Showing posts with label fort. Show all posts
Showing posts with label fort. Show all posts

Saturday, June 9, 2018

हरिहर गड - वास्तुस्थापत्याचे सौंदर्य

     नाशिक !!! किल्यांचा प्रदेश ...  नाशिक जिल्यात एवढे किल्ले तर नक्कीच आहेत कि आपण संपूर्ण किल्ले फिरायचे म्हंटले तर दर वीकएंड ला एक ट्रेक केला  तरी एक महिना आपणाला पुरणात नाही आणि नाशिक जिल्ह्यतील सर्वच किल्ले म्हणजे बुलंद , अवघड या श्रेणी मध्ये मोडणारे, किल्ला सर करायचं म्हंटल कि २ ते ३ तासांची तांगडतोड करावी लागणारच . बरेच दिवस ऑफिस आणि PC च्या जगात घालवल्यावर आता ओढ होती सह्यद्रीची बऱ्याच दिवसापासून हरिहर या किल्यावर जाण्याची इच्छा होती काही कारणास्तव जाणे होत नव्हतं .शेवटी योग  आला ऑफिस वरून शिफ्ट नंतर बॅगा भरून रात्री ११.५० ची कसाऱ्याला जाणारी लोकल पकडली आणि मोहिमेची सुरवात झाली , यावेळी बरेच रोजचे साथीदार नव्हते.  लहू ,तन्मय आणि मी रोजचे आणि विजय , सचिन , हॅरी आणि आशिष हे नवीन चार जण मिळून आम्ही ७ जण होतो . कसाऱ्याला १.५० चा दरम्यान पोहचलो कसाऱ्या वरून मी आधीच हरिहर ला जाणयासाठी  गाडी बुक केली होती .


सकाळच्या मंद प्रकाशात दिसणारा हरिहरगड
रात्री २ वाजता हरिहर गडाच्या पायथ्यला असलेल्या निरगुनपाडाया   गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला .५० किलोमीटरचा हा प्रवास होता . मध्ये एका हॉटेल मध्ये थांबून एक फक्कड चहा झाला आणि पुन्हा प्रवास चालू झाला .  निरगुनपाडा गावाच्या जवळ जवळ पोहचलो आणि रांगडा गड रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात दिसू लागला. गावात बरीच ट्रेकर मंडळी आली होती. 

 गावात पोहचल्यावर गावात जेवणाची आणि नाश्त्याची सोय करायची होती .  गावात पोहचून गाडीवाल्या ओळखीच्या एका दादांना जेवणाची आणि नाश्त्याची सोय केली आणि मग सर्वचजण रस्त्यावरच बसून गप्पा मारू लागले , मोकळ्या आभाळाकडे बघत चांदण्या न्हाहळत  गप्पा मारण्याचा अनुभव काही औरच होता. गप्पा मारत मारत सकाळचे ५ कधी वाजले समजलंच नाही . गावातल्या दादांकडे पोहे आणि चहा चा नाश्ता करून आम्ही किल्याचा दिशेने प्रवास सुरु केला . 

