ह्या
वर्षी सूर्यनारायणांनी दिलेल्या अति त्रासामुळे गोरखगडा
नंतर कुठे ट्रेकिंगला जाऊ
शकलो नव्हतो बऱ्याच दिवस कलावंतीण माची
करायची मनात होत पण
बातम्या बघताना प्रभळगडावर एका महिलाट्रेकर्सचा झालेला मृत्य, यामुळे मनात प्रबळगड आणि
कलावंतीण माची करायची कि नाही अशी
चल बिचल चालू होती
आणि त्यात ऑफिस आणि घराच्या
जबाबदाऱ्या, प्लान बनत होते फसत
होते. पण आता मात्र
पाऊसाची चाहूल लागली आणि ऑफिस मध्ये सोबती
समीर आणि आपले नवीन
मित्रांनी कलावंतीण चा प्लॅन फिक्स
केला.
समीर ,महेंद्र ,तन्मय आणि प्रवीण आणि मी असे ५जणांचा ग्रुप बनला . शनिवार, रविवार सुट्टी असल्याने शनिवारचा दिवस फिक्स झाला . प्लान एक आठवड्या आदीच बनला असल्याने कलावंतीण माचीची नेहमी प्रमाणेच माहिती मिळवायला सुरवात झाली . कुठल्याही ठिकाणाची अचूक माहिती मिळवण्याचं ठिकाण म्हणजे तिथे जाऊन आलेलया भटक्यांनी लिहलेले ब्लॉग्स . मग आठवडाभर असेच ब्लॉग्स वाचून बऱ्यापैकी माहिती मिळाली . आणि आपला माही ( महेंद्र) याने तर दोन वेळा कलावंतीण सर केलेला.. मग आता तर काही काळजी करण्याचं कारणच नव्हतं .शुक्रवारी ऑफिस मध्ये ट्रेनच नियोजन करून पनवेलला ठीक ७ वाजता भेटायच ठरलं.. समीर , माही सोबत प्रवीण येणार होता आणि मी आणि तन्मय आम्ही कल्याण डोंबिवली कर एकत्र येणार होतो .
समीर ,महेंद्र ,तन्मय आणि प्रवीण आणि मी असे ५जणांचा ग्रुप बनला . शनिवार, रविवार सुट्टी असल्याने शनिवारचा दिवस फिक्स झाला . प्लान एक आठवड्या आदीच बनला असल्याने कलावंतीण माचीची नेहमी प्रमाणेच माहिती मिळवायला सुरवात झाली . कुठल्याही ठिकाणाची अचूक माहिती मिळवण्याचं ठिकाण म्हणजे तिथे जाऊन आलेलया भटक्यांनी लिहलेले ब्लॉग्स . मग आठवडाभर असेच ब्लॉग्स वाचून बऱ्यापैकी माहिती मिळाली . आणि आपला माही ( महेंद्र) याने तर दोन वेळा कलावंतीण सर केलेला.. मग आता तर काही काळजी करण्याचं कारणच नव्हतं .शुक्रवारी ऑफिस मध्ये ट्रेनच नियोजन करून पनवेलला ठीक ७ वाजता भेटायच ठरलं.. समीर , माही सोबत प्रवीण येणार होता आणि मी आणि तन्मय आम्ही कल्याण डोंबिवली कर एकत्र येणार होतो .
कलावंती आणि प्रबळगडची डोंगररांग |
सकाळी
पहाटेच उठून गरमगरम चहा
पोटात टाकला आणि फक्त पाण्यानी
भरलेली बॅग अडकवून मोहिमेला
सुरवात केली . यावेळी आईला भाकऱ्या बनवण्यापासून थोडा आरामच दिला. शनिवार असल्याने ट्रेन मधला गर्दीचा पूर
बऱ्यापैकी खाली होता . ट्रेनच
टाईमिंग अगदी उत्तम जुळून
आल्यानं बरोबर ७:१५ वाजता
सर्व पनवेल ला भेटलो .सर्वांची
ओळख समीर ने माही
सोबत करून दिली . माही
ने यापूर्वी सुद्धा कलावंतीण केलेली असल्याने सर्व ट्रेकची जबाबदारी
त्याचाकडे होती .बाप्पाचं नाव घेऊन मग आमचे आजचे गाईड
महेंद्र यांच्या सोबत बसडेपोकडे प्रस्थान
केले.
सकाळचे
जेमतेम साडेसात वाजलेले तरी हि सूर्यनारायण
चांगलाच त्रास देत होता , पंधरा
मिनिटांच्या पायपिटी नंतर आम्ही पनवेल
बस डेपोत पोहचलो . उन्हाने चांगलाच घामटा काढला आता मात्र सूर्यनारायण
अशीच आग ओतत राहिले
तर ट्रेकिंग अवघड होईल याची
काळजी वाटत होती .
आपल वेगळं पण राखून ठेवलेलं झाड . |
नागमोडी
वाट गावातून जाते गावाचं बऱयापैकी
शहरीकरण झालेलं लांबून आम्हला प्रबळगडाची रांग दिसत होती
वातावरण पूर्णपणे पाऊसप्रमेने मळवट झालेलं ओल्या
मातीचा सुगंध.. ! ऑटो वाल्यानी काकांनी
सांगितलं काल जोरदार पाऊस पूर्ण रात्रभरझालेला
.ट्रेकिंग साठी उत्तमअस वातावरण
झालं होतं दोन ते तीन
किलोमीटर अंतर पार झाल्या
नंतर ऑटो वाल्या काकांनी
थेट आम्हला जंगलाचा पायथयशी आणून सोडलं . काकांचे
धन्यवाद मानून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला...
सुरवातीपासूनच गावातल्या मंडळींनी दगडांवर बाणच निशाण करून मार्ग सोपा केला आहे .त्यालाच फोल्लो करत जवळपास
30 मिनटं चालून झाल्यावर मात्र माहीला सोडून सर्वांचा घमटा निघाला होता
थोडं पाण्याचं घोट पोटात टाकून
पुढची चढाई चालू केली
. आत्ता उभा चड चालू
झाला अजून काही ट्रेकर्स
मंडळी सुद्धा हबकत हबकत चडत
होते बहुतेक त्यांचा पूर्ण ग्रुप रात्री स्टे करण्यासाठी आले
होते. निसरडी वाट आणि संपूर्ण
प्रबळगडाची डोंगररांग यांचं सोंदर्य न्याहळत आम्ही पुढे निघालो. प्रवीण ची चांगलीच दमछाक झाली होती मग
त्याच्यासोबत बराच वेळ विश्राम
घेऊन परत मार्गक्रमनाला सुरवात
झाली वाटे मध्ये झोपडीसारखे
असलेले हॉटेल लागलं त्यात काही ट्रेकर्स मंडळी
लिंबूसरबताचा आस्वाद घेत होती . आम्ही
मात्र नथांबता पुढचा प्रवास चालू ठेवला..
बराच
वेळ पायपीट केल्यानंतर एका डोंगर माथ्यावर
येऊन पोहचलो माथ्यावरून कलावंती आणि प्रभळगडाचे आकाशात
जाणारे सुळके स्पष्ट पणे दिसत होते.
येथे कोपऱ्यावर एक झोपडी आहे
... झोपडी म्हणजे गुरांच्या गोटयांसारखी बाजूला दोन तीन बसायला
बाके टाकलेली . आणि झोपडी बंद
होती... बाके बघताच पाठीवरची
ओजी टाकून बाकांवरच अंग टाकून दिल...
आह्ह खूप बार वाटलं..
शहरातल्या AC लाफिकं पाडेल एवढा गारवा त्या
झोपडीच्या आवारात होता. जवळपास ३० मिनटं झोपूनच
गप्पा मारल्यानंतर , पाणी पिऊन गारेगार
झालो , आणि फोटो सेशन करून पुन्हा पायपीट
सुरु झाली ...
डोंगरावरची झोपडी. |
थोडं अंतर पार केल्यावर पाऊसात दुथडी भरून वाहणारा ओढा लागला... " माहिने आणि समीर" ने जुन्या ट्रेककिंगच्या आठवणींना थोडा उजाळा दिला आणि पुढे निघालो ...चालताना पाठीमागे दिसणारा कर्नाळाचा सुळका.. पेब माथेरान ची डोंगर रांग अप्रतिम सोंदर्य !! हे सर्व कॅमेऱयात मी बंधिस्त करण्याचा केविलवाणी प्रयत्न माज्याकडून मी करत होतो ....बरेच वेळ चालल्यानंतर एक देऊळ लागलं देऊळ म्हणता येणार नाही एका मोट्या कातळा मध्ये "श्री"ची आणि "अंजनी पुत्र" यांची मूर्ती कोरलेली आणि त्याला शेंदूर फासलेला सर्वजण थापा टाकत मूर्तींचा पायथ्यचि सावळी खाली बसलो समोरच नजारा म्हणजे भारीच !!! "गणेशला आणि हनुमंतानं " नमस्कार करून पुढचा टप्पा चालू झाला...
दगडात कोरलेला मारुतीराया आणि गणेश . |
ठाकूरवाडी गाव |
बरीच
ट्रेककर्स मंडळी माची उतरत होते महिलांचा
सहभाग सुद्धा बऱयापैकी होता. ..पायथयशी एका झोपडी मध्ये
ऐका मावशींनी काकडी आणि लिंबूसारबत विकत
होत्या तिथे गावरान काकडीची
मीठमसाला सोबत आस्वाद घेऊन
आम्ही थोडा वेळ बसलो..माहिने सांगितले की आत्ता एका
दमात बुरुज पार करायचा ..पायथ्याशीच
बसूनच सुळक्याच्या अंदाज आम्ही घेतला उंची एवडी वाटत
नव्हती पण कातळात कोरलेल्या
पायऱ्या यांची थोडी भीती वाटत
होती ...आता आम्ही सुरवात
केली ,घसरड्या वाटेवरून थोडं सांभाळून पुढे
होत नंतर काळ्या दगडात
कोरलेल्या पायऱ्या सावधगिरी ने चडु लागलो
...एक फूट दीड तर
कुठे दोन फुटाच्या कोरीव
पायऱ्या ...येथे थोडं सावधगिरी
जावं लागत कारण पुढे
धरण्यासाठी काहीच आधार नाही आहे
मजा वाटत होती आणि
पायऱ्या बनवणारीची कमाल ... पायऱ्या पार केल्यावर बुरुजावर
मोठा दगड लागतो ट्रेककिंचा
भाषेत बोलायचं तर रॉकपॅच आता
येते थोडी कसरत होणार
होती ...
दगडात कोरलेल्या पायऱ्या |
|
रॉक पॅच |
चालताना मी प्रबळगडाच्या डाव्या बाजूच्या डोंगररांग कडे सहज डोकावले तर समोरच डोंगरात खोदलेली गुंफा मला दिसली एक माणूस वाकून जाऊ शकेल एवडीच अरुंद गुहेद्वारीच मारुतीरायची नक्षी काढलेली ... नंतर आतमध्ये जायचं कीनाही अस चलबिचल चाली होती शेवटी ... प्रवीण आणि माझ्यातली खाज म्हणून आम्ही दोघे आत मोबाइल टॉर्च घेऊन आत गेलो.. गुडग्यावर बसून दोघे आत गेलो तीन ते चार फुटानंतर परत उजवीकडे वळलो नंतर त्या पुढे जवळ पास ५ ते ६ जणसहज बसतील एव्हडी जागा आहे ..थोडाच वेळात टॉर्च बंद झाली मग तसच बाचकत आम्ही परत बाहेर आलो ..बहुतेक ती गुंफा शत्रू पासून वाचण्यासाठी किंवा दारू गोळा, अन्न धान्य ठेवण्यासाठी करण्यात येतअसावी ...
प्रबळगडातली गुंफा |
जंगलातली निसरडी वाट
तुडवत ठाकरांच्या वाडीत येऊन पोहचलो उतरताना पोटातले कावळे ओरडत होते ..
घरातल्या आजोबांना विचारणा केल्यावर त्यानी जेवण
तयार असल्याचं सांगितलं मग लाल रंग असलेल्या गडूळ पण स्वछ पाण्यातच हात थुऊण जेवण यायची वाट बघत बसलो.. आजोबांनी जेवण आणलं माझ्या ताटात होत गरमागरम पिटल,भाकरी, चपाती, भेंडीची भाजी आणि बाकीच्या ताटात भाकऱ्या आणि मटणाचा रस्सया ... आता मात्र राहवत नव्हतं मी लिंबू पिळून एक घास तोंडात टाकला ...अप्रतिम चव !!! मग समीरच्या ताटातला मटणाचा रस्सा चाखला त्याची पण चव स्वादिष्ट ...गावी आजींनी बनवलेल्या चुली वरच्या जेवणाची चव ती हीच !!!समोरच निसर्ग परिसर न्याहळत आणि गप्पा मारत जेवण संपवलं ...
आता थोडा आराम करायचा म्हणून आम्ही समोरच्या मोकळ्या जागेत गेलो ...मोकळी जागा म्हणजे खाली खोल दरी आणि नयनरम्य परिसर येतून सर्व दृश्य अगदी विहंगमय ! आता इथेच सर्व जण पाय सोडून वर आकाशाकडे नजर करून पडलो .कधी डोळा लागला समजला नाही .. वातावरण आभाळ भरून आलेलं..अंगावर पावसाचे काही थेंब पडत होते अत्ता कोणीच कोणासोबत बोलत नव्हत फक्त नितांत शांतता ..बहुतेक ह्याच साठी आम्ही सह्यन्द्रीचा कुशीत एवढ्या मुंबईचा गजबजलेल्या गर्दीतून आलो होतो .... जवळपास अर्धा तासाने कुठल्यातरी ट्रेकिंग ग्रुप मधल्या एक मुलाचा आवाज आला " मला ही अगदी तसच झोपायचं " निद्रा भंग झाली मागे वळून बघितलं त्याच बोट आमच्या पाच जणांकडे होत ...
आता मात्र थोडा काळोख झाला होता आम्ही घाई घाईने उठून परत निघण्याची तयारी चालू केली. जेवणाचा मोबातला आजोबांकडे देऊन धन्यवाद मानले आणि सह्यन्द्रीची नयनरम्य दृश्य नजरेत साठवून आम्ही "आमच्या मुंबईकडे" प्रवास चालू केला ....
किल्याचे नाव : कलावंतीण माची आणि प्रबळगड
उंची : २३०० फिट
जाण्याचा मार्ग : पनवेल - शेऊंड फाटा -ठाकूरवाडी
बघण्यासारखे : कलावंतीणचे शेवटचे टोक , प्रबळगड ची डोंगररांग , रात्रीमोकळ्या आभाळाखाली झोपण्याचा अनुभव, शिखरावरूनआपल्यालादिसणारे दक्षिणेकडे प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख.
आमचा कलावंतीण दुर्ग प्रवास विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकला नक्की भेट द्या !
https://www.youtube.com/watch?v=qJqhuVYbKSA
कुठल्याही माहितीसाठी नक्की संपर्क करू शकता
अंकुश सावंत , कल्याण .
+९१ ९७६८१५३११४
धन्यवाद !!!
Apratim Mitra...kayamchi aathvan zali Mitra...majhya mullanna sangayla chan aathvan dilis mitra... thank you so much!!!
ReplyDeleteThank you...so much...ha ha ha lagn hoychy ajun 😉 e
Delete:D ho.. barobar bollas Sameer
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअप्रतिम ब्लॉग मित्रा.
ReplyDeleteकलावंतीण ला जाणाऱ्या लोकांना चांगला उपयोग होईल. हया ब्लॉग चा.
ReplyDeleteसगळ्यंचा उल्लेख केला आहेस छान वाटले
ReplyDeleteThanks Tammy...,😊
ReplyDelete2 jana gele tar hoil ka trek karan amcha group nahiye
ReplyDeleteHo 2 jan asle tri jau shakta ... Fakt kalji ghya
Delete