Monday, November 20, 2017

कर्नाळा किल्ला - आभाळात जाणारा उतुंग सुळका / Karnala fort

  पनवेल शहरामध्ये दोन उत्तुंग सुळके असलेले किल्ले आहेत एक म्हणजे कलावंतीणचा सुंदर सुळका ! आणि दुसरा म्हणजे कर्नाळा किल्याचा सुळका !!!

 खूप दिवस घरात बसून राहिल्यावर ,आपुल्या पहिल्या ट्रेकचे फोटो बघत दिवस जात होते. सर्वजण ऑफिस मध्ये व्यस्त त्यात सुट्यांचीन होणारी जुळवाजूळव  , एकामागून एक ठरलेले प्लान फ्लॉप होत होते . शेवटी मी ,प्रवीण आणि लहू जवळच कुठला तरी किल्ला करायचं ठरवलं.तन्मय ,समीर  आणि माही रोजचे भटके सुट्टी नसल्यमुळे  मुळे येऊ शकले नाहीत. ठरल्या प्रमाणे  शनिवारी सकाळी पहाटेच ६. ०० ची ट्रेन पकडून ठाणे गाठले . ठरल्याप्रमाणे प्रवीण सुद्धा आम्हला ठाण्याला भेटला .प्रवीणची आणि लहू ची ओळख करून दिली आणि पुढे निघालो ,ठरलेली पनवेल ट्रेन चुकली होती  मग नेरळ ट्रेन पकडून नेरळवरून पनवेल  गाठले.मग पनवेल वरून बस ने कर्नाळा गाठायच  ठरलं ,चॊकशी केल्यावर बस उशिरा असल्याचं समजलं मग वाट नबघता तिथूनच पुढच्या रिक्षास्टॅंड वरून  पळस्पे फाट्यावर  पोहचलो आणि मग तेथून परत  सहाआसनी गाडीने पेन-पनवेल महामार्गाने थेट  कर्नाळा गाठला .
कर्नाळा पक्षी अभयारण्य नकाशा
गडाच्या पायथ्याशीच पक्षी अभयारण्यचा पार्किंग मध्ये पोहचताच माकडांनी जणू स्वागतच केले ,कर्नाळा अभयारण्याचा  नकाशा निरक्षण झाल्यानंतर पुढे  निघालो , किल्यावर जाण्यासाठी पर्यटकांन ३०रुपये प्रत्येकी आकारले जातात आणि जर सोबत आपण पाण्याचा बॉटल्स नेत  असू तर आपणाला २०० रुपये ठेवूनघेतले  जातात आणि येताना आपण त्यांना परत बॉटल्स दाखवून आपले पैसे परत घायवेत,प्लास्टिक बॉटल्सला आळा  घालण्यासाठी केलेली सुंदर उपाययोजना आहे. 

 गेट पासूनच केलेल्या डांबरी रस्त्यावरून आमचा ट्रेक ला सुरुवात झाली . वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रपर्यटनाचे किल्याचा माहिती विषयक फलक वाचत आम्ही पायथ्याला  असलेल्या हॉटेल्स पर्यंत पोहचलो ,गावातल्याच महिला बचत गटाने चालवलेलं हे हॉटेल आहे .गरमागरम पोह्यांचा आस्वाद घेतला आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन पुढची वाट धरली .
जंगलातील काही सुंदर रानफुले
सुरवातीलाच काही पक्षी ,अभ्यारण्याचा बंद पिंजऱ्यात ठेवलेली आहेत ,सुरवातीला काही गरुड ,पोपट आणि ससांना  बघून पुढे निघालो ,आणि नंतर सुंदर मोराच दर्शन झालं. पिसारा फुलवून थुईथुई नाचऱ्या मोराला पाहण्याची आमची पहिलीच वेळ ..याच वर्णन करन केवळ अश्यक. बराच वेळ पिंजऱ्यतल्या पक्षी पाहून झाल्यानंतर पुढे किल्याकडे जाणारी वाट धरली .