किल्याचा उजवीकडे चालत राहा असा सांगणारा दिशादर्शक 
डांबरी रस्ता  ओलांडून शेताच्या मळ्यातून रस्ता किल्याकडे जातो .साधारण हा दोन ते तीन तासाचा सोपी श्रेणीचा ट्रेक आहे पण , ८० डिग्री असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या मुळे हा गड मध्यम  श्रेणी मध्ये मोडतो. प्रवास सुरु झाला आणि किल्याचा डाव्या बाजूला जायला आम्ही सुरवात केली पण  , गावातले एक आजोबा भेटले आणि त्यानी सांगितलं कि तुम्ही वाट चुकलायत , डाव्या बाजूने नका जाऊ उजव्या बाजूने जा तेव्हा तुम्ही मुख्य पठारावर पोहचाल. किल्याकडे जाताना नेहमी उजव्या बाजूने चालत जावे. सुरवातीला झाडा झुडपात जाणारी सोपी वाट आता अवघड होतचाली होती .एक ट्रेकर ग्रुप वाट चुकून एका उंच कातळ मध्यावर अडकले होते त्याना आवाज देऊन मुख्य  वाटेस  मागे येण्यास सांगितले आणि आमचा प्रवास सुरु केला .मे महिना असल्यामुळे वाटे मध्ये करवंद आणि आंबे हा गावरान मेवा मानस्तोक्त खात खात प्रवास चालू होता .
कातळामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या 
गावापासून बराच लांबचा टप्पा पार केला आणि सहयाद्री ची अजस्त्र रांग दिसू लागली ..दीड  तासा मध्ये आम्ही मुख्य पठारावर पोहचलो .पठारावरून आपणाला आपल्या उजव्या बाजूस फणी हा एक नागाच्या फण्यासारखी सुळका असलेला डोंगर दिसतो आणि त्याचा बाजूस भास्करगड दिसतो  .बराच वेळ आराम आणि फोटो काडून  झाल्यावर मुख्य दगडी पायऱ्याकडे जाणारी वाट पकडली .  हि वाट अवघड आहे ,उन्हा मुळे माती निसरडी झालेली त्यामुळे  पाय अगदी जपूनच टाकावा लागत होता.
सरळ पायऱ्या 
थोड्याच वेळात आम्ही हरिहरच खास वैशिष्ट्य असलेल्या कातळपायऱ्याच्या जवळ पोहचलो.कितीवेळ तरी एकटक त्या पायऱ्यांकडे  फक्त बघतच रहावं असं सौन्दर्य या पायऱ्यांच आहे. बराच वेळ इथे पायऱ्यांचा  पायथ्याशी घालवल्यावर एक एक करून आम्ही चढाईला सुरवात केली. एका वेळी एकच जण वरती जाईल एवडीचं वाट आहे .प्रत्येक पायरी मध्ये केलेल्या खोबणी मुळे चढाई सुखरूप होते . सावधगिरीने चढाई केली कि आपणाला दोन बुरुजांमध्ये असलेला महादरवाजा लागतो .भगवा शेंदूर फासलेला महादरवाजा पार झाला कि गणेशाची सुंदर कोरीव मूर्ती कातळात कोरलेला आहे. इथून पुढे जाणारा मार्ग म्हणजे अचंबित करून सोडणार आहे ,दगडी कातळामध्ये कोरलेला अर्ध वर्तुळकाळ भुयारी मार्ग म्हणजे आश्चर्यच ! इथून आपणाला भास्करगड , फणी डोंगर दिसतो.  पुढे चालत गेलो कि परत आपणाला ६० ते ७० वरती जाणाऱ्या एकेरी पायऱ्या लागतात .हरिहर गड म्हणजे वास्तू स्थापत्याचा अप्रतिम नमुना एक आश्चर्य संपलं कि पुढे एक आश्चर्य पुढे आहेच ... आम्ही सर्वानी सावधगिरीने कातळातमधील  हा मार्ग पार करून .दुसऱ्या भग्न दरवाजातून आम्ही  मुख्य पठारावर येऊन पोहचलो. 
ब्रह्मगिरी पर्वत रांग 
किल्यावर जास्त काही अवशेष शिल्लक नाही आहेत . आपणाला पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो  .काठावरच हनुमानाची शेंदूर फसलेली सुंदर मूर्ती एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहे .  त्याचाच बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी च दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो . वाटेत आम्हला वाड्याचे काही अवशेष दिसले ते पाहत आम्ही पुढे गेलो . तसच पूर्वेकडे चालत गेलो कि आपणाला लागते सुस्थितीत असलेली एक खोली लागते.  या खोलीचा वापर पूर्वी दारुगोळा साठा ठेवण्यासाठी किंवा धान्यसाठा ठेवण्यासाठी होत असावा . गडावर राहायचं म्हंटल तर या इमारतीमध्य १० ते १५ जणांची राहण्यासाठी सोय होऊ  शकते . ऊन बरंच वाढलं होत खोलीच्या सावली मध्य बराच वेळ बसून गप्पा मारल्यानंतर आम्ही पुढे किल्यावरच्या सर्वात उंच ठिकाणी निघालो . गडाच्या या टेकडीवर चढताना मात्र रॉक पॅचिंगच थ्रिल अनुभवायला आपणाला मिळालं . वरती चढताना मात्र सर्वांचीच दमछाक झाली. टेकडीवरचा उंच भगवा फडकताना पहिला कि मराठ्यांचा इतिहासाची आठवण होते आणि अंगात वेगळाच उत्साह संचारतो .सर्वजण वरती चढले  आणि सर्वानी महाराजांच्या नावाचा गजर  करत एकच जल्लोष केला. आमचा रोजचा विडिओ सेल्फी घेऊन झाला .
मोकळ्या अंगणात केलेलं जेवण 
वरून आपणाला उत्तरेला दिसते  ब्रह्म गिरी पर्वत रांग , दक्षिणेकडे वैतरणा नदीचं खोर फार मनमोहक दिसत , शेजारी भास्करगड आणि फणी डोंगर दिसतो. आम्ही  चढाईला फारच उशीर केल्यामुळे खूप जास्त वेळ झाला होता मग , उतरताना पटापट उतरायचं ठरलं. उतरताना सुद्धा ८०डिग्री पायऱ्यांमुळे  हरिहरचा ट्रेकचा  थ्रिल अनुभवायला मिळतो . उतरताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि थोड्याच वेळात परत  मुख्य वाटेवर आलो आणि १ ते १. ३० तासामध्ये गावात पोहचलो . गावा मध्य जेवण तयारच होत ,मग जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. कातळातील पायऱ्यामुळे उतरतानाही ट्रेकच  भन्नाट थ्रील देणारा हरिहरचा  ट्रेक चिरस्मरणीय ठरतो .
महादरवाजाच्या इथे काढलेला सेल्फी 



किल्याचा इतिहास - हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिकला. 


किल्ला हरिहर - हर्षगड

तालुका त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक

उंची - ११२० मीटर

चढाई श्रेणी - मध्यम

योग्य कालावधी - सपेंबर ते फेब्रुवारी ( भर पावसात हा ट्रेक करू नये )

हरिहर गड ला कसे जाल - मध्य रेल्वेने कसारा या स्टेशन पर्यंत पोहचावे . तिथून आपणाला बस किंवा खाजगी वाहनाने निर्गूणपाडा या गाव मध्य जाऊ शकतो

खाजगी वाहन आधीच बुक करण्यासाठी
प्रकाश - ९८२३९८६२३३   ( private  गाडी साठी यांना संपर्क करा )

आमची भटकंती बघण्यासाठी आमच्या youtube  चॅनेल ला subscribe करा .




Wednesday, November 29, 2017

मराठयांचा पराक्रमाची साक्ष देणारा - वसईचा किल्ला / Vasai fort

  जलदुर्ग आणि भुईकोट या दोन्ही प्रकारात मोडणार वसईचा किल्ला ,पश्चिम रेल्वे स्टेशनचा वसई जवळच असणारा हा किल्ला आजही मराठयांच्या  चिमाजी आप्पा यांचा पराक्रमाची साक्ष आजही देत उभा आहे . सकाळी डोंबिवली वरून मी ,लहू आणि तन्मयने ५. ३३ वाजता सुटणारी डोंबिवली ते विरार ट्रेन पकडून थेट वसई गाठले आणि पुढे मग वसई महानगरपालिकेचा १०५ नंबरच्या बसने किल्लाबंदर स्थानकावर उतरलो , १५मिनीटांच्या प्रवासानंतर बस आपणाला थेट किल्याचा आत मध्ये घेऊन जाते . 
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23559796_1416616511782410_785332928150219820_n.jpg?oh=0e5281243faa1324d829fabc7ab89488&oe=5A8E8BAF
मुख्य कोरीव दरवाजा
गडाचा विस्तार हा खूपच मोठा आहे संपूर्ण गड  फिरावयास आपणास साधारण २ते २. ३० तास लागतात .किल्ला पाहण्यास कुठून  सुरवात करावी हे आम्हांला कळत  नव्हते म्हणून एका रिक्षा वाल्यास विचारल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे मुख्य दरवाजा पासून आम्ही सुरवात केली. दरवाजातून आत गेल्यावर आपणाला पायऱ्या लागतात यातूनवर तटबंदीवर गेल्यास आपणाला गडाचा संपूर्ण परिसर पाहावयास भेटतो ,तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे . किल्याला एकूण दहा बुरुज आहेत त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदियाम रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय. चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत. पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे. येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे. सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज. किल्ल्यामध्ये एकूण तीन चर्च आहेत .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23435202_1416615718449156_678409274660305329_n.jpg?oh=e667048e14754584e41b78c8521347fe&oe=5ACCE9C5https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23472726_1416615991782462_2399303751600333268_n.jpg?oh=6d4812544ac3669c9a8181d3482a671d&oe=5AD03D59

