Saturday, November 5, 2016

गोरखगड ( Gorakhgad )

नमस्कार ,मित्रानो ऑक्टोम्बर नोव्हेंबर महीना म्हंटल म्हणजे दिवाळीची गडबड आणि मौज मस्ती . दिवाळी म्हंटल की आईने बनवलेला चमचमित फराळ ,प्रत्येक दिवासच एक वैशिष्ट्य , या वर्षी दिवाळी मध्ये फटाक्यांची अतिशबाजी नक्कीच कमी झलि आहे पर्यावरण हितच दृष्टीने टाकलेल एक चांगल पाउल आहे , दिवाळी म्हंटल की अजुन एक  आपण लहानपणी करायचो ते म्हणजे मातीचे किल्ले...किल्ले म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज आणि महाराज म्हणजे त्यांचे बुलुंद किल्ले ..

.महाराजांच्या किल्यावर एक दिवस दिवाळीपहाट साजरी करायच ऑफिस मध्ये मी अणि माझा ऑफिस मधला मित्र समीर गोसावी याने ठरवल होतं.समीर चा ट्रैकिंग चा अनुभव खुप होता त्याच्यासोबत कोथळीगड करायचा प्रयत्न फसला होता म्हणूनच या वेळी नक्की केल. ऑफिस मधून अजुन दोघे जन आणि त्याचा मित्र महेंद्र येणार होता. प्रथम गोरखगड़ ठरला होता पण नंतर मात्र ग्रुप मध्ये मूली  असल्याने कलावंती दुर्ग ठरला. पण संध्याकाळी समीर चा कॉल आल " बॅक टू गोरखगड अंकुश " दोघे कमी झाले होते .

सर्व तयरि झलि होती इंटररनेट वर थोडिशि माहिती घेतली गोरकगडबद्दल गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे  त नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे.शहाजी राजांच्या काळात या गडाला महत्त्व होते. मात्र येथे कोणत्याही प्रकाराच्या लढाईचा उल्लेख नाही. शिवकाळात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. गोरखनाथ येते साधनेसाठी बसत म्हणून याच नाव गोरखगड पड़ल.

इंटरनेटवर गोरखगदाचि वर्गवारी " मध्यम " अशी केल्यामुळे  थोडी काळजी होती पण समीर आणि महेंद्र सारखे जवळपास पंधरा हुन अधिक किल्ले सर केलेला अनुभव असल्यामुळे काळजी करण्याच कारण नव्हतं घाटकोपर वरुण समीर आणि महेंद्र कल्याण ला मला भेटनार होते पहाटे पाचवाजता मला समीर ने कॉल करुण मला उठवलं सर्व तयारी करुण साडेसहा ला कल्याणला आम्ही भेटलो .  महेंद्र ला प्रथमच मी भेटत होतो पण ,त्याच्याबद्दल मी समीर च्या कडून खुपदा एकल होत असच एकदा समीर बोलून गेला होता की" एका दिवसात एक वाचून काडलेल पुस्तक आणि माहि सोबतचा सपूर्ण दिवस " यात माहि सोबतचा घालवलेला दिवस खुपच चांगलेलं अनुभव सांगून जातो  . त्याने माझी अणि महेंद्र ची ओळख करुण दिली आणि पुढचा प्रवास सुरु झाला.

