नाशिक !!! किल्यांचा प्रदेश ... नाशिक जिल्यात एवढे किल्ले तर नक्कीच आहेत कि आपण संपूर्ण किल्ले फिरायचे म्हंटले तर दर वीकएंड ला एक ट्रेक केला तरी एक महिना आपणाला पुरणात नाही आणि नाशिक जिल्ह्यतील सर्वच किल्ले म्हणजे बुलंद , अवघड या श्रेणी मध्ये मोडणारे, किल्ला सर करायचं म्हंटल कि २ ते ३ तासांची तांगडतोड करावी लागणारच . बरेच दिवस ऑफिस आणि PC च्या जगात घालवल्यावर आता ओढ होती सह्यद्रीची बऱ्याच दिवसापासून हरिहर या किल्यावर जाण्याची इच्छा होती काही कारणास्तव जाणे होत नव्हतं .शेवटी योग आला ऑफिस वरून शिफ्ट नंतर बॅगा भरून रात्री ११.५० ची कसाऱ्याला जाणारी लोकल पकडली आणि मोहिमेची सुरवात झाली , यावेळी बरेच रोजचे साथीदार नव्हते. लहू ,तन्मय आणि मी रोजचे आणि विजय , सचिन , हॅरी आणि आशिष हे नवीन चार जण मिळून आम्ही ७ जण होतो . कसाऱ्याला १.५० चा दरम्यान पोहचलो कसाऱ्या वरून मी आधीच हरिहर ला जाणयासाठी गाडी बुक केली होती .
रात्री २ वाजता हरिहर गडाच्या पायथ्यला असलेल्या निरगुनपाडाया गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला .५० किलोमीटरचा हा प्रवास होता . मध्ये एका हॉटेल मध्ये थांबून एक फक्कड चहा झाला आणि पुन्हा प्रवास चालू झाला . निरगुनपाडा गावाच्या जवळ जवळ पोहचलो आणि रांगडा गड रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात दिसू लागला. गावात बरीच ट्रेकर मंडळी आली होती.
गावात पोहचल्यावर गावात जेवणाची आणि नाश्त्याची सोय करायची होती . गावात पोहचून गाडीवाल्या ओळखीच्या एका दादांना जेवणाची आणि नाश्त्याची सोय केली आणि मग सर्वचजण रस्त्यावरच बसून गप्पा मारू लागले , मोकळ्या आभाळाकडे बघत चांदण्या न्हाहळत गप्पा मारण्याचा अनुभव काही औरच होता. गप्पा मारत मारत सकाळचे ५ कधी वाजले समजलंच नाही . गावातल्या दादांकडे पोहे आणि चहा चा नाश्ता करून आम्ही किल्याचा दिशेने प्रवास सुरु केला .
किल्याचा उजवीकडे चालत राहा असा सांगणारा दिशादर्शक |
कातळामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या |
सरळ पायऱ्या |
थोड्याच वेळात आम्ही हरिहरच खास वैशिष्ट्य असलेल्या कातळपायऱ्याच्या जवळ पोहचलो.कितीवेळ तरी एकटक त्या पायऱ्यांकडे फक्त बघतच रहावं असं सौन्दर्य या पायऱ्यांच आहे. बराच वेळ इथे पायऱ्यांचा पायथ्याशी घालवल्यावर एक एक करून आम्ही चढाईला सुरवात केली. एका वेळी एकच जण वरती जाईल एवडीचं वाट आहे .प्रत्येक पायरी मध्ये केलेल्या खोबणी मुळे चढाई सुखरूप होते . सावधगिरीने चढाई केली कि आपणाला दोन बुरुजांमध्ये असलेला महादरवाजा लागतो .भगवा शेंदूर फासलेला महादरवाजा पार झाला कि गणेशाची सुंदर कोरीव मूर्ती कातळात कोरलेला आहे. इथून पुढे जाणारा मार्ग म्हणजे अचंबित करून सोडणार आहे ,दगडी कातळामध्ये कोरलेला अर्ध वर्तुळकाळ भुयारी मार्ग म्हणजे आश्चर्यच ! इथून आपणाला भास्करगड , फणी डोंगर दिसतो. पुढे चालत गेलो कि परत आपणाला ६० ते ७० वरती जाणाऱ्या एकेरी पायऱ्या लागतात .हरिहर गड म्हणजे वास्तू स्थापत्याचा अप्रतिम नमुना एक आश्चर्य संपलं कि पुढे एक आश्चर्य पुढे आहेच ... आम्ही सर्वानी सावधगिरीने कातळातमधील हा मार्ग पार करून .दुसऱ्या भग्न दरवाजातून आम्ही मुख्य पठारावर येऊन पोहचलो.