 किल्याचे प्रत्येक भाग पाहताना आपणास किल्ले बांधणाऱयांचे कौतुक करावेसे वाटते आणि आश्चर्य वाटत . गडावरच्या आतमधला परिसर विस्तीर्ण आहे यात एक विहीर आहे ,आतमध्ये एक आपणास तळे  आणि दोन विहिरीसारखे चौकोनी अवशेष असलेला चौथरा आहे. आम्ही एका चर्चसारखया इमारतीजवळ पोहचलो येथे आपणास एक बुरुज लागतो या बुरुजाच्या पायऱ्या सुस्थतीत असल्यामुळे आपण बुरुजाच्या शेवट्पर्यंत जाऊ शकतो . आम्ही वरती पोहचलो येथून दिसणारा समुद्र किनारयाचा नजारा  अप्रतिम दिसतो आणि  आपण किल्याचा संपूर्ण  परिसरहि  पाहू शकतो . या बुरजामुळे समुद्रामधून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवले जात असे . किल्याचे बांधकाम हे रोमन स्थापकलेचा वापर करून बांधलेलं आहे .एखाद्या चर्च प्रमाणे यातील इमारतींचे बांधकाम केलेले आहे .  सण १४१४ साली मध्य भंडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा  किल्ला बांधला पुढे पोर्तुगिजाने हा किल्ला जिंकून याचे बरेचसे पुनर्बांधकाम केले ,दहा वर्षाच्या कालावधीत त्यानी हे बांधकाम पूर्ण केले
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23473103_1416616431782418_6471311287708567872_n.jpg?oh=bf791737bf77bd427273ea7b998655df&oe=5A8A9816https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23472014_1416615765115818_5143508420064194966_n.jpg?oh=fc8a121539552b3446084e7d1b560c22&oe=5AD22F2B
किल्याच्या आतील तळ आणि सुंदर इमारतींचे अवशेष
जवळपास आम्ही संपूर्ण किल्ला पाहून झाल्यावर आम्ही किल्यामधल्या  पेशवेकालीन वज्राई देवीच्या मंदिरात पोहचलो . चिमाजी अप्पा यांनीया देवीला नवस केला होता कि आम्ही हा किल्ला जिंकलो कि यामंदिराचा जीर्णोद्धार करू ,मग चिमाजी अप्पानी हा किल्ला जिंकला आणि चिमाजी अप्पा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला . 
आम्ही मंदिरात पोहचलो तेव्हा मंदिराचे पुजारी देवीस वस्त्र नेसवत होते ,त्या मुळे  आम्हला देवीचं दर्शन घेता आले नाही ,आम्ही बाजुचा नागेश्वर मंदिरात शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले . मंदिराच्या गाभऱ्यात शंकराची पिंडी आहे घाबरायचं चौकटी वर आपणास गणेशाची मूर्ती कोरली आहे ,मंदिराच्या एका बाजूच्या भिंतीवर गणेशाची रिद्धी सिद्धी ची मूर्ती आणि एका बाजूस देवीची मूर्ती कोरली आहे . पिंडीच्या समोर महादेवाच्या नंदीची सुबक मूर्ती आणि दगडात कोरलेला कासव आहे . 
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23376259_1416615921782469_91471680613488202_n.jpg?oh=57b25b184af3d1f75e64e10c73ef3942&oe=5A99E1C9
टेहळणी बुरुज
बराच वेळ मंदिराच्या शांत परिसरात वेळ घालवल्या नंतर आम्ही किल्ल्याचा  दर्या दरवाजाकडे निघालो दरवाजाचे बुरुज अजूनही सुस्थतीत आहेत  ,पण लाखडी दरवाजा हा मोडकलेल्या अवस्थेत आहे . येथून पुढे समोर चालत गेल्यावर आपण समुद्राच्या बंदरावर जाऊन पोचतो ,किनाऱयावर  मच्छिमार कोळि लोकांची लगबग चालू होती . थोडावेळ येथे फिरून आम्ही चिमाजी अप्पांच्या वाड्याकडे निघालो.चिमाजी अप्पांच्या वाड्यामध्येच पुरात्तव विभागाने हे स्मारक बांधले आहे . बाजूलाच चिमाजी अप्पांचा वाड्याचे अवशेष लागतात . वाडा खूप मोठा आहे . वाड्याचा आणि सुपूर्ण किल्ल्यामध्ये ताडीची झाडे खूप आहेत .या परिसरात फिरताना आपणास चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची आठवण  आल्याशिवाय राहत नाही .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23319162_1416616078449120_2130858257811400593_n.jpg?oh=59b5ee13415e9096d0e0efd9539b8201&oe=5ACCDC3Bhttps://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23435061_1416616311782430_4781297620595681226_n.jpg?oh=673c7d9372a0470be81536914212e85e&oe=5A8EA07C
इ. स १७३७ साली मराठयांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसला मग पुढे बाजीराव पेशव्यांनी हि मोहीम चिमाजी अप्पांवर सोपवली १७३८ साली चिमाजी अप्पानी मोहीम आखली . चिमाजी अप्पानी किल्याचा दलदलीच्या बाजूनी हल्ला करावयाचे ठरवले ,तटाच्या  उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सेन्य हरहर महादेव करत आत शिरले , दोन दिवस चालेल्या या पोर्तुगाच्या विरुद्धचा लढाईत पोर्तुनगांचे ८०० जण मारले गेले , मराठयांची हि बरीच हानी झाली . पोर्तुगाचं दारुगोळा संपला आणि ते मराठांशी शरण आले ,मराठ्यनी बायकापोरांना  सुखरूप बाहेर जाऊ दिले ,आणि मराठ्यांनी किल्ला सर केला भगवा फडकला .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23380407_1416615811782480_6637866781104477269_n.jpg?oh=dbbb9ab3bc82c86317ab31f91b472318&oe=5A94DCA5
नरवीर चिमाजी अप्पा स्मारक
बराच वेळ किल्यावर भटकंती केल्यावर आम्ही पुन्हा बस पकडून वसई स्टेशन वर पोहचलो आणि मग ,विरार -कोपर ट्रेनने मुंबई गाठली . 


किल्याची सद्याची परिस्थिती : 
स्वान्त्र्यनंतर या किल्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही ,किल्यावर माजलेले रान आणि मोठमोठी झाडे या मुळे किल्याचे बुरुज ठसलेल्या अवस्थेत आहेत , सद्य पुरात्तव  विभागाने या किल्याचे डागडुगीचे काम हाती घेतले आहे ,किल्यावर सध्या प्री -वेडींग फोटोग्राफी करणाऱ्या जोडप्यांचा  फारच सुळसुळाट असतो . सोबत येणारे प्रेमी जोडपे यामुळे आणि त्याचा वावर या मुळे आपण किल्याचा पराक्रम विसरत चालो आहोत एवढे मात्र नक्की . 
पुरातर्न विभागाने याकडे लक्ष देऊन किल्याचे ऐतिहासिक महत्व राखण्यासाठी जागोजागी माहिती फलक लावले पाहिजे . आणि प्री वेडिंग फोटोग्राफी वाल्याकडून पैसे चार्जे करून त्याचा उपयोग किल्याचा डागडुजी साठी करावा हीच अपेक्षा .

संधर्भ : https://mr.wikipedia.org

आपल्या चॅनेल वरील वसईचा किल्ला वलॉंग नक्की पहा.

धन्यवाद !
अंकुश सावंत. 
+९१ ९७६८१५३११४

Friday, August 26, 2016

विकटगड : एक थरारक अनुभव ( Peb fort )



 ट्रैफिक, ऑफिस ,ईमेल टारगेट्स डेडलाइन अश्या रोजचि सिचुएशन  फेस करुन करुन अखेरीस ज्या दिवसाची  आठवडाभर वाट पहिली तो दिवस आला. फ्राइडे ला ग्रुप मधल्या बहुतेक जनानां सुट्टी असल्याने ट्रेकिंगसाठी जायच हे ठरल होत विकटगड
( पेब फोर्ट), नेरळ  हे भटकंती ठिकाण ठरले.सकाळपासून पावुसचि रिमझिम चालू झाली होती सर्व जमले कल्याण स्टेशन वरुण कर्जत ला जाणारी ट्रेन पकडली आणि भटकंती ला सुरवात झाली . ट्रेक्किंगचि आवड़ असणारे आम्ही १३  जन मित्र होतो.ट्रेन40मिंटात नेरल स्टेशन ला पोचली.सकाळी नाश्ता करताच बाहेर पडल्यामुळे सर्वानी स्टेशनचा बाहेर गरमागरम भजिपाव आणि वडापाव वर ताव मारला आणि पूठे नाश्ता साठी पार्सल घेऊन पेबला जाणारी ऑटो पकडली दोन ऑटो केल्या ऑटो मधे मस्ती करत फनसवाडी गावात पोचलो जवळ पास २०  मिंटाचा नागमोडि रास्ता आहे.

