Saturday, November 5, 2016

गोरखगड ( Gorakhgad )

नमस्कार ,मित्रानो ऑक्टोम्बर नोव्हेंबर महीना म्हंटल म्हणजे दिवाळीची गडबड आणि मौज मस्ती . दिवाळी म्हंटल की आईने बनवलेला चमचमित फराळ ,प्रत्येक दिवासच एक वैशिष्ट्य , या वर्षी दिवाळी मध्ये फटाक्यांची अतिशबाजी नक्कीच कमी झलि आहे पर्यावरण हितच दृष्टीने टाकलेल एक चांगल पाउल आहे , दिवाळी म्हंटल की अजुन एक  आपण लहानपणी करायचो ते म्हणजे मातीचे किल्ले...किल्ले म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज आणि महाराज म्हणजे त्यांचे बुलुंद किल्ले ..

.महाराजांच्या किल्यावर एक दिवस दिवाळीपहाट साजरी करायच ऑफिस मध्ये मी अणि माझा ऑफिस मधला मित्र समीर गोसावी याने ठरवल होतं.समीर चा ट्रैकिंग चा अनुभव खुप होता त्याच्यासोबत कोथळीगड करायचा प्रयत्न फसला होता म्हणूनच या वेळी नक्की केल. ऑफिस मधून अजुन दोघे जन आणि त्याचा मित्र महेंद्र येणार होता. प्रथम गोरखगड़ ठरला होता पण नंतर मात्र ग्रुप मध्ये मूली  असल्याने कलावंती दुर्ग ठरला. पण संध्याकाळी समीर चा कॉल आल " बॅक टू गोरखगड अंकुश " दोघे कमी झाले होते .

सर्व तयरि झलि होती इंटररनेट वर थोडिशि माहिती घेतली गोरकगडबद्दल गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे  त नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे.शहाजी राजांच्या काळात या गडाला महत्त्व होते. मात्र येथे कोणत्याही प्रकाराच्या लढाईचा उल्लेख नाही. शिवकाळात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. गोरखनाथ येते साधनेसाठी बसत म्हणून याच नाव गोरखगड पड़ल.

इंटरनेटवर गोरखगदाचि वर्गवारी " मध्यम " अशी केल्यामुळे  थोडी काळजी होती पण समीर आणि महेंद्र सारखे जवळपास पंधरा हुन अधिक किल्ले सर केलेला अनुभव असल्यामुळे काळजी करण्याच कारण नव्हतं घाटकोपर वरुण समीर आणि महेंद्र कल्याण ला मला भेटनार होते पहाटे पाचवाजता मला समीर ने कॉल करुण मला उठवलं सर्व तयारी करुण साडेसहा ला कल्याणला आम्ही भेटलो .  महेंद्र ला प्रथमच मी भेटत होतो पण ,त्याच्याबद्दल मी समीर च्या कडून खुपदा एकल होत असच एकदा समीर बोलून गेला होता की" एका दिवसात एक वाचून काडलेल पुस्तक आणि माहि सोबतचा सपूर्ण दिवस " यात माहि सोबतचा घालवलेला दिवस खुपच चांगलेलं अनुभव सांगून जातो  . त्याने माझी अणि महेंद्र ची ओळख करुण दिली आणि पुढचा प्रवास सुरु झाला.

पुढे बुसस्थानकतुं मुरबाड कडे  जाणारी बस पकडली आणि ट्रेकिंगला सुरू झाली.थोड्याच वेळात गाव सुरु झाली आणि हवेतला गारवा जाणवायला सुरवात झाली समीर आणि माहि घरातून पहाटेच निघाल्यामुळेथोड्याच वेळात दोघेही साखर झोपेत गेले बस मध्य कुटेच नथांबता मुरबाड बस डेपोत थांबणार होती , बसने चांगलाच वेग पकडला होता थोड्याच् वेळात बस गावातील नागमोडी वळने घेत मुरबाड़ ला पोचलो.घरातून नाश्ता नकारताच निघाल्यामुळे पोटात भुकेचे कावळे ओरडतच होते . बाहेरच एका हॉटेल मधे गर्मागर्म मिसळ आणि वडासांबारावर ताव मारला .तिघे ही खाण्याचे शौकीन असल्यामुळे पोटभर नाश्ता केला मिसळ अणि वडासंभारचीचव अप्रतिम होती .हॉटेलवेटर कडे चौकशी केल्यावर समजले की देहरी गावत जाणारी बस रद्द झलि आहे म्हणून खजगीवाहन करुण आम्हाला  म्हसे गावत जायला लागेल आणि तिथून पुढे परत खाजगी वाहन करुण देहरी गावत जायला खाजगी वाहन करावे लागेल .मग तिथेच पुढचा प्रवास मध्ये खाण्यासाठी केळी आणि पाणी बॉटल्स घेऊन सहा चाकी पकडली. खाजगी वाहनातील अनुभव मात्र भयानक होता सहाचाकी  वाहनांमधून चालक जवळपास पंधरा माणसे घेऊन निघालो.एक तासांच्या प्रवासनतर आम्ही देहरी गावात पोहचलो .