थुईथुई नाचणारा मोर
खानावळीचा समोरून खाली जाणाऱ्या पायवाटेकडे असलेल्या ओढयाकडे आम्ही उतरलो ,पाऊस नसल्यमुळे  साठून राहिलेल्या पाण्याला, हिरवा शेवाळीचारंग चढला होता ..अभयारण्यातल्या एक माकडांचा कळप पाणी प्यायला तळ्यावर आला ... काही मस्त शॉट भेटले माकडाचा कळपांचे..थोड्या वेळाने परत हॉटेलच्या इथे येऊन आम्ही डाव्या हाताकडे जाणारी वाट पकडली.आणि ट्रेक ला सुरवात झाली. 

बॅगया पाटीवर लावून पुढच्या  मार्गी लागलो . उंचच्या उंच आभाळाकडे झेप घेणारी घनदाट झाडीमुळे बऱ्यपाकी पैकी थंडावा जाणवतो ,निरनिराळ्या पक्षांचे आवाज , उंचचउंच भली मोठी वर्षानुवर्षे उभी असलेली झाडी , आणि बऱ्यापकी मळलेली लालमातीची वाट हे सार अनुभवत  पाऊले पडत होती . जंगलातून जाणारी सरळ वाट आपण पकडावी उजवीकडे आणि डावीकडे जाणाऱ्या वाटाआपणाला दिसतात,पण आपण मात्र मळलेली सरळ वाट पकडावी , पक्षी निरक्षणासाठी आपण येथून  निरनिराळ्या भागात आपण जाऊ शकतो .पक्षी निरीक्षणासाठी आपणाला पहाटेच यावे लागते सुमारे १५०हुन अधीक पक्षी आपण पाहू शकतो. 

एक ते दोन तास घनदाट जंगल आणि मोठया मोठ्या खडकातून आणि लाल मातीला घट्ट धरून असलेल्या लांबच लांब झाडांच्या मुळां मधून  पायपीट केल्यानंतर आम्ही एका पठारावर येऊन पोहचलो ,घनदाट झाडी संपून संपूर्ण निळभोर आकाश आता नजरेत दिसत होता आणि समोर होता कित्यक वर्ष उभा असलेला ,गगनात जाणारा कर्नाळाचा सुळका !

