ऑफिसला जाताना यूट्यूब वर विडियो बघत होतो महाराष्ट्रातील मूल मुली गड किल्यांना भेट का देतात ? त्याची आपल्या तरुण मंडळी कडून मिळालेली काही भन्नाट उत्तरे होती "मजा मस्ती करण्यासाठी , फोटोशूट करण्यासाठी. पाच सहा जणांच्या ग्रुपला विचारून सुद्धा तेच उत्तर मिळालं .आता पुढचा प्रश्न होता गडावर जाण्याअगोदर कित्ती जणांना त्याचा इतिहास माहित असतो. कोणाचेच उत्तर" हो "असे नव्हते.सह्यांद्री आणि त्यावरचे गड म्हणजे महाराष्ट्राचं वैभवशाली इतिहास आणि सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट .अशा गड किल्यांवर फक्त फोटोशूट आणि मजा मस्ती करण्यासाठी जावे ?
रायगडावरची महाराजांची समाधी . |
प्रत्येक गड किल्यांना स्वतःचा असा इतिहास आहे आपल्या महाराजांच्या पाऊलाने प्रत्येक गड पावन झाला आहे . गड किल्यांना भेट देण्याअगोदर आपण त्याचा थोडासा इतिहास जाणून नंतर भेट दिलीकि प्रत्येक ऐतिहासिक वास्तु बघताना त्याचा इतिहास आपल्या डोळयांसमोर येतो .
किल्यांना भेटणं म्हणजे फक्त चढण आणि उतरन नाहीतर त्यांचं शौर्य आणि इतिहास अनुभवन. डोळ्यात साठवता येत नसेल तरी सह्यन्द्रीचं रौद्र रूप डोळ्यात साठवण्याचा केविलवानी प्रयत्न करने, वाटेतच पिंजऱ्यातील पक्षी मुक्तपणे विहार करताना पाहणे.
गड किल्यांना पावसाळ्यात भेट देण्यात खरी मज्जा आहे. पावसाळ्यात सह्यांद्रीवर सफर म्हणजे दाट धुक्यातून स्वर्गात गेलेल्याचा अनुभव. हजारो फुटांवरून स्वतःला मातीच्या ओढीने झोकून देणारे पांढरेशुब्र धबधबे त्याच्यात भिजण्याचा आनंद तो शब्दात सांगणे खरेच कठीणच .हिरवीगार शाल ओढलेल्या सह्यन्द्रीवर चालण्याची मज्जा काही औरच असते .
ट्रेकिंग म्हणजे एक ध्यय गाठण्यासाठी केलेली धडपड जे आपणाला पार करायचं मगते पार करण्यासाठी आपन उन्हं , भूक , पाऊस याची तमा न बाळगता प्रयत्न करतो.आपली पावले झपाझप टाकायची पालापाचोळा तुडवत चालायचं. मधीच सावली भेटेल थिते विश्राम करून आईने दिलेल्या भाकरी आणि चटणी खाऊन भूक भागवून परत आपल्या ध्येयाकडे वाट चाल सुरु करायची.रोजच्या जगण्यात आणि यात खरच साम्य आहे .सह्यांद्री आणि त्याचा निसर्ग म्हणजे अशी एक शाळा जो पुस्तका वाचून बरेच काही शिकवतो. भूगोल ,इतिहास ,रानातले प्राणी , पक्षी,आणि बोलीभाषा आणि मनाला हि सुखावतो

हिरवीगार शाल पांघरलेला सह्यांद्री |

सह्यांद्री जेव्हा बापाच्या मायेप्रमाणे आपनाला अंगाखांद्यावर खेळवतो तेव्हडाच आपण अतिसाहस , गैरवर्तन केलं कीत्याच रोद्र रूप हि दाखवतो म्हणूनच आपण निसर्गाशी जवळीक साधताना आपण त्याला दुखावत तर नाही आहोत नायाच भान राखलं पाहिजे .
गड किल्यांना भेट दिल्यानंतर त्याला कुठलीही जखम न देता त्याची काळजी घेणं हि छत्रपती महाराजांनीआपणाला दिलेली एक जबाबदारी आहे याच भान राखावं .असच काही मोलाचं काम "रानवाटा" हि स्वप्नील पवार यातरुणाने चालूं केलेली संस्था करतेय आणि जीवन कदम हा एक मराठी तरुण आपल्या विडिओ मधून गड किल्यांना घराघरात पोचवतोय. आपण हि आपल्या वागण्यातून थोडासा हातभार लावू शकतो .
गड किल्यांवर जाऊन आवाज गोंधळ करणं टाळावं , गडावर जाऊन दारू आणि सिगारेटचे धूर यांनी आपण तिथले सोंदर्य ऐतिहासिक वस्तूंचा अपमान करतोय याच थोडं तरी भान बाळगावं. अशीच वाईट प्रवृत्तीची माणसे दिसली तरत्यांना विरोध करावा आणि गड किल्ले हे एक पिकनिक स्पॉट नसून महाराष्ट्राला लाभलेला एक इतिहास आहे याच सर्वानी भान ठेवणं हि सद्याची गरज आहे .
गैर वर्तन टाळा , गड किल्यांची निगा राख स्वछ्तेच भान ठेवूया आणि वर्षभर अशीच भटकंती चालू ठेवूया .चला तर मग पुन्हा एकदा सह्यांद्री मधून हर हर महादेव जय शिवराय चा नाद घुमू दे.

हरीचंद्र गडावर रानवाटा टीमने भरवलेलं दारूच्या बाटल्यांचा अनोखं प्रदर्शन |
गड किल्यांवर जाऊन आवाज गोंधळ करणं टाळावं , गडावर जाऊन दारू आणि सिगारेटचे धूर यांनी आपण तिथले सोंदर्य ऐतिहासिक वस्तूंचा अपमान करतोय याच थोडं तरी भान बाळगावं. अशीच वाईट प्रवृत्तीची माणसे दिसली तरत्यांना विरोध करावा आणि गड किल्ले हे एक पिकनिक स्पॉट नसून महाराष्ट्राला लाभलेला एक इतिहास आहे याच सर्वानी भान ठेवणं हि सद्याची गरज आहे .
गैर वर्तन टाळा , गड किल्यांची निगा राख स्वछ्तेच भान ठेवूया आणि वर्षभर अशीच भटकंती चालू ठेवूया .चला तर मग पुन्हा एकदा सह्यांद्री मधून हर हर महादेव जय शिवराय चा नाद घुमू दे.
"भीती न अम्हां तुझी मुळीहि गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा"