Wednesday, July 26, 2017

शरभ शिल्प ( Sharbh Shilp )


           सह्यन्द्री मध्ये भटकंती करत असताना नेहमीच काहीतरी नवीन पाहायला अनुभवायला भेटत . किल्यांवर गेल्यावर तिथले बुरुज,तळी,दरवाजे आणि द्वारशिल्प म्हणजे कधीही आपल्या पूर्वजांचा उज्वल इतिहासाचा जिवंत पुरावा . या सर्व ऐतिहासिक वास्तूंचा  अभ्यास करावा तेवढा कमीच..

 रविवार, २० ऑगस्टला ऐतिहासिक माहुली किल्याला भेट दिली. तिथला ऐतिहासिक महादरवाजा,बुरुज , लेणी, शिल्प सर्वच काही मन इतिहासात घेऊन जाणार...माहुली किल्यावर महादरवाजाच्या पायथ्याशी आम्ही एक शिल्प बघतलं वाघासारखं प्राण्याचं हे शिल्प ..हिंदूं पुरतान लिखाणात  या शरभचा उल्लेख आठळतो . 

माहुली किल्यावर दोन पंख असलेलं शरभाच आगळंवेगळं शिल्प 
  
चार पाय , विक्राळ मुख आणि लांब शेपूट असणारा हा काल्पनिक पशु म्हणजे  " शरभ " . हिंदू पुरातना नुसार शरभ हा  शंकराचा अवतार.  शंकराचा भक्त राक्षस हिरण्यकश्यपु याचा वध करण्यासाठी विष्णुने  नरसिहांचा अवतार घेतला .पुढे हिरण्यकशपु वधानंतर  नरसिहांचा   क्रोद काही केल्या आवरेना , तो सर्वांना त्रास देऊ लागला मग सर्व देवदेवतांनी सृष्टीच्या निर्मात्या महादेवांचा धावा केला मग शंकरानी सिंहासारखं विक्राळ तोंड , तीक्ष्ण नख , दोन पंख , चार पाय आणी लांब शेपूट असलेल्या शरभाच रूप घेतल आणि नरसिहांचा वध केला आणि त्याची मुंडकीने आपलं मुकुट सुशोभित केल आणि कातडीने आपलं आसन म्हणून परिधान केलं . तेच हे शंकराचे शरभ अवतार  .

कामिकागम’, ‘उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत.सुप्रसिद्ध महाकवी कालिदास याने लिहलेल्या " मेघदूत" या काव्यात  शरभा विषयी बरच लेखन केलं आहे .

हिंदू पुरातन मधल्या ह्याच शरभाची मुसलमान राजांनी आपलं द्वारशिल्प म्हणून वापर केला .मुस्लिम राजवटींनी या शरभ शिल्पाला सिंह ' जंगलाचा राजा ' म्हणून आपल्या किल्यांच्या द्वारावर स्थान दिलेलं असावा .. 

महाराष्ट्रातील बऱ्याच किल्यांवर शरभ शिल्प कोरलेलं दिसून येत . हे शिल्प वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळत कधी एकटाच शरभ कोरलेला असतो तर कधी त्याचा मुखात गरुडभेद , हत्ती असं दिसून येतात .आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी त्याकाळच्या राजवटींनी याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसून येतो .

शिवनेरी किल्ला कित्येक वर्ष निजामशाही ,मुघल  यांच्या राजवटी खाली असलेल्या शिवनेरीच्या पाचही द्वारांवर शरभ शिल्प दिसून येत. किल्ले जंजिऱ्यावर चार पायामध्ये एक तोंडात आणि एक आपल्या शेपटीत हत्ती पकडलेला शरभाच शिल्प भिंतीवर कोरलेलं आहे .याचा अर्थ हत्ती प्रमाणे बळकट असणाऱ्या शत्रूला आम्ही मात देऊ शकतो असा होतो

१५६५ च्या तालिकोटच्या लढाई नंतर मुसलमान राजवटींनी अनेक छोटीराज्य जिंकून घेतली याचंच प्रतीक म्हणून पायामध्ये हत्ती दाखवण्याची हि प्रथा पडली असावी ...असा उल्लेख इतिहासात आहे .

माहुली किल्ल्यावरच भग्न अवस्थेत असलेलं  शरभ शिल्प 
माहुली किल्यावर  दोन  पंख असलेलं  शरभाची दोन  आगळीवेगळी   शिल्प आहे . माहुली किल्यावर  एक शिल्प पूर्ण अवस्थेत आहे आणि दुसरं तुटलेल्या स्तिथीत आहे.  तुटलेलं शिल्प हे गडसंवर्धन करताना "सह्यन्द्रीचे रखवालदार" या दुर्गसंवर्धन संस्थेला मातीच्या ढीगाऱ्या खाली सापडलं .

रायगड,,सिह्गड,सुतोंडा,पेठ, अवचितगड , राजगड इत्यादि अनेख किल्यांवर शरभ शिल्प वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळत. वेताळवाडी किल्यावर दोन बाजूनं दोन शरभ असून एकाच धडाला दोन तोंड असलेलं शरभाच दुर्मिळ शिल्प आहे .

गडांवरची हि शिल्प म्हणजे अभ्यास करण्याचा स्वतंत्र विषय .याच शिल्पांचा आधार घेऊन आपण इतिहासाची बरीच पाने उलगडू शकतो .किल्यानं भेट देतांना अशाच ऐतिहासिक वस्तुंना आपण कुठे इजा  पोचवणारा  नाही याची जरूर काळजी घ्या.


संदर्भ : विकिपीडिया आणि लोकसत्ता.कॉम.

अंकुश सावंत.
+९१ ९७६८१५३११४.