Tuesday, February 7, 2017

ऐतिहासिक जुन्या मुंबईतले किल्ले (Historic Old Forts of Mumbai )


नमस्कार मित्रांनो.जीवन कदम यांचा युट्यूबवर मुंबईतले अभिनज्ञ किल्ले हा विडिओ बघतला ती माहिती  ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न. महाराष्ट्र आणि गड  किल्यांचं अतूट नातं . श्री छत्रपती दुर्गपती शिवाजी महाराजांनी बुलंद असे किल्ले उभे केले आणि ब्रिटिशकाळामध्ये असेच काही किल्ले इंग्रज आणि पोर्तुगीजांनी उभारले . सध्या ह्या किल्ल्यांची परिस्थिती तशी वाईटच आहे . महाराष्ट्र पर्यटन आणि पुरातन विभागाने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे . सर्वच किल्ले हे भेट देण्याचा परिस्थिती मध्य नाहीत पण काही केल्यानं आपण आताहि नक्की भेट देऊ शकतो . स्वतःच वाहन असेल तर बहुतेक किल्ले एकेदिवशी नक्की करू शकतो .

सायन फोर्ट (Sion fort ):
 सायन फोर्ट हा सायन स्टेशन पूर्वकडून  ५ मिनिटाच्या अंतरावर आहे . याला "सायन हिललोक फोर्ट" असं पण बोल जातो .हा किल्ला ब्रिटिशांनी १६६९ साली बांधला आहे मुख्यता  हा किल्ला टेहळणी करण्यासाठी बांधलेला आहे . किल्ल्याच बांधकाम दगडी आहे काहीस बांधकामात थोडस वेगळपण जाणवत. सायन ला गेल्यावर एकदा तरी नक्की भेट देऊ शकतो .
सायन  फोर्ट 
बांद्रा फोर्ट (Bandra fort):
बांद्रा  स्टेशन ला उतरून पश्चिमेकडून "बांद्रा बॅण्ड स्टेण्ड" ला जावून "ताज लँड हॉटेलच्या" पुढेच बांद्रयाचा ऐतिहासिक किल्ला उभा आहे १९४० साली पोर्तुगीजांनी बांधला . पोर्तुगांच्या  काळात खाडी मार्गे दळण वळण चालायची म्हणून याला विशेष महत्व होत . आहे बांद्रा किल्याची पुरात्तन विभागाने दुरुस्ती केली आहे प्रवेशद्वारी पोर्तुगाल लिपीत शिलालेख आहे किल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत , किल्याचे काहीच अवशेष उरले आहेत


बांद्रा किल्ला 
 वर्सोवा किल्ला  (Madh fort):
मठ आयलंड या छोटयाशा टेकडीवर हा किल्ला वसला आहे . वर्सोवा गाव आणि मठ बेट यांच्यामध्ये असलेल्या खाडीच्या मुखावर हा किल्ला १६०० साली पोर्तुगीजांनी बांधला आहे . मार्वे खाडीवर नजर ठेवण्यासाठी किल्याचा उपयोग केला जाई . किल्ला सुस्थती  आहे किल्याची बुरुज  आणि तटबंधी शाबूत आहे किल्ला  तिनी बाजूनी जमिनेने वेढला असून एका बाजूस अरबी समुद्र आहे .किल्याचा अरबी समुद्र बाजूला " चोर दरवाजा " आहे . मालाड स्टेशनवरून १५ किलोमीटर अंतरावर वर्सोवा किल्यावर जाता येत बसच्या शेवटचा स्थानकावर उतरून महादेव मंदिराकडे गेलं कि आपण किल्याच्या मागचा बाजूस पोहचतो .किल्या सशस्त्र दलाचा ताब्यात असल्यामुळे परगावानी शिवाय आपण आतून किल्ला पाहू शकत नाही छायाचित्रणास मनाई आहे .
मढ फोर्ट 

माहीम फोर्ट(Mahim fort ):
११४० मध्ये प्रतापबिंब राजाने माहिमचा किल्ला बांधला आणि आपली राजधानी हि तिथेच बांधली पुढे हा किल्ला इंग्रजांचा ताब्यात आल्यावर इंग्रजांनी हा किल्ला नव्याने बांधला १६७२ साली पोर्तुगीजांनी ह्या किल्यावर हल्ला केला पण त्यांना विजय मिळवता आलं नाही पुढे १६८९ साली जंजीऱयांचा सिद्धी याकूबने किल्ला जिंकला आणि पुढे परत इंग्रजांनी हा किल्ला जिंकला . माहीम ला उतरून "मोरी रोडने" समुद्र किनाऱ्याकडे चालत गेल्यास १० मिनिटात किल्यावर पोहचता येत . 
माहीम किल्ला 

वरळी फोर्ट(worli fort ):
विकिपीडिया मध्य अशी माहिती मिळते कि हा किल्ला ब्रिटिशांनी बांधला आहे आणि काही ठिकाणी हा किल्ला पोर्तुगीजांनी १६७५ मध्य बांधलाय असा उल्लेख आढळतो .पुढे हा किल्ला फ्रान्स सोबत युद्धात ब्रिटिशांनी जिंकलाय अशी माहिती मिळते . सध्या हा किल्ला " भारतीय पुरातवावं सर्वक्षण अंतर्गत आहे . सधया कोणी काळजी घेत नसल्या मुळे  मोडकळीच्या स्तिथीत आहे . दादर स्टेशन वरून टॅक्सी करून आपण वरळी फोर्ट ला जाऊ शकतो २० मिनटात अंतर आहे . सी लिंक , नेहरू ससान्स सेन्टर  आणि प्लॅनेटरीम हे किल्याचा जवळचे काही आकर्षण आहे
वरळी किल्ला 
शिवडी फोर्ट(Shiwari fort):
शिवडी फोर्ट हा १६८० मध्य ब्रिटिशांनी बांधला आहे.  १९७० च्या काळात हा किल्ला मुंबई पोर्ट च्या ताब्यात देण्यात आला पुढे हा किल्ला गोडाऊन म्हणून वापरू लागले पुढे एम. पी. टी द्वारे त्याला वसाहती मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आला पण काही स्थानिक कार्यकर्त्यानी विरोध केला आणि  तेव्हापासून एक ऐतिहासिक स्मारक आणि मुंबईतील पर्यटन स्थळ मध्ये रूपांतर झालं . सध्याची किल्ल्याची परिस्थिती मोडकळीस आली आहे . ह्या किल्याला हजारो फ्लीमिंगो पक्षी येतात तेव्हा आपण नक्की भेट देऊ शकतो. हार्बर लाईन वरून शिवरी स्थानकापासून १५ मिनीटांच्या अंतरावर आहे . कोलगेट पालमौलीन फॅक्टरीचा जवळचा हा किल्ला आहे.
शिवडी फोर्ट 


काळा किल्ला (Kala fort):
१७३७ मध्ये हा किल्ला मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड ओंजीआर ह्याने मिठी नदी काठी बांधला हा किल्ला काळ्या दगडात बांधला गेला असल्यामुळे काळा  किल्ला म्हणून संबंधील जातो . जगप्रसिद्ध धारावी झोपडपट्टीचा वस्तीत हा किल्ला  आहे . किल्ल्याचा आत जाण्यासाठी ८ फूट भिंत चडून जावं लागत . किल्याची फारच दुरावस्था झाली आहे . आतील भाग पूर्णपणे कचऱ्याने भरलेला आहे . साइन रेल्वेस्थानकेचा पश्चिमेस "साइन बांद्रा" रोडवरून चालत गेल्यावर "ओ. अन. जी सि बिल्डींगच्या" अलीकडे उजव्या हातास काळाकिल्ला गल्ली लागते या गल्ली च्या टोकाला किल्ला लागतो .
काळा किल्ला 
वरचे काही किल्ले विडोये रूपात पाहण्यासाठी खालील जीवन कदम याचा Channelला नक्की भेटदया .