जलदुर्ग आणि भुईकोट या दोन्ही प्रकारात मोडणार वसईचा किल्ला ,पश्चिम रेल्वे स्टेशनचा वसई जवळच असणारा हा किल्ला आजही मराठयांच्या चिमाजी आप्पा यांचा पराक्रमाची साक्ष आजही देत उभा आहे . सकाळी डोंबिवली वरून मी ,लहू आणि तन्मयने ५. ३३ वाजता सुटणारी डोंबिवली ते विरार ट्रेन पकडून थेट वसई गाठले आणि पुढे मग वसई महानगरपालिकेचा १०५ नंबरच्या बसने किल्लाबंदर स्थानकावर उतरलो , १५मिनीटांच्या प्रवासानंतर बस आपणाला थेट किल्याचा आत मध्ये घेऊन जाते .
मुख्य कोरीव दरवाजा |
गडाचा विस्तार हा खूपच मोठा आहे संपूर्ण गड फिरावयास आपणास साधारण २ते २. ३० तास लागतात .किल्ला पाहण्यास कुठून सुरवात करावी हे आम्हांला कळत नव्हते म्हणून एका रिक्षा वाल्यास
विचारल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे मुख्य दरवाजा पासून आम्ही सुरवात
केली. दरवाजातून आत गेल्यावर आपणाला पायऱ्या लागतात यातूनवर तटबंदीवर गेल्यास आपणाला गडाचा संपूर्ण परिसर पाहावयास भेटतो ,तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे . किल्याला एकूण दहा बुरुज आहेत त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदियाम रैस मागो, सेंट गोंसोले चौथा
माद्रद दीय. चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत. पाचवा सेंट जॉन,
या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे. येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे. सहावा
एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि
दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज. किल्ल्यामध्ये एकूण तीन चर्च आहेत .
किल्याचे प्रत्येक भाग पाहताना आपणास किल्ले बांधणाऱयांचे कौतुक करावेसे वाटते आणि आश्चर्य वाटत . गडावरच्या आतमधला परिसर विस्तीर्ण आहे यात एक विहीर आहे ,आतमध्ये एक आपणास तळे आणि दोन विहिरीसारखे चौकोनी अवशेष असलेला चौथरा आहे. आम्ही एका चर्चसारखया इमारतीजवळ पोहचलो येथे आपणास एक बुरुज लागतो या बुरुजाच्या पायऱ्या सुस्थतीत असल्यामुळे आपण बुरुजाच्या शेवट्पर्यंत जाऊ शकतो . आम्ही वरती पोहचलो येथून दिसणारा समुद्र किनारयाचा नजारा अप्रतिम दिसतो आणि आपण किल्याचा संपूर्ण परिसरहि पाहू शकतो . या बुरजामुळे समुद्रामधून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवले जात असे . किल्याचे बांधकाम हे रोमन स्थापकलेचा वापर करून बांधलेलं आहे .एखाद्या चर्च प्रमाणे यातील इमारतींचे बांधकाम केलेले आहे . सण १४१४ साली मध्य भंडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा किल्ला बांधला पुढे पोर्तुगिजाने हा किल्ला जिंकून याचे बरेचसे पुनर्बांधकाम केले ,दहा वर्षाच्या कालावधीत त्यानी हे बांधकाम पूर्ण केले
किल्याच्या आतील तळ आणि सुंदर इमारतींचे अवशेष |
जवळपास आम्ही संपूर्ण किल्ला पाहून झाल्यावर आम्ही किल्यामधल्या पेशवेकालीन वज्राई देवीच्या मंदिरात पोहचलो . चिमाजी अप्पा यांनीया देवीला नवस केला होता कि आम्ही हा किल्ला जिंकलो कि यामंदिराचा जीर्णोद्धार करू ,मग चिमाजी अप्पानी हा किल्ला जिंकला आणि चिमाजी अप्पा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला .
आम्ही मंदिरात पोहचलो तेव्हा मंदिराचे पुजारी देवीस वस्त्र नेसवत होते ,त्या मुळे आम्हला देवीचं दर्शन घेता आले नाही ,आम्ही बाजुचा नागेश्वर मंदिरात शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले . मंदिराच्या गाभऱ्यात शंकराची पिंडी आहे घाबरायचं चौकटी वर आपणास गणेशाची मूर्ती कोरली आहे ,मंदिराच्या एका बाजूच्या भिंतीवर गणेशाची रिद्धी सिद्धी ची मूर्ती आणि एका बाजूस देवीची मूर्ती कोरली आहे . पिंडीच्या समोर महादेवाच्या नंदीची सुबक मूर्ती आणि दगडात कोरलेला कासव आहे .