गावात पोचल्यवर समजल की गडावर फसव्या वाटा असल्यामुळे गाइड बरोबर निल्यास उत्तम,तितेच् गावातील एक तरुण साधारण २७  वय असलेला तरुण गणपत होले आमच्या सोबत येण्यास तयार झाला.रिमझिम पावुस चालूच होता,आत्ता "गणपति बाप्पा मोरया" बोलुंन आमची ट्रैकिंग ला सुरवात झाली,गावतुनच फेसळनारी आवाज करत वाहनरे  ओढे आणि धबधबे दिसत होते नयनरम्य दृश्य होतीसुरवातीलाच विजेचे तिन मोठे टॉवर लागतात ते लैंडमार्क समजावे ,सुरवतील वाट सरळ गडाकडे जाणारी नागमोडि वाट पुढे अवगड़ होत गेली,आत्ता आम्ही थोड्या उंचीवर पोचलो होतो वरुन गावातील विहंगमय दृश्य दिसत होत फेसळनारा लाल पाण्याचा ओढा आणि समोर हीरविगार शाल पांगरलेला डोंगरमाळ आणि 100 फुटा वरुण कोसळनारे धबधबे नजरेस येत होते अप्रतिम दृश्य होती

आता गाइड गणपत ने पायांचा वेग वाडवला होता आमच्या पण पायांचा वेग पण आम्ही वाडवला होता.आता जवळपास 30 min चालून सर्व जन थकले चढाई करताना निसर्ग सौंदर्य, विविध पक्षी त्यांचे आवाज ऐकत आमचे मार्गक्रमण सुरू होते. सह्याद्रीचे रौद्ररुप, कडेकपारी, खडतर वाट आम्ही पार करत होतो. शहरी कलाहोल, गजबज या सगळ्यापासून आम्ही दूर निसर्गाच्या सान्निध्यात जात होतो.जंगलातील काटे, झाडी, झुडूप अंगाला टोचत होते.सर्व जन थकल्या मुळे थोडावेळ आराम करून केळी आणि चिप्सवर ताव मारुन  चढाईला परत सुरुवात केली.

आता मेघराजाने जोरात बरसन्यास सुरवात केलि होती,जंगल आणि गडाकडे जाणारी वाट खुपच अवगड होत गेली अर्धा तास पायपिट केल्यानंतर वाट काळ्याकुट  दरडिवरून पांढराशुभ्र खळखळ आवाज करणाऱ्या  धबधबया जवळ  पोचलो  आता मात्र सर्वनि बैग्स जैकेट टाकून त्या उंचावरुन कोसळनार्या धबधब्यात मनस्तोक्त भिजन्यचा आनंद घेतला सर्व थकवा , भिजल्यामुळे निघुन गेला.अजुन बरेच अंतर पार करायचे असल्यामुळे थोडा विश्राम करुन परत गड सर करायला सुरवात केलि अप्रतिम सूंदर दृश्य नजरेत साटवत आम्ही पुढे  निघालो

मुलांची मस्ती चालू होती पण आता वरूनराजा ने जोरात बरसन्यास सुरवात केलि त्यात सोसटयाचा वारा , वाट पन अवघड झाली होती आता सर्वाना सवधगिरीने  चलण्यची सुचना आम्ही  देत होतो  .पाउसाचा वेग वाढतच होता असाच मेघराजा दिवसभर बरसला तर गड चढणे  अवगड़ होइल याची काळजी सर्वांच्या  चेहरयवर दिसत होती . किती वरती आलो यासाठी वळून पहिल , पण धुकयमुळे काहीच दिसत नव्हते सपूर्ण परिसर जणू दाट धुक्यात हरवला होता , गड सर करताना धुक्यानमुळे आपन ढगांमधे आल्याचा फील आल्याशिवाय राहत नाही .आता गडाची उभी चढ़ाई सुरु झाली अरुंद एकेरी वाट दोन्ही बाजूला खोल दरी चुकून जरी पाय सटकला तर ?विचार करुण अंगावर शहारा येतो  , चिकाळलेल्या वाटे वरुन चुबुक चुबुक करत चालतान पाय सटकत होते पण मजा येत होती चालताना आता बराच वेळ चाल्यानंतर समोरच दृश्य होत तुळतुळित कातळ अणि त्यावरची शेवाळी आणि आता तो कातळ चडून  पार करायचा होता सर्वात आधी  गणपत वरती चढला मग त्याने एकएक करत  सर्वाना वरती घेतले , येते गणपतचा अनुभव पुरेपूर कामी आला.

पुढे जवळपास अर्धा  तास अवगढ एकरी गडवाट चल्यानतर पेब गडावरचा स्वमि समर्थांचा मठ लागतो मठ म्हनजे गडावर एक गुंफा आहे समोर खोल दरी,गुंफा एका मोठ्या कातळात कोरली आहे दरवाजावर "श्री" गणेशांची मूर्ति कोरली आहे आत शंकराची पिंडी आणि शिवाजीमहाराजांची मूर्ति आहे बाजुलाच "स्वामी समर्थंचि" चित्र आणि काही स्वामीचे श्लोक गुंफे चा भिंती वर रेखाटलेली आहेत साधारण ४०  माणसे सहज बसतिल एवढी जागा आहे,सर्वानी महाराजांना मानाचा मुजरा केला आणि स्वामी ना नमस्कार केला.बाहेर मेघराजने रोद्र रूप धारण केले होते , सर्वांनी  आता विश्राम करायचे ठरवले घरी सर्वांनी  सुखरूप पोचल्या चे कॉल करुण सांगतलेआता मात्र सर्वांनाच जोरदार भूक लागली होती, आईने दिलेल्या भाकरी सोबत शेगदान्यचि चटनी आणि कांदा याची चव अप्रतिम लागत होती सर्वनिच ताव मारला , सर्व जन भिजुन चिंब झाले होते हवेतला गारवा जाणवत होता शहरी कलहोला गजबज यापासून  आम्ही खुप दूर निसर्गाचा सनिध्यात होतो खुप सुंदर अनुभव होता आता आम्ही पुढे निघालो

आता गडावरील मंदिरा कड़े जाणारी पायवाट धरली अगदीच अरुंद आशा त्या वाटेवरुन एकवेळी एकच जन जाईल एवडीच वाट आहे एकमेकां ना आधार देत वाट पार झाली , आता पुढे गडाचा बुरुज संरक्षण भिंत आली ति पार करायची होती , भिंत पार करायल लोखंडी पायरया आहेत पाउसाने खुपच जोर धरला होता पायरींवरुन जोरदार पाणी आणि माती  येत होती आणि सुसाट वारा सुटला होता बुरुज पार करन अवघड झाल होत गणपत पुढे चडला बकीचे पण कसेबसे चडले पण निखिलची चडताना पुरेपूर दमछाक झाली  पाटिमागे मी, लहू आणि अनिल होतो शेवटी "महाराजांच" नाव जोरात घेण्यास आम्ही सुरवात केलि आणि कसबसा तो बुरुज पार झाला, महारांजच नाव घेतल्यावर अंगातल रक्त सळसळ याचा प्रत्यय आज सर्वाना आला.खुपच भयानक अनुभव आला "बाप्पा" चे नाव घेऊन मंदिराकडचि एकपदरि वाट धरली.

आता पुन्हा एक लोखंडी पायरय लागल्या त्या पण सवधगिरिने पार केल्या आणि आम्ही गडावर्च सर्वात उंच जागी पोहचलो ,तिथले निसर्ग सोंदर्य बघून सर्वांचा थकवा पळून गेला .वरती सुंदर चार खांब आणि गोल घुमट असलेलं  टूमदार  मंदिर आहे मंदिर छोटेसेच आहेमंदिराच्या मध्यभागी स्वामींच्या  पादुका आहेत समोर एक भगवा फड़कत आहे जणू तो मराठयाचां ४०० वर्षांचा इतिहास सांगत कित्येक वर्ष ताट उभा आहे उन्ह पाऊस  झेलत.

पावुस आणि वारा यानि रौद्ररूप धारण केल होत त्यात धुक खुपच दाट झाल 10 फुटावरच पण नीट नजरेला येत नव्हतं.आता आम्ही २०८२  फ़ीट उंचावर होतो  पूर्ण डोंगरमाळ नजरेत होत दाट धुक्यामुळे आम्ही ढगांमधे असल्याचा फील येत होता पण एक खंत होती पाउसामूळे अणि दाट धुक्यामुळे आम्ही वरुन दिसणारे  धबधबे ,चंदेरी गड ,प्रभलगड़ मिस केले आणि अजुन एक होत की पाऊस असल्याने आम्ही निसर्ग सौंदर्य  कॅमेरा मधे बंदिस्त करू शकलो नाही तरी पण सर्वानी  मिळून  एक सेल्फ़ी घेतल आणि गड सर केल्याचा आनंद साजरा केला.

"महाराजांना" मानाचा मुजरा आणि "स्वामी समर्थना" दंडवत घालून आम्ही विकटगड माथेरानच्या दिशेने  उतरायला सुरुवात केली. उतारावर मुरमाड वाटेमुळे घसरगुंडी करून घेत पायथा गाठला तेव्हा आभाळ पूर्णपणे भरून  ढगांचा कडकडाट झाला. आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मनमुरादपणे कोसळणा-या पावसात चिंब भिजत आम्ही परतीची वाट कापत होतो. प्रत्येक पावलागणीक आजच्या दिवसातला प्रत्येक क्षण आपणहूनच मनाच्या एका "स्पेशल" कप्प्यात चालला होता. पावसाचा खेळ कमी झाल्यावर जेव्हा आम्ही माथेरान कडे जाणाऱ्या एकपदरि वाटेवर होतो आणि वारयची जोरदार  झूलुक आली आणि सर्व धुके नाहीस झाल आणि आम्हला खोल दरितला सुंदर दृश्य नजरेस आल  सर्वांनी  थांबून त्या दृश्य चा आनंद घेतला.

आता आम्ही खाली उतरत होतो, आता माथेरान चा ट्रैक गाठायचा होता पाऊले पटापट टाकत आम्ही उतरतीचा बुरजाच्या इथे पोचलो तो पण हळूहळू पार झाला निसर्ग सौंदर्य खुपच सुंदर होत एका बाजूला डोंगररांग त्यावरून स्वताला झोकुन देणारे धबधबे त्यात भिजन्याचा आनंद आम्ही  घेत आम्ही माथेरांचा मिनी ट्रेन चा ट्रैक गाठलाट्रैक वर  जायचा आदि छोटस गणेशाच मंदिर आहे आणि एक घंटा आहे जणू सर्वांनी  ति जोरात वाजवून ट्रैक सुखरूप  पार केल्याचा आनंद साजरा केला. आता गणपत इतून दुसऱ्या मार्गाने त्याचा  घरी जाणार होता त्यचासोबत सेल्फ़ी घेऊन आणि आभार मानून गणपत चा निरोप घेतला ,त्याचा शिवाय गडसर  करन शक्य न्हवत,गणपत ने संगीतल्या प्रमाणे  आम्ही मिनिट्रेन चा ट्रैक पकड़त दस्तूरी नाकयकडे पुढे निगालो पाऊस आता ओसरला होता.आता आम्ही  अजस्त्र डोंगररांग मधून वाट काढलेल्या ट्रैक वरुण चालत होतो सोबतीला होता घोंघावणा-या वा-याचा आवाज...त्याच्या तालावर डोलणारा  हिरवाकंच आसमंत...उंच कड्यावरून स्वत:ला दरीत झोकून देणारे पांढरेशुभ्र धबधबे ..हे दृश्य वेडावून टाकनारे होते!!!!!

फोटोशूट करत आम्ही दस्तूरी नाक्यापर्यन्त पोचलो तितले सौंदर्य पण वेगळे होते , घोड़यंचा सफारी ,डांबरी  रस्ता, टूमदार हॉटेल्स ,मेनी आणि तितली माकड़ आणि त्यंचा मार्केटलीला... पुढच्या टपरी वर गर्मागर्म चहा पिउन आम्ही महाराष्ट्र पर्यंटन च्या  स्टॉप ला पोचलो तिथून ट्रेक्स करुंन नेरळला पोचलो ट्रैक सुखरूप पार झाल्याचा खुप आनंद होत होता ,आमची ट्रैकिंग सुंदर बोलण्यापेक्षा थरारक जास्त होती!!! आता ट्रेन आली आणि सर्वांनी  थकलेल्या अवस्थेत  ट्रेन पकडली सर्वांनीच  सिट पकडल्या आणि परतीचा प्रवास सुरु झाला....

विकटगडावरील मंदिर . 





किल्याचे नाव: विकटगड़  (पेब फॉर्ट )


जाण्याचा रस्ता: नेरळ-फनसवाडी -माथेरान 

पाहण्यासारखे: स्वामीच मठ ,बुरुज,गडावरचे मंदिर ,धबधबे,माथेरान छे सौन्दर्य

श्रेणी: सोपी ते मध्यम

ऊंची :२१०० फिट .