Sunday, March 29, 2020

प्रवास अलिबागचा


बरेच दिवस झाला आमचा अलिबागला जाण्याचा प्लान फसत होता, पण यावेळी मात्र  जे कोणी कोणी सोबत होते त्याचासोबतच प्रवास करण्याचं ठरल. मी , तन्मय, आणि सचिन ऑफिस मधूनच थेट गेट वे ऑफ इंडिया  गाठली आणि कल्याण वरून ओमकार आणि लहू आले. सकाळची मांडवाला जाणाऱ्या पहिल्या बोटीने आमचा अलिबागचा प्रवास सुरु झाला.बोटीची तिकीट प्रत्येकी १५० रुपये आहे.

गेट वे ऑफ इंडिया 

साधारण दीड तासात आम्ही मांडवाला पोहचलो आणि तिथून मग त्यांचाच बसने पुढे अलिबाग ला पोहचलो .तो अजून एक तासाचा प्रवास आहे.  खूपच लवकर आणि नास्ता नकरता प्रवास सुरु केला होता म्हणून सर्वांचा पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. मग जवळच एक हॉटेल बघून मस्त मिसळ आणि वडापाव वर ताव मारून आम्ही निघालो अलिबागच्या समुद्रकिनारी.

स्पीड बोटीने केलेला कुलाबा पर्यंतचा प्रवास 

समुद्रकिनारी पोहचताच वॉटर स्पॉट वाल्यांची बडबड चालू झाली आम्ही थोडे पण इंटरेस्टेड नव्हतो आम्हला कुलाबा किल्याला जायचं होत .भरती असल्यामुळे बोट घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. मग एका स्पीड बोट वाल्याला विचारल्यावर प्रत्येकी १५० रुपये येऊन जाऊन सांगितले त्यानी . १५ मिनिटांमधे आम्ही कुलाबा किल्याला पोहचलो . आणि मग किल्याचा आत जाण्यासाठी प्रत्येकी १० रुपये पुरातत्व खात्याची प्रवेश फी आहे.

किल्यावरील मागील दरवाजा 
१९ मार्च १६८० ला हा किल्ला महाराजांनी बांधायला घेतला आम्ही प्रवेशद्वारातून प्रवेश केला किल्यावरचे बुरुज आणि तोफा बघतांना आंग्रे च्या मराठी आरमाराची ताकद लक्षात येते. प्रवेश केल्यावर डावी बाजूला भवानी मातेचं सुंदर मंदिर आहे आणि दीपमाळ आहे . आम्ही किल्याचा बुरजावरूनच पुढे निघालो . अथांग सागर आणि त्याचा आवाज मन वेडावून टाकतो . तिथून आम्ही किल्याचा मागील दरवाजामध्ये आलो. सुंदर गणेशाची मूर्ती दरवाजावर कोरली आहे . थोडा वेळ घालवून आम्ही किल्यावरील सिद्धिविनायकाचे मंदिर बघण्यासाठी निघालो . १७५९ साली कान्होजी आंग्रे नि हे मंदिर बांधले सुंदर कोरीव मंदिर आणि मंदिरासमोरील तुळशी वृंदावन आपलं लक्ष वेधून घेते. मंदिरासमोर पुष्करणी आहे . थोडा वेळ घालवून आम्ही पुढे निघालो किल्यावर एक गोड्या पाण्याची विहीर आहे .

 कुलाबा किल्याची भटकंती मस्त झाली येताना बाहेर बसलेल्या आजींकडून चिंच आणि बोर घेऊन परत बोटीने अलिबागला आलो आणि आता आमचं पुढच ठिकाण होत चौलच रामेश्वर मंदिर. आमची पूर्ण प्रवासाची लिस्ट अजिंक्य ने बनवून दिली होती.
अलिबाग वरून आम्ही चौलला जाण्यासाठी रिक्षा केली प्रत्येकी २५ रुपये देऊन चौलला आलो. मंदिर खूप सुंदर आहे बघताच क्षणी मंदिराची कौलारु छप्पर आणि चिरेबंदी आणि लाकडी बांधकाम डोळ्याला सुखावून जाते. मंदिर पूर्वाभिमुख असून समोर पुष्करणी आहे. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे आहे. पण कुणी बांधलं याचा उल्लेख मिळत नाही. मंदिराचा जीर्णोद्धार कान्होजी आंग्रे यांनी बऱ्याच वेळा केला आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलंग आहे आणि गाभाऱ्याच्या समोरच सुंदर अशी पुष्करणी आहे.गाभाऱ्याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत.

रामेश्वर मंदिर 

पुष्करणी खूप सुंदर आहे बराच वेळ पुष्करणीचा इथे बसून घालवले. नंतर गाभाऱ्याचा प्रसन्न वातावरणात शांत बसून घालवले आणि नंतर मग आम्ही एकविरा शितळादेवीच दर्शन घेण्यासाठी निघालो, १५ मिनटांमध्ये आम्ही पोहचलो  .मंदिरा मधील आई देवीची मूर्ती मन सुखावून जाते .ह्या मंदिराचा उपयोग आंग्रेनि शस्त्रसाठा करण्यासाठी केला होता. दर्शन घेऊन आम्ही नांदगावला निघालो तिथे आमच्या राहण्याची सोय अजिंक्यने त्याचा मामांच्या रिसॉर्ट मध्ये केली होती . रेवदंडा वरून आम्हला नांदगावला जाणारी बस भेटणार होती. बराच वेळ वाट बघितल्या नंतर नांदगाव ला जाणारी बस आली. रेवदंडा ते नांदगाव चे अंतर २४ किलोमीटर आहे आम्हला साधारण १ तास लागणार होता. सर्व जण बसताच क्षणी झोपी गेले.

नांदगाव ला पोहचलो मामाचा मस्त दोन मजली टुमदार घर आहे. आम्ही एक रूम दोनदिवसाठी २००० रुपये देऊन घेतला होता. सर्वजण फ्रेश झालो आणि मस्तपैकी मामाचा नारळाच्या बागेमध्य  जेवण केलं. संपूर्ण नारळाची आणि सुपारीची उंचच उंच झाडे आहेत. जेवून थोड्या वेळ क्रिकेट खेळून आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या समुद्रकिनारी निघालो .

नारळाच्या बागेत बसून केलेलं जेवण 

 नांदगावचा  समुद्रकिनारा म्हणजे कोणालाही माहित नसलेला सुंदर नितांत सुंदर असा समुद्रकिनारा .खऱ्याखुऱ्या कोकणच्या समुद्रकिनाऱ्याची अनुभुती येथे येते. कुठल्याही प्रकारचे वॉटर स्पोर्ट नाही. गावकऱ्यांनी योग्य प्रमाणे स्वच्छ ठेवला आहे. आम्ही एक अदभूत सूर्यास्तचे साक्षीदार झालो. अंधार होईपर्यंत आम्ही किनाऱ्यावरच गप्पा मारत बसलो होतो . मामाचा जेवण्यासाठी फोन आला आणि मग मस्त जेवण करून आम्ही गाड झोपी गेलो.

नांदगावचा समुद्र किनारा 

सकाळी उठण्यासाठी उशीर झाला . सर्वानी अंगोळ आणि नाश्ता करून आम्ही मामाची रजा घेतली इथून आम्ही जंजिरा बघायला निघालो जाण्यापूर्वी गावात असलेल्या सुंदर श्री सिद्धिविनायक स्वयंभू गणेशाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरवात केली . आता इथून आम्ही टमटम करून मुरुडला पोहचलो आणि तिथून रिक्षा करून आम्ही खोरा बंधराला पोहचलो , इथून आम्हला जंजिराला जाण्यासाठी बोट भेटणार होती. पोहचल्यावर कळाले तिकीट विक्री हि जास्त पर्यटक आल्यामुळे बंद करण्यात आली आहे. किल्यावर बरीच गर्दी झाली होती. आम्ही तिथून निघालो  आणि मुरुड गावच्या बंदरावरून जाण्याच ठरवलं परत रिक्षा ने तिकडे पोहचलो. आणि तिथली तोबागर्दी पाहून सर्वांची नाराजी झाली. आता वेळेअभावी आम्ही जंजिरा न बघताच कोर्लई करून मुंबईला जाण्याचं ठरवलं.
श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर , नांदगाव 

आम्ही मुरुडचा बसडेपोला पोहचलो साधारण एक तास वाट बघतल्यानंतर रेवदंडा ला जाणारी बस आली.रेवदंडाच्या आधी असलेल्या कोर्लई स्टॉपला उतरलो इथून आपण पायी किंवा रिक्षाने किल्यापर्यंत जाऊ शकतो . आम्ही रिक्षा करून कोळीवाड्यात पोहचलो .
कोर्लई किल्याचा माघील दरवाजा 
कोर्लई किल्याचा पहिला दरवाजा 

 कुंडलिका खाडीच्या मुखाशी हा किल्ला बांधला आहे तिन्ही बाजूनी खाडी नेवेढला आहे. आम्ही लाईटहाऊसच्या इथून किल्याचा मुख्य दरवाजा मधून आत गेलो इथून आपणाला दर्शन होते ते एका विंहगम दृश्याची . एकीकडे आपण खाडी आणि सागराची भेट झालेली पाहतो लहान लहान मच्छिमारांच्या होड्या दिसतात. किल्यावर एक चर्च आहे तसेच पोर्तुगीजांनी कोरलेले शिलालेख आहेत. किल्यावर बऱ्याच तोफा आहेत . किल्यावर असलेल्या पाण्याच टाक बघायला भेटलं आणि तिंथून आम्ही पाणी भरून घेतलं आणि किल्याचा खाडीबाजूला असलेल्या दरवाजा बघायला निघालो हा दरवाजा सागरी मार्गाने व्यापार करण्यासाठीबांधला आहे. पुढे आम्ही किल्याचा शेवटच्या बुरुजाकडे पोहचलो आणि अलिबागच्या सुंदर प्रवासाचा शेवट केला.
कोर्लई किल्यावरचा चर्च 

७ वाजून गेले होते आता परत जाणारी बोट पण चुकली होती मग आम्ही लगबग करून किल्ला उतार झालो  आणि पायीच मुख्य बसस्टॉपला आलो सहासीटर ने आम्ही रेवदंड्यावरून अलिबाग ला पोहचलो . मस्त पैकी जेवण करून आम्ही पनवेलला जाणारी शिवशाही बस पकडली . पनवेल  ला पोहचलो सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि आमच्या अलिबागच्या सागरी मोहमेची सांगता झाली.

आमचा सर्व प्रवास पाहण्यासाठी आमचं युट्युब चॅनला नक्की भेट द्या .


कुलाबा किल्ला :


रामेश्वर मंदिर आणि नांदगावचा समुद्रकिनारा :


कोर्लई किल्ला :


अलिबागचा प्रवास आपण गेट वे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्यावरून करू शकतो किंवा महाराष्ट्र महामंडळाची बस सुविधा उपलब्द आहे . 

अलिबाग मध्ये जेवणाची सोया उत्तम होते . नांदगाव मध्ये जेवणासाठी तुम्ही आर्य बीच रिसॉर्ट ला संपर्क करू शकता 

प्रशांत कोटवाला 
८९८३०९३७८४
९२७०१३२८८३

धन्यवाद !


No comments:

Post a Comment