टेहळणी बुरुज |
बराच वेळ मंदिराच्या शांत परिसरात वेळ घालवल्या नंतर आम्ही किल्ल्याचा दर्या दरवाजाकडे निघालो दरवाजाचे बुरुज अजूनही सुस्थतीत आहेत ,पण लाखडी दरवाजा हा मोडकलेल्या अवस्थेत आहे . येथून पुढे समोर चालत गेल्यावर आपण समुद्राच्या बंदरावर जाऊन पोचतो ,किनाऱयावर मच्छिमार कोळि लोकांची लगबग चालू होती . थोडावेळ येथे फिरून आम्ही चिमाजी अप्पांच्या वाड्याकडे निघालो.चिमाजी अप्पांच्या वाड्यामध्येच पुरात्तव विभागाने हे स्मारक बांधले आहे . बाजूलाच चिमाजी अप्पांचा वाड्याचे अवशेष लागतात . वाडा खूप मोठा आहे . वाड्याचा आणि सुपूर्ण किल्ल्यामध्ये ताडीची झाडे खूप आहेत .या परिसरात फिरताना आपणास चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही .
इ. स १७३७ साली मराठयांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसला मग पुढे बाजीराव पेशव्यांनी हि मोहीम चिमाजी अप्पांवर सोपवली १७३८ साली चिमाजी अप्पानी मोहीम आखली . चिमाजी अप्पानी किल्याचा दलदलीच्या बाजूनी हल्ला करावयाचे ठरवले ,तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सेन्य हरहर महादेव करत आत शिरले , दोन दिवस चालेल्या या पोर्तुगाच्या विरुद्धचा लढाईत पोर्तुनगांचे ८०० जण मारले गेले , मराठयांची हि बरीच हानी झाली . पोर्तुगाचं दारुगोळा संपला आणि ते मराठांशी शरण आले ,मराठ्यनी बायकापोरांना सुखरूप बाहेर जाऊ दिले ,आणि मराठ्यांनी किल्ला सर केला भगवा फडकला .
इ. स १७३७ साली मराठयांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसला मग पुढे बाजीराव पेशव्यांनी हि मोहीम चिमाजी अप्पांवर सोपवली १७३८ साली चिमाजी अप्पानी मोहीम आखली . चिमाजी अप्पानी किल्याचा दलदलीच्या बाजूनी हल्ला करावयाचे ठरवले ,तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सेन्य हरहर महादेव करत आत शिरले , दोन दिवस चालेल्या या पोर्तुगाच्या विरुद्धचा लढाईत पोर्तुनगांचे ८०० जण मारले गेले , मराठयांची हि बरीच हानी झाली . पोर्तुगाचं दारुगोळा संपला आणि ते मराठांशी शरण आले ,मराठ्यनी बायकापोरांना सुखरूप बाहेर जाऊ दिले ,आणि मराठ्यांनी किल्ला सर केला भगवा फडकला .
नरवीर चिमाजी अप्पा स्मारक |
बराच वेळ किल्यावर भटकंती केल्यावर आम्ही पुन्हा बस पकडून वसई स्टेशन वर पोहचलो आणि मग ,विरार -कोपर ट्रेनने मुंबई गाठली .
किल्याची सद्याची परिस्थिती :
स्वान्त्र्यनंतर या किल्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही ,किल्यावर माजलेले रान आणि मोठमोठी झाडे या मुळे किल्याचे बुरुज ठसलेल्या अवस्थेत आहेत , सद्य पुरात्तव विभागाने या किल्याचे डागडुगीचे काम हाती घेतले आहे ,किल्यावर सध्या प्री -वेडींग फोटोग्राफी करणाऱ्या जोडप्यांचा फारच सुळसुळाट असतो . सोबत येणारे प्रेमी जोडपे यामुळे आणि त्याचा वावर या मुळे आपण किल्याचा पराक्रम विसरत चालो आहोत एवढे मात्र नक्की .
पुरातर्न विभागाने याकडे लक्ष देऊन किल्याचे ऐतिहासिक महत्व राखण्यासाठी जागोजागी माहिती फलक लावले पाहिजे . आणि प्री वेडिंग फोटोग्राफी वाल्याकडून पैसे चार्जे करून त्याचा उपयोग किल्याचा डागडुजी साठी करावा हीच अपेक्षा .
संधर्भ : https://mr.wikipedia.org
आपल्या चॅनेल वरील वसईचा किल्ला वलॉंग नक्की पहा.
धन्यवाद !
अंकुश सावंत.
+९१ ९७६८१५३११४