पुढे बुसस्थानकतुं मुरबाड कडे  जाणारी बस पकडली आणि ट्रेकिंगला सुरू झाली.थोड्याच वेळात गाव सुरु झाली आणि हवेतला गारवा जाणवायला सुरवात झाली समीर आणि माहि घरातून पहाटेच निघाल्यामुळेथोड्याच वेळात दोघेही साखर झोपेत गेले बस मध्य कुटेच नथांबता मुरबाड बस डेपोत थांबणार होती , बसने चांगलाच वेग पकडला होता थोड्याच् वेळात बस गावातील नागमोडी वळने घेत मुरबाड़ ला पोचलो.घरातून नाश्ता नकारताच निघाल्यामुळे पोटात भुकेचे कावळे ओरडतच होते . बाहेरच एका हॉटेल मधे गर्मागर्म मिसळ आणि वडासांबारावर ताव मारला .तिघे ही खाण्याचे शौकीन असल्यामुळे पोटभर नाश्ता केला मिसळ अणि वडासंभारचीचव अप्रतिम होती .हॉटेलवेटर कडे चौकशी केल्यावर समजले की देहरी गावत जाणारी बस रद्द झलि आहे म्हणून खजगीवाहन करुण आम्हाला  म्हसे गावत जायला लागेल आणि तिथून पुढे परत खाजगी वाहन करुण देहरी गावत जायला खाजगी वाहन करावे लागेल .मग तिथेच पुढचा प्रवास मध्ये खाण्यासाठी केळी आणि पाणी बॉटल्स घेऊन सहा चाकी पकडली. खाजगी वाहनातील अनुभव मात्र भयानक होता सहाचाकी  वाहनांमधून चालक जवळपास पंधरा माणसे घेऊन निघालो.एक तासांच्या प्रवासनतर आम्ही देहरी गावात पोहचलो .

आतापर्यंतचा मुरबाड पासून देहरी गावापर्यंतच्या प्रवासात तिथल्या लोकांचा राहणीमानातला आणि मूख्य म्हणजे त्याचा भाषेतला फरक आम्हला जाणवत होता. महाराष्ट्रात मराठी भाषा हि तर २० किलोमीटर ने बदलते.तिथली भाषा गावरान होती आणि त्यांच्या भाषेत एक गोडवा आहे .म्हणूनच तर संत ज्ञानेश्वरानीं म्हंटलय "माझ्या मराठीचीबोलूकवतुकें..परीअमृतातेहीपैजा जिंके... ऐसीअक्षरेरसिकेमिळविना!!"

आम्हला गावातूनच दिसणार गोरखगड़ आणि मचिंद्रगदाचा सुळका आम्हाला खुनावत होता.रस्त्यालाच लागून हामिद पटेल यांच घर आणि टपरी आहे कित्तेक वर्ष ते ट्रैकिंग ला येणाऱ्या मंडळींची मनापासून स्वागत आणि सेवा करतायत ,तेथे जेवनाची आणि राहण्याचीसोय होते त्यांनी आम्हला कस जायच ते सांगतल मग त्यांनी त्यांचा मोबाइल नंबर आम्हला दिला त्याचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.


रस्त्याला लागूनच गोरक्षनाथांचं मंदीर आहे. त्याच्या मागून गडाच्या दिशेने पायवाट जाते. मंदिर मोठं अणि प्रशस्त आहे .आम्ही बाहेरुणच दर्शन घेऊन चालायला सुरवात केली मंदीरापासून पुढे आल्यावर लवकरच दाट झाडी सुरू झाली. पायवाट मात्र स्पष्ट व मळलेली होती. पण बरीच अरुंद होती. काही अंतर पुढे गेल्यावर खडा चढ सुरू झाला. गाव आणि रस्ता मागे दूरवर दिसत होते आणि समोर नजारा दिसत होत होता.मच्छिंद्रगड आणि गोरखगड हे दोन पर्वत एकमेकांसमोर उभे राहिलेले दिसत होते. बाजूला भरपूर डोंगर आणि दरीसुद्धा. पाऊस पडून एक महीना उलट ला होता म्हणून अजुबाजूच् गवत सुकलेल होत थोडं थांबत थांबत आणि फोटो घेत घेत समोर जात होतो. हळुहळु बराच तीव्र चढ सुरू झाला. आणि सलग होता. एक मोठा चढ पार करून झाल्यावर मग दोन तीव्र उतारसुद्धा लागले.पायवाटेत जागो जागी ट्रेककर्स चुकु नये म्हणू भगव्या रंगचा बानाचे निशान दाखवले आहेत त्याचा नक्की फायदा होतो सुरुवात केल्यापासून जवळ जवळ तासाभराने एक चढ बराच तीव्र लागला. मग मात्र काही वेळ बसून आराम केला.

मग परत चढायला सुरुवात केली. तीव्र चढ असल्यामुळे पायवाटेला लागून असलेल्या झाडा- झुडूपांना व झाडाच्या मुळांना हाताने धरून चढावं लागत होतं. धापा टाकत व दम घेत घेत एकदाचा एक मुख्य चढ पार केला व समोर थोडा सपाट भाग आणि कालभैर वाच मंदिर लागत, मंदिराच्या समोर शंकराची पिंडी आहे कालभेरावसमोर त्रिशुळ आहे, बाजुलाच महराष्य्र पर्यटन चा बोर्ड लावलाआहे.रणरंत उन असून सुद्धा तिथल्या हवेत गारवा होता.समोर एक पिपलाचा डेरेदार झाड आहे . तिथून पुढे गडाचा मुख्य  सुळका चालु होतो...

इथून पुढचा ट्रेक हा निव्वळ रॉक क्लाइंबिंग .अर्थात पाय-यासुद्धा होत्या. पण पुढे पुढे त्या तुटक होत गेल्या व त्यामध्ये अंतरही खूप जास्त होतं .  प्रथमच आम्ही एक सरळ कातळामध्ये रॉकक्लीम्बिंग चा थरार अनुभवला .प्रथम मी आणि नंतर माही आणि नंतर समीर ने कातळ पार केला . त्यात माझा आणि समीर ला थोड़ी जख्म झाली.अनुभव थरारक होता मग मात्र पायरयनि पुढे जाण्यास सुरुवात केली.... इथून पुढे सर्व रस्ता दगडांच्या स्वरूपातच आहे. मध्ये मध्ये पाय-या व जिन्यासारखी रचना आहे. पण ते तुटलेलेही आहेत. शिवाय मागे काही आधार नाही, एकदम दरीचं एक्स्पोजर आहे.आतपर्यन्त चढताना तितकी अडचण आली नाही ,उतरताना कसं होणार, ही भिती मनात होतीच. दगडी तुटक पाय-यांमधून चढून वर गेल्यावर किल्ल्याचं प्रवेशद्वार लागतं.त्याला भगवा रंग दिला आहे.एका मोठ्या खिडकीसारखं ते आहे. तिथून आत जाऊन परत वर जाण्यासाठी दगडी वाट मिळते. तिथेच ब्राह्मी लिपीत काही शिल्प कोरलेली आहे. तिथून मछिंद्र गडाचा नजारा दिसत होता, थोडा विश्राम करुण पुढे निघालो .

दगडी पाय-यांचा पॅच लवकरच पूर्ण करून किल्ल्याच्या माथ्याच्या पायथ्याजवळ म्हणजे मुख्य सुळक्याच्या प्रारंभिक उंचीवर पोचलो. तिथेच गोरक्षनाथांची मुख्य गुंफा आहे.पाच सहा दगडी पायरया उतरून गुंफे मधे पोहचतो समोर जवळच मच्छिंद्रगड दिसत होता..... आणि बाजूला सर्वत्र नितांत सुंदर नजारा आणि दरी..... आसपास सर्वत्र सह्याद्रीचे पर्वत सखे दिसत होते.....इथे बरंच दगडी बांधकाम केलं आहे . गुहा खुप मोटि आहे त्यला पाच सहा दरवाजे आहेत आत नवनाथचे फ़ोटो लावले आहेत, गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत.गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.गुहेतून निघाल्यावर लगेचच एक पाण्याचं टाकं लागतं. त्यातील पाणी हिरव्या रंगाचं दिसत होतं. पण अधिक महत्त्वाची गोष्ट ही होती, की त्याच्या उजव्या बाजूने पायवाट जात होती आणि त्या पायवाटेपासून दरी  जेमतेम दोन फूटभर अंतरावर होतं.... इथून पुढे नजारा व चित्र कसं असणार आहे, ह्याचा अंदाज त्या वाटेवरून येत होता. जवळ पास एक तासांच्या वरती चाल्यमुळे जो थकव आला होता तो इतल्या निसर्गरम्य आणि गोरखनाथंच पदपर्शाने पावन झालेल्या परिसरात नाहिसा झाला . आता मात्र आम्ही विश्राम करायच ठरवल, जवळच्या एका पिण्या योग्य असलेल्या पानी टाके मधून पानी पिऊन थंड झालो ,ग्लुकोन् डि आणि केळी  खाऊन निवाण शांततेत विश्राम केला.आता पुढे मार्गक्रमण करायच ठरवलं .
गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे यावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. पायऱ्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते. सरळ उभा चड आहे .एक पाय पुढे टाकून नंतर पुडच्या  पायरी मध्ये केलेल्या खचाचा आधार घेत घेत तो पॅच  पार झाला. पायरींवर खांचा केल्यामुळे वरती चडन खुपच सहज होतो. माही ला बराच अनुभव असल्याने तो पटापट पुढे जात होता आम्ही दोघे मात्र सावध आधार घेत त्या  गडाच माथा गाठला .आणि सुटकेचा सुस्कारा टाकला . 

गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे.महादेवाचे वर गडापर्यन्त सुखरूप पोहचवला म्हणून आभार मानले.माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघात असा सर्व परिसर न्याहाळता येतो .तिघानि तो  परिसर नजरेत साठवून काढला.आणि फ़ोटो काढले . वरुण खालच्या परिसर स्पष्ट दिसतो अनेक ट्रैकिंग ला आलेले ग्रुप अगदी मुंग्या रांगेने चालेले दिसत होते.आता आम्ही महादेवचा मंदिराला लागुणच बसून आईने दिलेल्या फराला वर ताव मारला आणि थोडा विश्राम करुण परतीच मार्ग पकडला. आता मात्र उतरण्याच् आव्हान आमचा समोर होत.
आता आम्ही हळू हळू उतरन्यास सुरवात केलि सुरवातीला पायरय  उतरताना थोडी भीति वाटत होती नंतर मात्र पायर्यांना  केलेल्या खाचा आणि कातळाचा आधार घेत आम्ही मुख्य गुहेपर्यन्त पोहचलो.तो पॅच पूर्ण करताना खालची दरी अगदी स्पष्ट दिसत होती मनातच ज्याने कोणी खाचा करून ठेवल्या होत्या  त्याचे मनापासून धन्यवाद मनात होतो. जवळपास वीस मिनिटाचा पॅच  नंतर मुखय गुंफेत  पोहचलो . आता गुहेमधे अजुन काही ट्रेक्किंगचे ग्रुप आले होते . पण त्या ग्रुपचे जे काही प्रताप चालु होते ते बघून खरच राग येत होता ,मोठमोठ्या आवाजाचे फटाके ते त्या गुंफे मध्ये लावत होते.अशा सर्व वागणुकी मुळे तिथे असलेल्या प्राणी पक्षांना नक्कीच त्रास होतो फटाक्यंचा ठिनगी मुळे वनवा लागायचा धोका पण नाकरता येत नाही.तिथलि जी नीरव शांतता पूर्णपने भंग झाली होती आम्ही तेथे नथांबता पुढे निगालो, आपण जेवा आशा गड निसर्गाचा सनिधयत जातो तेव्हा  नेहमी लक्षात ठेवावा "  घेऊन यावेत ते  निसर्गाचा कुशीत घालवलेले सुंदर क्षण आणि ठेवून यावेत  फ़क्त पाऊल खुणा "

मुख्य गुहेपासून आता आम्ही नथांबता भराभर दोन्ही हातांच भार कातळावर देऊन  उतरन्यास सुरवात केली वाऱ्याचा वेग खुप कामी झला होता, त्यामुळे उतरून खूप सोप झालं होत . गडाचा दरवाजपर्यन्त पोहचलो तिथे थोडा विश्राम केला बरेच ग्रुप खालूंन येत होते, परत सवधगिरिने दगडाचे पँच पूर्ण करुण आम्ही गडाचा पायथ्याशी सुखरूप पोचलो.

