Sunday, July 3, 2016

भागिरती धबधबा ( Bhagirat Waterfall )



 शुक्रवारी सर्वाना ऑफिस ला सुट्टी असल्याने खुप दिवसानंतर मित्रांसोबत ट्रैकिंग ला जयच हे ठरल होत सर्वानाच शुक्रवारी सुट्टी होती  ...येणार का विचारल्यावर सर्वच हो बोले..  मग काय फ्रायडे  ला सकाळी कल्याण  वरुण खोपोलीट्रेन पकडली. ट्रेन ३० मिनटे उशिरा  होति वंगनि ला उतरलो पुढे कस जायच कोणालाच माहित नव्हत पुढे उजवीकडून एका बाजारपेठेत गेलो .मोहिंदर ने ऑटो वाल्याक्डून आणिलहू व्अनिल ने एका शॉप मधूनमाहिती काढली . तेव्हा  समजल की पुढेऑटो करुण 2किलोमीटर जाव लागत नंतर पुढे चालत जाव लागत . पुढे जेवणाची सोय नसल्यामुले नाश्ता अणि चिप्स  ची सोय केलि. बैग मधे सर्व कोबुन पुढचा प्रवास चालू झाला. 
आम्ही आठ जन होतो 2ऑटो ठरवल्या एका मधे अनिल बाळा  आणि माझा भाऊ लहू बसला. दुसर्याऑटो मधे मी पुढे बसलो पाटी विजय मोहिंदर लहू बंटी होतो.प्रावास सुरु झाला सर्वांची मस्ती चालु होती ऑटो एका सुंदर गावातून कच्या रस्त्यातुन नागामोडी वलने घेत निघालो . २ किलोमीटर चा प्रवासा नंतर आम्ही डोंगराचा पायथ्य्शी पोचलो.

 समोर सुंदर ओडा दिसत होता नुकतीच फुलायला लागलेली भातशेती (पेरनी )दिसली.फोटोग्राफी सुरु झाली तेवढ्यात पावसाने जोर घेण्यास सुरवात केली. ढाककडे जाणाऱ्या वाटेवरूनच उजवीकडेधबधब्याकडे जायला वाट आहे, जी सर्वानी आधीच पाहुन ठेवली होती. त्यामुळे आम्ही सर्व आपल्या नेहमीच्या चालीत ती तुडवत पुढे निघालो. वाटेत भेटलेल्या काही गांवकर्‍यांनी जंगलात बीबटया अस्ल्याचे सांगितले पुढे वनविभागाचाबोर्ड  पण दिसला. ठरलेल्या वेळेपेक्षा आम्ही खूप मागे पडलो होतो म्हणून पायांमध्ये आपोआप गती आली.

 पुढे लागलेले जंगल वेड लावत होते. त्याचे सौंदर्य... त्याचा आवाज गजब होता. डाविकडून गेलेली वाट पकडली ती खरच आपल्य नावानुसार डावि निघाली झाडे झुडपे काटयानी आचाद्लेला डोंगर पार करुण आम्ही एका पठारावर आलो जितुन्न आम्हला सुंदर असा वाहत असलेला धबधबे दिसले  फोटोग्राफी चालू झाली जंगल पार करून पठारावर येईपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. पोटातील उंदारांचे एकत्रीकरण होवून मोठा हत्ती तयार झाला होता बहुदा! म्हणून आधी पोटोबा उरकला. पठारावरुन जाताना लहान साहन धबधबे दिसले आम्ही त्याच्या बाजूनेच जाणारी वाट धरली.

 सगले पुढे गेले मी अक्षय अणि विजय पाठी होतो एक सुंदर लहान धबधबा लागलातिथे भीजा य्चा आनंद घेउन निगनार त्यात विजय ल एक खेकड़ा दिसला त्याने तो पकडून माजा हातात दिला मग त्यला पणसोबत घेउन पायपीट चालु .

 सर्वात शेवटच्या धबधब्यात  भिजन्या चा आनंद घेतल्या नंतर वांगनी जंगल उतरू लागलो. वंगनी( भागीरत धबधबा) गाठेपर्यंत दिसलेला अदभुतनिसर्ग सोंदर्य आणि त्याच्या अंगावरुन कोसळणारे धबधबे अप्रतिम होते. जवळपास एक तासाच्या पायपीटी नंतर भागिरती वॉटरफॉल मधे पोहचलो.पुन्हा फोटोग्राफी चालू झाली. हवेने पुन्हा उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याचा आस्वाद घेण्यात सगळे गुंतलो होतो. तो धबधबा जणू उलटा वाहत होता! पायथ्यावरुन ज्या धबधब्याला पाहत होतो त्याच ’उलट्या’ धबधब्यात भिजलेल्या अवस्थेत मनसोक्त भिजलो.

 .तेवढ्यातअनिल नेहमी प्रमाने पाय घसरून पाण्यात पडल जास्त लागल नवह्त पणलहू ने थोड़ी मलम पटी लावली आणि परत भीजन्यचा आनंद घेतला.साधारण 2 वाजले होते , वाऱ्यासोबत पाऊस चालु होत . 30मिनटा ने पावसाचा जोर कमी झाला, आभाळात मळभ अजूनही होतेच. थोडेफार फोटो काढून सर्वानुमते आम्ही पारतिचा प्रवास चालु केला. गावातल्या दोन ऑटो करुण वांगनि स्टेशन गाठल ट्रेन ला वेळ असल्यामुले कपडे बदलून स्टेशन वर चहा आणि सुकी भेल चा आस्वद घेतला ट्रेन आलीकल्याण ला चा प्रवास सुरु सर्वजण थकले होते कल्याण ला पोचलो परत माणसाच्या सिमेंट चा जंगलात
वाचल्याबदल धन्यवाद मित्रानो...


वांगणी धबधबा 


No comments:

Post a Comment