किल्यावर जास्त काही अवशेष शिल्लक नाही आहेत . आपणाला पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो .काठावरच हनुमानाची शेंदूर फसलेली सुंदर मूर्ती एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहे . त्याचाच बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी च दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो . वाटेत आम्हला वाड्याचे काही अवशेष दिसले ते पाहत आम्ही पुढे गेलो . तसच पूर्वेकडे चालत गेलो कि आपणाला लागते सुस्थितीत असलेली एक खोली लागते. या खोलीचा वापर पूर्वी दारुगोळा साठा ठेवण्यासाठी किंवा धान्यसाठा ठेवण्यासाठी होत असावा . गडावर राहायचं म्हंटल तर या इमारतीमध्य १० ते १५ जणांची राहण्यासाठी सोय होऊ शकते . ऊन बरंच वाढलं होत खोलीच्या सावली मध्य बराच वेळ बसून गप्पा मारल्यानंतर आम्ही पुढे किल्यावरच्या सर्वात उंच ठिकाणी निघालो . गडाच्या या टेकडीवर चढताना मात्र रॉक पॅचिंगच थ्रिल अनुभवायला आपणाला मिळालं . वरती चढताना मात्र सर्वांचीच दमछाक झाली. टेकडीवरचा उंच भगवा फडकताना पहिला कि मराठ्यांचा इतिहासाची आठवण होते आणि अंगात वेगळाच उत्साह संचारतो .सर्वजण वरती चढले आणि सर्वानी महाराजांच्या नावाचा गजर करत एकच जल्लोष केला. आमचा रोजचा विडिओ सेल्फी घेऊन झाला .
वरून आपणाला उत्तरेला दिसते ब्रह्म गिरी पर्वत रांग , दक्षिणेकडे वैतरणा नदीचं खोर फार मनमोहक दिसत , शेजारी भास्करगड आणि फणी डोंगर दिसतो. आम्ही चढाईला फारच उशीर केल्यामुळे खूप जास्त वेळ झाला होता मग , उतरताना पटापट उतरायचं ठरलं. उतरताना सुद्धा ८०डिग्री पायऱ्यांमुळे हरिहरचा ट्रेकचा थ्रिल अनुभवायला मिळतो . उतरताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि थोड्याच वेळात परत मुख्य वाटेवर आलो आणि १ ते १. ३० तासामध्ये गावात पोहचलो . गावा मध्य जेवण तयारच होत ,मग जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. कातळातील पायऱ्यामुळे उतरतानाही ट्रेकच भन्नाट थ्रील देणारा हरिहरचा ट्रेक चिरस्मरणीय ठरतो .
मोकळ्या अंगणात केलेलं जेवण |
किल्याचा इतिहास - हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिकला.
किल्ला हरिहर - हर्षगड
तालुका त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक
उंची - ११२० मीटर
चढाई श्रेणी - मध्यम
योग्य कालावधी - सपेंबर ते फेब्रुवारी ( भर पावसात हा ट्रेक करू नये )
हरिहर गड ला कसे जाल - मध्य रेल्वेने कसारा या स्टेशन पर्यंत पोहचावे . तिथून आपणाला बस किंवा खाजगी वाहनाने निर्गूणपाडा या गाव मध्य जाऊ शकतो
खाजगी वाहन आधीच बुक करण्यासाठी
प्रकाश - ९८२३९८६२३३ ( private गाडी साठी यांना संपर्क करा )
आमची भटकंती बघण्यासाठी आमच्या youtube चॅनेल ला subscribe करा .