पहिला दरवाजा
आता किल्ला नजरेत आल्यामुळे पाउलांची गती आपोआपच वाढली ,थोडावेळ चाल्यावर उजव्या बाजूला कर्नाळाई देवीचं मंदिर लागत ,देवी सींहासनारुढ आहे हातात तलवार असलेली सुबक मूर्ती आहे ,मूर्ती चांगल्या  सुस्थित  आहे .१९९४ साली सीताराम महाडिक यांनी या देवळाचा जिर्णोदर केला , देवी ला नमस्कार केला आणि थोडावेळ अराम करण्याचा निमित्ताने बाजूला असलेल्या शिल्प ओळखण्यासाठी प्रयत्न चालू झाले .मग ती शंकराची त्रिशूळधारी मूर्ती असल्याचा निष्कर्ष काडून  आम्ही पुढे निघालो. 
कर्नाळा देवीचं मंदिर
आता समोरच कर्नाळाचा पहिला द्वार आमचं स्वागत करत होता , दगडी खोदलेल्या पायऱ्या पार झाल्याकि पहिला मोडकळीस आलेला दरवाजा लागतो ,दरवाज्या वरच्या  चोकटी वर तीन शुभपुष्पे नक्षी कोरलेल्या आपणाला दिसतात ,दरवाजावर उभं राहिल्यावर आपणाला दिसतो कलावंतिणीचा सुळका,प्रभळगड ,मलंग गड , चंदेरी आणि माथेरानचा परिसर असा बुलंद आणि अजस्त्र सह्यन्द्रीची रांग !!! हा सर्व परिसर म्हणजे फक्त अप्रतिम !!!
 मग पुढे आपणाला लागतो सुस्थीत असलेला भक्कम दोन बुरुजांमद्धे असलेला महादरवाजा .काळ्यादगडांमध्ये कोरलेला हा दरवाजा एका वेळी एकच मनुष्य जाईल अशी याची रचना,यातून आत जाताना  बनवणाऱयांची कल्पकता अनुभवायला मिळते . दरवाजा पार केला कि आपणाला जुन्या इमारतींचे अवशेष  बघायला मिळतात , पूर्णपणे मोडकलेल्या अवस्थेत या इमारती आहेत , आम्ही आत पोहचलो साधारण दोनपदरी घरासारख्या छपरं असलेली इमारती आहेत . छपरं नष्ट झालेलं आहे , शक्यतो  दारुगोळा किंवा धान्य साठवण्यासाठी इमारतींचा वापर  असावा. 
काही भग्नावस्थतले इमारतींचे बांधकाम
पुढे काही इतिहासाची माहिती देणारे  फलक येथे लावण्यात आले आहेत , वाचल्यावर कळालेकि छत्रपती शिवाजी  महाराजांनी हा किल्ला यवनांकडून जिकून घेतल्यावर किल्लेदार म्हणून क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके यांची नेमणूक करण्यात आली होती .तिथून पुढे गेल्यावर आपण पोहचतो कर्नाळा किल्याचा प्रमुख आकर्षण असलेला सुळका .याची एकूण उंची आहे ४७५ मीटर ,चारी बाजूनी सुळक्याचा पोटात पाण्याचा टाक खोदलेला आहे . या खोदलेल्या पाण्याचा टाक्या पाहून मुरबाडचा गोरखगडावरील लेण्याची आठवण होते . या टाक्यांकमध्ये बाराही महिने थंड पाणी असते ,त्या मुळे इथेकायम थंडावा जाणवतो.इथे माकडांच्या मर्कटलीला आम्हाला पाहायला मिळाल्या . थोडावेळ सुळका पाहून झाल्यावर सुळक्यचा डावीकडची वाट पकडली ,मग एका ढासळलेल्या दरवाजामधून पुढे निघालो या दरवाजाला बाजूला शिपायी राहण्यासाठी छोट्या देवड्या उभारलेल्या आहेत  आणि मग आम्ही थोड्यादगडी पायऱ्या पार करून आ पोहचलो एका माचीवर . इथे हि एक पाण्याचं छोट टाक लागत .मग लागतो गडावरचा एक भक्कम दरवाजा ,काळ्यादगडात बांधलेला हा दरवाजाला उतरण्यासाठी पायऱ्या आहेत , दरवाजा वर दोन्ही बाजूला  दोन शरभ शिल्प कोरलेली आहेत ,माहुली गडावरच्या शरभशिल्पचि आठवण झाली ,लहू आणि प्रवीणला याच शरभ शिल्पा विषयी मी सांगत होतो.पुढे असलेल्या माची वरची तटबंधी पाहून झाली , तटबंधी थोडी ढासळेल आहे पण दरवाजा आज हि सुस्थित आहे !!!
माचीवरून दिसणारा कर्नाळा किल्यावरच्या सुळका
घड्याळात २ वाजून गेले होते सूर्यनारायण जास्तच तापला होता आता विश्रांतीची खूपच गरज होती , त्यात आमच्याकडील पाण्याचा साठा  पण संपत होता .मग सोबत आणलेल्या चपाती फस्त केल्या आणि मग नेहमीप्रमाणे प्रवीणच्या बॅग मधून त्याचा आईनी दिलेल्या एकेक खाऊ निघू लागला , दही , दुधीची पेज , काकडी आणि सफरचंद .... वा वा मज्जा आली !!! मग मात्र बराचवेळ दरवाजा चा आत बसून अराम केला . बराच उशीर झाला होता मग आता गड उतरायला घ्यायचा होता . बॅग पाठीवर लावल्या ,बॅगांची ओजी बरीच कमी झाली होती 
तिसऱ्या दरवाजातील आतील काळया दगडाचे अप्रतिम बांधकाम
गडावरचा संपूर्ण परिसर नजरेत साठवून आम्ही गड उतरण्यास सुरवात केली पाऊले झपाझप पडत होती...पाण्याचा साठा कमी असल्याने नथांबता भराभर गड उतरण्यास सुरवात केली.मुख्य दरवाजा वर पोहचलो आपण वरती चडून आलेल्या पायऱ्या इथून पाहण्याची मज्जा काही औरच !!! 