आता पुढचा प्रवास आमच्यासाठी सोपा होता आता फक्त दुपारचा उन्हाचा त्रास होत होता , आणि पाण्याचासाठा सुद्धा संपल होत.अजूनही जमीन व रस्ता दूर दिसत होता. सभोवती झाडी व नजारा. पण दुपारच्या उष्ण झळा लागत होत्या.  असं झालं होतं कधी आम्ही मंदिरात पोहचतो . आता मात्र समीर चा भाषेत पायतल तेल संपल होत,महेंद्र त्यानी केलेल्या रात्रीच्या ट्रेक्किंचा आठवणी सांगत होता  . हळु हळु उतार कमी झाला; पायवाट सोपी होत गेली आणि झपाझप सुकलेल गवत  तुडवत आम्ही  एकदाचे गोरक्षनाथांच्या मंदीरात येऊन पोचलो!!!! समोरच रस्ता दिसत होता. 

मंदीरात थोडा वेळ टेकलो. विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतलं .  तिथेच भगवे वस्त्र परिधान आणि कानातमोठी कुंडल परिधान केलेल्या बाबांनी  पाणी आणून दिल . बराच वेळ तिथेच बसून राहिलो आणि मग खाली गावात पोचलो. हमीद पटेलांच्या येथे लिंबू सरबत घेतलं . तितुनच आम्हला मुरबाड कडे जाणारी बस भेटणार होती बराच वेळ आराम केला. थोड्याच वेळात बस आली आणि आमचा कल्याण कडचा प्रवास सुरु झाला ..... 


किल्याचे नाव: गोरखगड 

जाण्याचा रस्ता: कल्याण-मुरबाड-म्हसे-देहरी
पाहण्यासारखे: रॉक कॅलिंबिन्गचा थरार , मुख्य गोरखनाथांची  गुहा , दाट  अभयारण्य , पाण्याची तीन टाके , टोकावरचे महादेवाचे मंदिर . गोरखगडावरून दिसणारा मछिंद्र गडाचा सुळका . 

श्रेणी:  मध्यम ते कठीण 

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भीमाशंकर

ऊंची :२१३०फिट 

Friday, August 26, 2016

विकटगड : एक थरारक अनुभव ( Peb fort )



 ट्रैफिक, ऑफिस ,ईमेल टारगेट्स डेडलाइन अश्या रोजचि सिचुएशन  फेस करुन करुन अखेरीस ज्या दिवसाची  आठवडाभर वाट पहिली तो दिवस आला. फ्राइडे ला ग्रुप मधल्या बहुतेक जनानां सुट्टी असल्याने ट्रेकिंगसाठी जायच हे ठरल होत विकटगड
( पेब फोर्ट), नेरळ  हे भटकंती ठिकाण ठरले.सकाळपासून पावुसचि रिमझिम चालू झाली होती सर्व जमले कल्याण स्टेशन वरुण कर्जत ला जाणारी ट्रेन पकडली आणि भटकंती ला सुरवात झाली . ट्रेक्किंगचि आवड़ असणारे आम्ही १३  जन मित्र होतो.ट्रेन40मिंटात नेरल स्टेशन ला पोचली.सकाळी नाश्ता करताच बाहेर पडल्यामुळे सर्वानी स्टेशनचा बाहेर गरमागरम भजिपाव आणि वडापाव वर ताव मारला आणि पूठे नाश्ता साठी पार्सल घेऊन पेबला जाणारी ऑटो पकडली दोन ऑटो केल्या ऑटो मधे मस्ती करत फनसवाडी गावात पोचलो जवळ पास २०  मिंटाचा नागमोडि रास्ता आहे.

गावात पोचल्यवर समजल की गडावर फसव्या वाटा असल्यामुळे गाइड बरोबर निल्यास उत्तम,तितेच् गावातील एक तरुण साधारण २७  वय असलेला तरुण गणपत होले आमच्या सोबत येण्यास तयार झाला.रिमझिम पावुस चालूच होता,आत्ता "गणपति बाप्पा मोरया" बोलुंन आमची ट्रैकिंग ला सुरवात झाली,गावतुनच फेसळनारी आवाज करत वाहनरे  ओढे आणि धबधबे दिसत होते नयनरम्य दृश्य होतीसुरवातीलाच विजेचे तिन मोठे टॉवर लागतात ते लैंडमार्क समजावे ,सुरवतील वाट सरळ गडाकडे जाणारी नागमोडि वाट पुढे अवगड़ होत गेली,आत्ता आम्ही थोड्या उंचीवर पोचलो होतो वरुन गावातील विहंगमय दृश्य दिसत होत फेसळनारा लाल पाण्याचा ओढा आणि समोर हीरविगार शाल पांगरलेला डोंगरमाळ आणि 100 फुटा वरुण कोसळनारे धबधबे नजरेस येत होते अप्रतिम दृश्य होती

आता गाइड गणपत ने पायांचा वेग वाडवला होता आमच्या पण पायांचा वेग पण आम्ही वाडवला होता.आता जवळपास 30 min चालून सर्व जन थकले चढाई करताना निसर्ग सौंदर्य, विविध पक्षी त्यांचे आवाज ऐकत आमचे मार्गक्रमण सुरू होते. सह्याद्रीचे रौद्ररुप, कडेकपारी, खडतर वाट आम्ही पार करत होतो. शहरी कलाहोल, गजबज या सगळ्यापासून आम्ही दूर निसर्गाच्या सान्निध्यात जात होतो.जंगलातील काटे, झाडी, झुडूप अंगाला टोचत होते.सर्व जन थकल्या मुळे थोडावेळ आराम करून केळी आणि चिप्सवर ताव मारुन  चढाईला परत सुरुवात केली.

आता मेघराजाने जोरात बरसन्यास सुरवात केलि होती,जंगल आणि गडाकडे जाणारी वाट खुपच अवगड होत गेली अर्धा तास पायपिट केल्यानंतर वाट काळ्याकुट  दरडिवरून पांढराशुभ्र खळखळ आवाज करणाऱ्या  धबधबया जवळ  पोचलो  आता मात्र सर्वनि बैग्स जैकेट टाकून त्या उंचावरुन कोसळनार्या धबधब्यात मनस्तोक्त भिजन्यचा आनंद घेतला सर्व थकवा , भिजल्यामुळे निघुन गेला.अजुन बरेच अंतर पार करायचे असल्यामुळे थोडा विश्राम करुन परत गड सर करायला सुरवात केलि अप्रतिम सूंदर दृश्य नजरेत साटवत आम्ही पुढे  निघालो

मुलांची मस्ती चालू होती पण आता वरूनराजा ने जोरात बरसन्यास सुरवात केलि त्यात सोसटयाचा वारा , वाट पन अवघड झाली होती आता सर्वाना सवधगिरीने  चलण्यची सुचना आम्ही  देत होतो  .पाउसाचा वेग वाढतच होता असाच मेघराजा दिवसभर बरसला तर गड चढणे  अवगड़ होइल याची काळजी सर्वांच्या  चेहरयवर दिसत होती . किती वरती आलो यासाठी वळून पहिल , पण धुकयमुळे काहीच दिसत नव्हते सपूर्ण परिसर जणू दाट धुक्यात हरवला होता , गड सर करताना धुक्यानमुळे आपन ढगांमधे आल्याचा फील आल्याशिवाय राहत नाही .आता गडाची उभी चढ़ाई सुरु झाली अरुंद एकेरी वाट दोन्ही बाजूला खोल दरी चुकून जरी पाय सटकला तर ?विचार करुण अंगावर शहारा येतो  , चिकाळलेल्या वाटे वरुन चुबुक चुबुक करत चालतान पाय सटकत होते पण मजा येत होती चालताना आता बराच वेळ चाल्यानंतर समोरच दृश्य होत तुळतुळित कातळ अणि त्यावरची शेवाळी आणि आता तो कातळ चडून  पार करायचा होता सर्वात आधी  गणपत वरती चढला मग त्याने एकएक करत  सर्वाना वरती घेतले , येते गणपतचा अनुभव पुरेपूर कामी आला.

पुढे जवळपास अर्धा  तास अवगढ एकरी गडवाट चल्यानतर पेब गडावरचा स्वमि समर्थांचा मठ लागतो मठ म्हनजे गडावर एक गुंफा आहे समोर खोल दरी,गुंफा एका मोठ्या कातळात कोरली आहे दरवाजावर "श्री" गणेशांची मूर्ति कोरली आहे आत शंकराची पिंडी आणि शिवाजीमहाराजांची मूर्ति आहे बाजुलाच "स्वामी समर्थंचि" चित्र आणि काही स्वामीचे श्लोक गुंफे चा भिंती वर रेखाटलेली आहेत साधारण ४०  माणसे सहज बसतिल एवढी जागा आहे,सर्वानी महाराजांना मानाचा मुजरा केला आणि स्वामी ना नमस्कार केला.बाहेर मेघराजने रोद्र रूप धारण केले होते , सर्वांनी  आता विश्राम करायचे ठरवले घरी सर्वांनी  सुखरूप पोचल्या चे कॉल करुण सांगतलेआता मात्र सर्वांनाच जोरदार भूक लागली होती, आईने दिलेल्या भाकरी सोबत शेगदान्यचि चटनी आणि कांदा याची चव अप्रतिम लागत होती सर्वनिच ताव मारला , सर्व जन भिजुन चिंब झाले होते हवेतला गारवा जाणवत होता शहरी कलहोला गजबज यापासून  आम्ही खुप दूर निसर्गाचा सनिध्यात होतो खुप सुंदर अनुभव होता आता आम्ही पुढे निघालो

आता गडावरील मंदिरा कड़े जाणारी पायवाट धरली अगदीच अरुंद आशा त्या वाटेवरुन एकवेळी एकच जन जाईल एवडीच वाट आहे एकमेकां ना आधार देत वाट पार झाली , आता पुढे गडाचा बुरुज संरक्षण भिंत आली ति पार करायची होती , भिंत पार करायल लोखंडी पायरया आहेत पाउसाने खुपच जोर धरला होता पायरींवरुन जोरदार पाणी आणि माती  येत होती आणि सुसाट वारा सुटला होता बुरुज पार करन अवघड झाल होत गणपत पुढे चडला बकीचे पण कसेबसे चडले पण निखिलची चडताना पुरेपूर दमछाक झाली  पाटिमागे मी, लहू आणि अनिल होतो शेवटी "महाराजांच" नाव जोरात घेण्यास आम्ही सुरवात केलि आणि कसबसा तो बुरुज पार झाला, महारांजच नाव घेतल्यावर अंगातल रक्त सळसळ याचा प्रत्यय आज सर्वाना आला.खुपच भयानक अनुभव आला "बाप्पा" चे नाव घेऊन मंदिराकडचि एकपदरि वाट धरली.

आता पुन्हा एक लोखंडी पायरय लागल्या त्या पण सवधगिरिने पार केल्या आणि आम्ही गडावर्च सर्वात उंच जागी पोहचलो ,तिथले निसर्ग सोंदर्य बघून सर्वांचा थकवा पळून गेला .वरती सुंदर चार खांब आणि गोल घुमट असलेलं  टूमदार  मंदिर आहे मंदिर छोटेसेच आहेमंदिराच्या मध्यभागी स्वामींच्या  पादुका आहेत समोर एक भगवा फड़कत आहे जणू तो मराठयाचां ४०० वर्षांचा इतिहास सांगत कित्येक वर्ष ताट उभा आहे उन्ह पाऊस  झेलत.

पावुस आणि वारा यानि रौद्ररूप धारण केल होत त्यात धुक खुपच दाट झाल 10 फुटावरच पण नीट नजरेला येत नव्हतं.आता आम्ही २०८२  फ़ीट उंचावर होतो  पूर्ण डोंगरमाळ नजरेत होत दाट धुक्यामुळे आम्ही ढगांमधे असल्याचा फील येत होता पण एक खंत होती पाउसामूळे अणि दाट धुक्यामुळे आम्ही वरुन दिसणारे  धबधबे ,चंदेरी गड ,प्रभलगड़ मिस केले आणि अजुन एक होत की पाऊस असल्याने आम्ही निसर्ग सौंदर्य  कॅमेरा मधे बंदिस्त करू शकलो नाही तरी पण सर्वानी  मिळून  एक सेल्फ़ी घेतल आणि गड सर केल्याचा आनंद साजरा केला.

"महाराजांना" मानाचा मुजरा आणि "स्वामी समर्थना" दंडवत घालून आम्ही विकटगड माथेरानच्या दिशेने  उतरायला सुरुवात केली. उतारावर मुरमाड वाटेमुळे घसरगुंडी करून घेत पायथा गाठला तेव्हा आभाळ पूर्णपणे भरून  ढगांचा कडकडाट झाला. आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मनमुरादपणे कोसळणा-या पावसात चिंब भिजत आम्ही परतीची वाट कापत होतो. प्रत्येक पावलागणीक आजच्या दिवसातला प्रत्येक क्षण आपणहूनच मनाच्या एका "स्पेशल" कप्प्यात चालला होता. पावसाचा खेळ कमी झाल्यावर जेव्हा आम्ही माथेरान कडे जाणाऱ्या एकपदरि वाटेवर होतो आणि वारयची जोरदार  झूलुक आली आणि सर्व धुके नाहीस झाल आणि आम्हला खोल दरितला सुंदर दृश्य नजरेस आल  सर्वांनी  थांबून त्या दृश्य चा आनंद घेतला.

आता आम्ही खाली उतरत होतो, आता माथेरान चा ट्रैक गाठायचा होता पाऊले पटापट टाकत आम्ही उतरतीचा बुरजाच्या इथे पोचलो तो पण हळूहळू पार झाला निसर्ग सौंदर्य खुपच सुंदर होत एका बाजूला डोंगररांग त्यावरून स्वताला झोकुन देणारे धबधबे त्यात भिजन्याचा आनंद आम्ही  घेत आम्ही माथेरांचा मिनी ट्रेन चा ट्रैक गाठलाट्रैक वर  जायचा आदि छोटस गणेशाच मंदिर आहे आणि एक घंटा आहे जणू सर्वांनी  ति जोरात वाजवून ट्रैक सुखरूप  पार केल्याचा आनंद साजरा केला. आता गणपत इतून दुसऱ्या मार्गाने त्याचा  घरी जाणार होता त्यचासोबत सेल्फ़ी घेऊन आणि आभार मानून गणपत चा निरोप घेतला ,त्याचा शिवाय गडसर  करन शक्य न्हवत,गणपत ने संगीतल्या प्रमाणे  आम्ही मिनिट्रेन चा ट्रैक पकड़त दस्तूरी नाकयकडे पुढे निगालो पाऊस आता ओसरला होता.आता आम्ही  अजस्त्र डोंगररांग मधून वाट काढलेल्या ट्रैक वरुण चालत होतो सोबतीला होता घोंघावणा-या वा-याचा आवाज...त्याच्या तालावर डोलणारा  हिरवाकंच आसमंत...उंच कड्यावरून स्वत:ला दरीत झोकून देणारे पांढरेशुभ्र धबधबे ..हे दृश्य वेडावून टाकनारे होते!!!!!

फोटोशूट करत आम्ही दस्तूरी नाक्यापर्यन्त पोचलो तितले सौंदर्य पण वेगळे होते , घोड़यंचा सफारी ,डांबरी  रस्ता, टूमदार हॉटेल्स ,मेनी आणि तितली माकड़ आणि त्यंचा मार्केटलीला... पुढच्या टपरी वर गर्मागर्म चहा पिउन आम्ही महाराष्ट्र पर्यंटन च्या  स्टॉप ला पोचलो तिथून ट्रेक्स करुंन नेरळला पोचलो ट्रैक सुखरूप पार झाल्याचा खुप आनंद होत होता ,आमची ट्रैकिंग सुंदर बोलण्यापेक्षा थरारक जास्त होती!!! आता ट्रेन आली आणि सर्वांनी  थकलेल्या अवस्थेत  ट्रेन पकडली सर्वांनीच  सिट पकडल्या आणि परतीचा प्रवास सुरु झाला....

विकटगडावरील मंदिर . 





किल्याचे नाव: विकटगड़  (पेब फॉर्ट )


जाण्याचा रस्ता: नेरळ-फनसवाडी -माथेरान 

पाहण्यासारखे: स्वामीच मठ ,बुरुज,गडावरचे मंदिर ,धबधबे,माथेरान छे सौन्दर्य

श्रेणी: सोपी ते मध्यम

ऊंची :२१०० फिट .