ती आहेत . मंदिराचा  गोल घुमट  आहे . मंदिरावर नेहमीच भक्ताची ये जा असते . मंदिरावर नेहमीच सर्व मराठी सण साजरे केले जातात  विशेषकरून दसरा , नवरात्रउत्सव , शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते . नवरात्रीच्या वेळी मोती जत्रा भरते . 





आम्ही गेलो तेव्हा गुडीपाडवा निमित्त मंदिराची सजावट सुरु होती . मंदिराचा पाठी मागे बरीच मोकळी जागा आहे याच जागे मध्ये महाराजांनी त्याचा मुस्लिम सॆन्यासाठी मशीद बांधली आहे .रमजान मध्ये येते नामजपठण केले जाते .  मशिदीचे आता फक्त काही अवशेषच शिल्लक आहेत. 
दुर्गा मातेचे मंदिर
महाराजांनी बांधलेलं मशीद


किल्यावर जाण्यासाठी कल्याण स्थानकातून बस किंवा रिक्षाने अगदी १० ते १५ मिनटात जाऊ शकतो .भिवंडी कडे जाणारी रिक्षा पकडावी किल्याकडे जाताना काही जुने बांधकाम असलेल्या इमारती लागतात . किल्याचा पायथ्याशी भारतीय आरमाराचे जनक श्री छत्रपती महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारला आहे . 


तर मित्रानो अशा दुर्गाडी किल्याला नक्की भेट देऊ शकता . 



3 comments: