Tuesday, June 13, 2017

कलावंतीण दुर्ग ( Kalavantin Fort )

    ह्या वर्षी सूर्यनारायणांनी दिलेल्या अति त्रासामुळे गोरखगडा नंतर कुठे ट्रेकिंगला जाऊ शकलो नव्हतो बऱ्याच दिवस कलावंतीण माची करायची मनात होत पण बातम्या बघताना प्रभळगडावर एका  महिलाट्रेकर्सचा झालेला मृत्य, यामुळे मनात प्रबळगड आणि कलावंतीण माची करायची कि नाही अशी चल बिचल चालू होती आणि त्यात ऑफिस आणि घराच्या जबाबदाऱ्या, प्लान बनत होते फसत होते. पण आता मात्र पाऊसाची चाहूल लागली आणि  ऑफिस मध्ये सोबती समीर आणि आपले नवीन मित्रांनी कलावंतीण चा प्लॅन  फिक्स केला.

समीर ,महेंद्र ,तन्मय आणि प्रवीण आणि मी असे ५जणांचा ग्रुप बनलाशनिवार, रविवार सुट्टी असल्याने शनिवारचा दिवस फिक्स झाला . प्लान एक आठवड्या आदीच बनला असल्याने कलावंतीण माचीची नेहमी प्रमाणेच माहिती मिळवायला सुरवात झाली . कुठल्याही ठिकाणाची अचूक माहिती मिळवण्याचं ठिकाण म्हणजे तिथे जाऊन आलेलया भटक्यांनी लिहलेले ब्लॉग्स . मग आठवडाभर असेच ब्लॉग्स वाचून बऱ्यापैकी माहिती मिळाली . आणि आपला माही ( महेंद्र) याने तर दोन वेळा कलावंतीण सर केलेला..  मग आता तर काही काळजी करण्याचं कारणच नव्हतं .शुक्रवारी ऑफिस मध्ये ट्रेनच नियोजन करून पनवेलला ठीक वाजता भेटायच ठरलं..  समीर , माही सोबत प्रवीण येणार होता आणि मी आणि तन्मय आम्ही कल्याण डोंबिवली कर एकत्र येणार होतो .

            कलावंती आणि प्रबळगडची डोंगररांग 
सकाळी पहाटेच उठून गरमगरम चहा पोटात टाकला आणि फक्त पाण्यानी भरलेली  बॅग अडकवून मोहिमेला सुरवात केली . यावेळी आईला भाकऱ्या बनवण्यापासून  थोडा आरामच दिलाशनिवार असल्याने ट्रेन मधला गर्दीचा पूर बऱ्यापैकी खाली होताट्रेनच टाईमिंग अगदी उत्तम जुळून आल्यानं बरोबर :१५ वाजता सर्व पनवेल ला भेटलो .सर्वांची ओळख समीर ने माही सोबत करून दिली . माही ने यापूर्वी सुद्धा कलावंतीण केलेली असल्याने सर्व ट्रेकची जबाबदारी त्याचाकडे होती .बाप्पाचं नाव घेऊन मग  आमचे आजचे गाईड महेंद्र यांच्या सोबत बसडेपोकडे प्रस्थान केले.

सकाळचे जेमतेम साडेसात वाजलेले तरी हि सूर्यनारायण चांगलाच त्रास देत होता , पंधरा मिनिटांच्या पायपिटी नंतर आम्ही पनवेल बस डेपोत पोहचलो . उन्हाने चांगलाच घामटा काढला आता मात्र सूर्यनारायण अशीच आग ओतत राहिले तर ट्रेकिंग अवघड होईल याची काळजी वाटत होती .

 बस डेपोवरच्या कल्लोळा मधून माहि ने पटकन वाट काडत शेउंड गावाकडे जाणाऱ्या बसचा मागोवा काडला . बस मध्ये सर्वजण चढल्यावर थोडे माझ्या पोटातले कावळे ओरडू लागले ,तन्मयला वडापाव आणायला सांगितले . पण बस उशिरा निघणार म्हंटल्यावर माहीने खाजगी वाहनाने कूच करायचं सुचवलं  आणि सर्वानी होकार दिल्यावर बस डेपोमधून बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा वाल्यांकडे चौकशी केली असता जवळजवळ पूर्ण ट्रेककिंगचा खर्च निघेल एव्हडं भाड सांगलत मग पुढे गेल्यावर एका भल्या ऑटो वाल्यानी थोडस पुढे जाऊन ब्रिज खालून शेउंड फाट्यावर जायला सांगितले आणि नंतर पुढे ऑटो करून ठाकूरवाडी गावात...  सर्वानाच कमित कमी खर्चात सोयीस्कर वाटल मग सहासीटर  मध्ये बसून थेट शेऊंड फाटा गाठला नंतर शेउंडफाट्याला उतरून मग थोडी केळी , पाण्याचा बाटल्या घेऊन थेट ठाकूरवाडी गाठली...
 आपल वेगळं पण राखून ठेवलेलं झाड . 
नागमोडी वाट गावातून जाते गावाचं बऱयापैकी शहरीकरण झालेलं लांबून आम्हला प्रबळगडाची रांग दिसत होती वातावरण पूर्णपणे पाऊसप्रमेने मळवट झालेलं ओल्या मातीचा सुगंध..  ! ऑटो वाल्यानी काकांनी सांगितलं काल जोरदार पाऊस पूर्ण रात्रभरझालेला .ट्रेकिंग साठी उत्तमअस वातावरण झालं होतं  दोन ते तीन किलोमीटर अंतर पार झाल्या नंतर ऑटो वाल्या काकांनी थेट आम्हला जंगलाचा पायथयशी आणून सोडलं . काकांचे धन्यवाद मानून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला...

 सुरवात एका फोटोसेशन ने झाली कलावंतीण कडे जाणारी वाट अगदीच मळलेली दिसत होती बऱयापैकी रुंद समोरची डोंगररांग पूर्णपणे नजरेत येत होती.आता सर्व परिसर न्याहळत आम्ही पुढे चालत होतो.. मध्ये मध्ये फोटोसेशन चालू होतो ..पाऊले आता पटापट टाकत निघालो सूर्य सुद्धा मध्यावर आलेला...आजूबाजूचा परिसर म्हणजे फक्त अप्रतिम !!!
सुरवातीपासूनच गावातल्या मंडळींनी दगडांवर बाणच निशाण करून मार्ग सोपा केला आहे .त्यालाच फोल्लो करत  जवळपास 30 मिनटं चालून झाल्यावर मात्र माहीला सोडून सर्वांचा घमटा निघाला होता थोडं पाण्याचं घोट पोटात टाकून पुढची चढाई चालू केली . आत्ता उभा चड चालू झाला अजून काही ट्रेकर्स मंडळी सुद्धा हबकत हबकत चडत होते बहुतेक त्यांचा पूर्ण ग्रुप रात्री स्टे करण्यासाठी आले होते. निसरडी वाट आणि संपूर्ण प्रबळगडाची डोंगररांग यांचं सोंदर्य न्याहळत आम्ही पुढे निघालोप्रवीण ची चांगलीच दमछाक झाली होती मग त्याच्यासोबत बराच वेळ विश्राम घेऊन परत मार्गक्रमनाला सुरवात झाली वाटे मध्ये झोपडीसारखे असलेले हॉटेल लागलं त्यात काही ट्रेकर्स मंडळी लिंबूसरबताचा आस्वाद घेत होती . आम्ही मात्र नथांबता पुढचा प्रवास चालू ठेवला..

बराच वेळ पायपीट केल्यानंतर एका डोंगर माथ्यावर येऊन पोहचलो माथ्यावरून कलावंती आणि प्रभळगडाचे आकाशात जाणारे  सुळके स्पष्ट पणे दिसत होते. येथे कोपऱ्यावर एक झोपडी आहे ... झोपडी म्हणजे गुरांच्या  गोटयांसारखी बाजूला दोन तीन बसायला बाके टाकलेली . आणि झोपडी बंद होती... बाके बघताच  पाठीवरची ओजी टाकून बाकांवरच अंग टाकून दिल... आह्ह खूप बार वाटलं..  शहरातल्या AC लाफिकं पाडेल एवढा गारवा त्या झोपडीच्या आवारात होता. जवळपास ३० मिनटं झोपूनच गप्पा मारल्यानंतर , पाणी पिऊन गारेगार झालो , आणि फोटो सेशन करून पुन्हा पायपीट सुरु झाली ...
डोंगरावरची झोपडी. 

थोडं अंतर पार केल्यावर पाऊसात दुथडी भरून वाहणारा ओढा लागला... " माहिने आणि समीर" ने जुन्या ट्रेककिंगच्या आठवणींना थोडा उजाळा दिला आणि पुढे निघालो ...चालताना पाठीमागे दिसणारा कर्नाळाचा  सुळका.. पेब माथेरान ची डोंगर रांग अप्रतिम सोंदर्य !! हे सर्व कॅमेऱयात मी बंधिस्त करण्याचा केविलवाणी प्रयत्न माज्याकडून मी करत होतो ....बरेच वेळ चालल्यानंतर एक देऊळ लागलं देऊळ म्हणता येणार नाही एका मोट्या कातळा मध्ये "श्री"ची आणि "अंजनी पुत्र" यांची मूर्ती कोरलेली आणि त्याला शेंदूर फासलेला सर्वजण थापा टाकत मूर्तींचा पायथ्यचि सावळी खाली बसलो समोरच नजारा  म्हणजे भारीच !!!  "गणेशला आणि हनुमंतानं " नमस्कार करून पुढचा टप्पा चालू झाला...
दगडात कोरलेला मारुतीराया आणि गणेश . 
 परत आमची पायपीट चालू झाली . आम्ही माही पेक्षा बरेच सावकाश होतो... माही बोलता ३० मिनिटं सहज चालू शकत होता ... मग पुढे जाऊन तो आमची वाट बघत कुठे तरी एकटाच बसून निसर्गसोंदर्यत हरवून जायचा !!! आत्ता बराच वेळ चालतच होतो ... निसरड्या वाटी..  सह्यन्द्रीचा कुशीतले भले मोठे वृक्ष, पक्षी.. यांच्यातून वाटा काडत आम्ही कलावंतीण च्यापायथ्याशी वसलेल्या ठाकूरवाडी गावात येऊन पोहचलो ...हा भाग म्हणजे पूर्णपणे पठार समोरच काही अंतरावर शाळेसारखी बांधणी असलेलं घर पुढे अंगणात सारवून जमीन केलेली ... समोरचा भागात काही ट्रेकर्स ग्रुपने टेन्ट लावलेले होते ...घराचा पाठीमागे कलावंतीण आणि प्रबळगडाचा सुळका समोर कर्नाळा ...पेब  ...पूर्ण सह्यन्द्रीची अभङ रांग ...सर्व एकदम भारीच वाटत होत !
 आता थोडा वेळ घराच्या ओटी वर बसून अराम केला... समीर माहिने जेवणाबद्दल चौकशी केली आता इथे जेवन सांगून कलावंतीणचा सुळका सर करायचा असं ठरलं ...मग पाठीवरची ओजी कमी करावी म्हणून फक्त बॅग्स मध्ये पाण्याचा बॉटल्स घेऊन बाकीचं सामान घरातल्या मावंशीकडे सुपूर्द करून पुढे निघालो ...
ठाकूरवाडी गाव 
 आता पुढची वाट ठाकरांच्या वाडीतून जाते गावातली मंडळी कामामध्ये मग्न दिसत होती ..निसर्गाच्यासानिध्यात वाढलेली पोर मात्र मस्त पैकी पक्षानं बॅचकीने टिपण्यात मग्न होती..तर काहीजन  विटीदांडू खेळण्यात ... आम्ही पुढे निघलो तोच गावातल्या एका म्हातारं बाबानी आवाज देऊन दहा रुपयाची नोट मागितली मी खिशात हात घातला तर वीसची नोट निगली म्हातारबाबांचा हातात वीसची नोट पडताच .. म्हातारबाबाचं चेहरा खुलला .. आजोबांचा मायेने आशीर्वाद देत" बाबांनो सांभाळून जा आणि या सांगितले "  बरं वाटलं..
 आता पुढे कलावंतीण सुळका नजरेत दिसत असल्यानं सर्वानाच चालण्याचा हुरूप आला होता ... वाट थोडी उभी चढण असणारी आहे . १५ ते २० मिनटंनंतर आम्ही मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो ...हीच ती प्रसिद्ध खिंड ज्याच्यामधून सूर्य अस्थ ला जाण्याचा भास होतो ... आणि हाच नजारा पाहण्यासाठी माथेरानच्या सनसेट पॉईंट वर सर्वजण गर्दी करतात . उजवीकडे कलावंतिणीचा माथा डावीकडे प्रबळगडाचा माथा या मुळे दोगांमध्ये इंगर्जी व्ही आकाराचा भास होतो.  ठाकूरवाडीतील आदिवासी मंडळी याच सुळक्यावर पारंपरिक पद्धतीने शिमगा साजरा करतात .. 

बरीच ट्रेककर्स मंडळी माची उतरत होते महिलांचा सहभाग सुद्धा बऱयापैकी होता. ..पायथयशी एका झोपडी मध्ये ऐका मावशींनी काकडी आणि लिंबूसारबत विकत होत्या तिथे गावरान काकडीची मीठमसाला सोबत आस्वाद घेऊन आम्ही थोडा वेळ बसलो..माहिने सांगितले की आत्ता एका दमात  बुरुज पार करायचा ..पायथ्याशीच बसूनच सुळक्याच्या अंदाज आम्ही घेतला उंची एवडी वाटत नव्हती पण कातळात कोरलेल्या पायऱ्या यांची थोडी भीती वाटत होती ...आता आम्ही सुरवात केली ,घसरड्या वाटेवरून थोडं सांभाळून पुढे होत नंतर काळ्या दगडात कोरलेल्या पायऱ्या सावधगिरी ने चडु लागलो ...एक फूट दीड तर कुठे दोन फुटाच्या कोरीव पायऱ्या ...येथे थोडं सावधगिरी जावं लागत कारण पुढे धरण्यासाठी काहीच आधार नाही आहे मजा वाटत होती आणि पायऱ्या बनवणारीची कमाल ... पायऱ्या पार केल्यावर बुरुजावर मोठा दगड लागतो ट्रेककिंचा भाषेत बोलायचं तर रॉकपॅच आता येते थोडी कसरत होणार होती  ...

दगडात कोरलेल्या पायऱ्या 
 कोणी भल्या माणसाने वरती चडण्यासाठी आधार म्हणून एक मोठास लाकूड दगडाच्या खाच्यामध्ये लावलेलं आणि अजून थोड्या अंतरावर अजून एक छोटं ...दोनीही खाच्या वर विश्वास ठेवून त्त्यावरून पाय ठेवून वरती जायचं होत .. चढण थोडं  सोपं झालं होतं ..समीर , प्रवीण त्या नंतर तन्मय ने थोडीशी कसरत करून पॅच पार केला नंतर माही आणि मी सुद्धा वरती आलो ...
 वरती आल्यावर मोहीम फत्ते झाल्याचा आनंद सर्वांचा चेहऱयावर होता... पुणे-मुंबई हमरस्त्यावरून  दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची  जाणीव करून देणारा बुरुज. जिच्या साठी हा बांधला तिच्या नावावरूनच या बुरुजाचे नाव पडले. शिखरावरून आपल्याला दक्षिणेकडे प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख दृष्टीस पडतो.अर्थात हे सगळं पाहायला वातावरण स्पष्ट असायला हवं. आणि अर्थातच आम्ही खूपच भाग्यवान होतो ...संपूर्ण परिसर अगदी स्पष्ट नजरेत होता..अप्रतिम !!!


टोकावरून दिसणारा पेब,कर्नाळा,इर्शाळगड आणि माथेरान
बराच वेळ बसल्यानंतर आत्ता आम्हला फक्त उतरायचे होते , तरीही या "फक्त" मध्ये बरेच काही होते ...तो रॉक patch उतरून परत सावधगिरीने आम्ही पायऱ्या उतरून पुढे चालू लागलो..उतरताना काही मंडळींनी ब्लूटूथ स्पीकर वर जोरानी इंग्लिशसॉंग्स लावलेले मग नेहमीप्रमाणे माझा भाषेतच शिव्या हासडून पुढे निगालो...हे निसर्ग सोंदर्य कॅमेरात साठवण्याचा प्रयत्न करत होतो पण ते कॅमेऱ्यात बंदीस्त करणे अशक्य समजल्यावर पुढे टोकावर एका दगडावर शांत पणे बसून आम्ही सर्वचजण आनंद अनुभवत होतो...बराच वेळ बसल्यावर आम्ही उतरण्याची तयारी केली एकदा फेसबुकवर live जाऊन मित्रानं पर्यंत गड सर केल्याची बातमी पोहचवली ....
रॉक पॅच 
चालताना मी प्रबळगडाच्या डाव्या बाजूच्या डोंगररांग कडे सहज डोकावले तर समोरच डोंगरात खोदलेली गुंफा मला दिसली एक माणूस वाकून जाऊ शकेल एवडीच अरुंद गुहेद्वारीच मारुतीरायची नक्षी काढलेली ... नंतर आतमध्ये जायचं कीनाही अस चलबिचल चाली होती शेवटी ... प्रवीण आणि माझ्यातली खाज म्हणून आम्ही दोघे आत मोबाइल टॉर्च घेऊन आत गेलो.. गुडग्यावर बसून  दोघे आत गेलो तीन ते चार  फुटानंतर परत उजवीकडे वळलो नंतर त्या पुढे जवळ पास ते जणसहज बसतील एव्हडी जागा आहे ..थोडाच वेळात टॉर्च बंद झाली मग तसच बाचकत आम्ही परत बाहेर आलो ..बहुतेक ती गुंफा शत्रू पासून वाचण्यासाठी किंवा दारू गोळा,  अन्न धान्य ठेवण्यासाठी करण्यात येतअसावी ...

प्रबळगडातली गुंफा 

जंगलातली निसरडी वाट तुडवत ठाकरांच्या वाडीत येऊन पोहचलो  उतरताना पोटातले कावळे ओरडत होते ..
घरातल्या आजोबांना विचारणा केल्यावर त्यानी जेवण तयार असल्याचं सांगितलं मग लाल रंग असलेल्या गडूळ पण स्वछ पाण्यातच हात थुऊण  जेवण यायची वाट बघत बसलो.. आजोबांनी जेवण आणलं माझ्या ताटात होत गरमागरम पिटल,भाकरी, चपाती, भेंडीची भाजी आणि बाकीच्या ताटात भाकऱ्या आणि मटणाचा रस्सया ... आता मात्र राहवत नव्हतं मी लिंबू पिळून एक घास तोंडात टाकला ...अप्रतिम चव !!! मग समीरच्या ताटातला मटणाचा रस्सा चाखला त्याची पण चव स्वादिष्ट ...गावी आजींनी बनवलेल्या  चुली वरच्या जेवणाची चव  ती हीच !!!समोरच निसर्ग परिसर न्याहळत आणि गप्पा मारत जेवण संपवलं ...

आता
थोडा आराम करायचा म्हणून आम्ही समोरच्या मोकळ्या जागेत गेलो ...मोकळी जागा म्हणजे खाली खोल दरी आणि नयनरम्य परिसर येतून सर्व दृश्य अगदी विहंगमय ! आता इथेच सर्व जण पाय सोडून वर आकाशाकडे नजर करून पडलो .कधी डोळा लागला समजला नाही .. वातावरण आभाळ भरून आलेलं..अंगावर पावसाचे काही थेंब पडत होते अत्ता कोणीच कोणासोबत बोलत नव्हत फक्त नितांत शांतता ..बहुतेक ह्याच साठी आम्ही सह्यन्द्रीचा कुशीत एवढ्या मुंबईचा गजबजलेल्या गर्दीतून आलो होतो .... जवळपास अर्धा तासाने कुठल्यातरी ट्रेकिंग ग्रुप मधल्या एक मुलाचा आवाज आला " मला ही अगदी तसच झोपायचं " निद्रा भंग झाली मागे वळून बघितलं त्याच बोट आमच्या पाच जणांकडे होत ...

आता
मात्र थोडा काळोख झाला होता आम्ही घाई घाईने उठून परत निघण्याची तयारी चालू केली.  जेवणाचा मोबातला आजोबांकडे देऊन धन्यवाद मानले  आणि सह्यन्द्रीची नयनरम्य दृश्य नजरेत साठवून आम्ही "आमच्या मुंबईकडे" प्रवास चालू केला ....



किल्याचे नाव : कलावंतीण माची  आणि प्रबळगड 

उंची : २३०० फिट 

जाण्याचा मार्ग : पनवेल - शेऊंड फाटा -ठाकूरवाडी 

बघण्यासारखे : कलावंतीणचे शेवटचे टोक , प्रबळगड ची डोंगररांग , रात्रीमोकळ्या आभाळाखाली झोपण्याचा अनुभव, शिखरावरूनआपल्यालादिसणारे  दक्षिणेकडे प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख. 

आमचा कलावंतीण दुर्ग प्रवास विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकला नक्की भेट द्या ! 
https://www.youtube.com/watch?v=qJqhuVYbKSA

कुठल्याही माहितीसाठी नक्की संपर्क करू शकता 
अंकुश सावंत , कल्याण . 
+९१ ९७६८१५३११४

धन्यवाद !!!






10 comments:

  1. Apratim Mitra...kayamchi aathvan zali Mitra...majhya mullanna sangayla chan aathvan dilis mitra... thank you so much!!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you...so much...ha ha ha lagn hoychy ajun 😉 e

      Delete
    2. :D ho.. barobar bollas Sameer

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अप्रतिम ब्लॉग मित्रा.

    ReplyDelete
  4. कलावंतीण ला जाणाऱ्या लोकांना चांगला उपयोग होईल. हया ब्लॉग चा.

    ReplyDelete
  5. सगळ्यंचा उल्लेख केला आहेस छान वाटले

    ReplyDelete
  6. 2 jana gele tar hoil ka trek karan amcha group nahiye

    ReplyDelete
    Replies
    1. Ho 2 jan asle tri jau shakta ... Fakt kalji ghya

      Delete