पाउलांचा वेग वाढला होता ,ठरल्या पेक्षा बराच पटकन आम्ही गड अर्धा गड पार केला ,आता गर्द झाडी सुरु झाल्यामुळे उन्हाची झालं कमी लागत होती ,थोडावेळ विश्राम करून आम्ही पुन्हा पायपीट चालू केली .. चालताना प्रवीण ने पाऊसात केलेल्या कर्नालीचा आठवणी सांगत होता , ४५मिनिटाच्या आत  आम्ही हॉटेल पर्यंत पोहचलो . हात पाय धुऊन आम्ही थंड पाणीपिऊन गारेगार झालो .. मग मावशींनी जेवायची तयारी केली गरमागरम भाकऱ्या ,बाट्यातची आणि वाटयनाची उसळ ... आणि प्रवीण ने मटण आणि गरमगार  भाकऱ्या वर मस्त ताव मारला ... आपण पार केलेला सुळका पाहत आणि पक्षांच्या किलबिलाट मध्ये जेवणाची मज्जा काही औरच !!!

जेवण पटापट आटपून मग आम्ही कर्नाळा चा निरोप घेतला ,प्रत्येक ऋतू मध्ये किल्याची सोंदर्य सुदा वेगवेगळं असत मग ,पावसाळ्यात परत यायचं ठरवून आम्ही निघालो आमुच्या मुंबईकडे !!!







किल्याचा इतिहास  -  १२व्य ते १३व्य शकताली किल्याहची बांधणी आहे ,पुढे यादवांनी किल्यावर राज्य केलं ,१४ व्य दशकात मुस्लिमांनी किल्ला ताब्यात घेतला ,मग पुढे शकतात निजामशाही ने किल्ला जिंकला मग पुढे १६७० मध्ये कर्नाळा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला . पुढे मग पुरंदर चा तहा मध्ये मुघलांना द्यावा लागला , पुढे परत मराठ्यांनी किल्ला जिंकला ,आंग्रे ,पेशवे यांनी किल्यावर राज्य केलं , शेवटी मग ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला .


किल्याचा प्रकार - गिरिदुर्ग 

उंची - ४४५ मीटर 

किल्यावर जाण्याचा मार्ग - पनवेल स्टेशन वरून बस किंवा
टमटम ने आपण पळस्पे फाट्यावर पोहचा प्रत्येकी २० रुपये घेतात तेथून पुढे परत आपण कर्नाळाकडे जाणारे ऑटो पकडावी १५ रुपये प्रत्येकी घेतले जातात  . 

खाण्याची सोया - गडाच्या पायथ्याशी खाण्याची सोय होते ,गडावरती जाताना पिण्याचा पाण्याची सोया नाही ,पाणी मुबलक प्रमाणात स्वतःकडे ठेवावे . 

धन्यवाद !!
अंकुश 

9 comments:

  1. अतिशय उत्कृष्ट वर्णन केलेले आहे अंकुशने. अणुभव घेण्या सारखी भटकंती आहे ही.

    ReplyDelete
    Replies
    1. थँक्स !प्रवीण ...अजून ट्रेक बाकी आहेत आपल्या😁

      Delete
  2. Sundar lekhan. .lekh vachlyanech janyachi odh vadhli.. good going ankush

    ReplyDelete
  3. Apratim lekhan Ankush...great going...

    ReplyDelete
  4. एका चांगल्या ट्रेक च्या अनुभवा पासुन वंचित राहिलो.

    ReplyDelete
  5. Cool and that i have a dandy proposal: How Much Is Home Renovation remodel garage into living space

    ReplyDelete