आतापर्यंतचा मुरबाड पासून देहरी गावापर्यंतच्या प्रवासात तिथल्या लोकांचा राहणीमानातला आणि मूख्य म्हणजे त्याचा भाषेतला फरक आम्हला जाणवत होता. महाराष्ट्रात मराठी भाषा हि तर २० किलोमीटर ने बदलते.तिथली भाषा गावरान होती आणि त्यांच्या भाषेत एक गोडवा आहे .म्हणूनच तर संत ज्ञानेश्वरानीं म्हंटलय "माझ्या मराठीचीबोलूकवतुकें..परीअमृतातेहीपैजा जिंके... ऐसीअक्षरेरसिकेमिळविना!!"

आम्हला गावातूनच दिसणार गोरखगड़ आणि मचिंद्रगदाचा सुळका आम्हाला खुनावत होता.रस्त्यालाच लागून हामिद पटेल यांच घर आणि टपरी आहे कित्तेक वर्ष ते ट्रैकिंग ला येणाऱ्या मंडळींची मनापासून स्वागत आणि सेवा करतायत ,तेथे जेवनाची आणि राहण्याचीसोय होते त्यांनी आम्हला कस जायच ते सांगतल मग त्यांनी त्यांचा मोबाइल नंबर आम्हला दिला त्याचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.


रस्त्याला लागूनच गोरक्षनाथांचं मंदीर आहे. त्याच्या मागून गडाच्या दिशेने पायवाट जाते. मंदिर मोठं अणि प्रशस्त आहे .आम्ही बाहेरुणच दर्शन घेऊन चालायला सुरवात केली मंदीरापासून पुढे आल्यावर लवकरच दाट झाडी सुरू झाली. पायवाट मात्र स्पष्ट व मळलेली होती. पण बरीच अरुंद होती. काही अंतर पुढे गेल्यावर खडा चढ सुरू झाला. गाव आणि रस्ता मागे दूरवर दिसत होते आणि समोर नजारा दिसत होत होता.मच्छिंद्रगड आणि गोरखगड हे दोन पर्वत एकमेकांसमोर उभे राहिलेले दिसत होते. बाजूला भरपूर डोंगर आणि दरीसुद्धा. पाऊस पडून एक महीना उलट ला होता म्हणून अजुबाजूच् गवत सुकलेल होत थोडं थांबत थांबत आणि फोटो घेत घेत समोर जात होतो. हळुहळु बराच तीव्र चढ सुरू झाला. आणि सलग होता. एक मोठा चढ पार करून झाल्यावर मग दोन तीव्र उतारसुद्धा लागले.पायवाटेत जागो जागी ट्रेककर्स चुकु नये म्हणू भगव्या रंगचा बानाचे निशान दाखवले आहेत त्याचा नक्की फायदा होतो सुरुवात केल्यापासून जवळ जवळ तासाभराने एक चढ बराच तीव्र लागला. मग मात्र काही वेळ बसून आराम केला.

मग परत चढायला सुरुवात केली. तीव्र चढ असल्यामुळे पायवाटेला लागून असलेल्या झाडा- झुडूपांना व झाडाच्या मुळांना हाताने धरून चढावं लागत होतं. धापा टाकत व दम घेत घेत एकदाचा एक मुख्य चढ पार केला व समोर थोडा सपाट भाग आणि कालभैर वाच मंदिर लागत, मंदिराच्या समोर शंकराची पिंडी आहे कालभेरावसमोर त्रिशुळ आहे, बाजुलाच महराष्य्र पर्यटन चा बोर्ड लावलाआहे.रणरंत उन असून सुद्धा तिथल्या हवेत गारवा होता.समोर एक पिपलाचा डेरेदार झाड आहे . तिथून पुढे गडाचा मुख्य  सुळका चालु होतो...

इथून पुढचा ट्रेक हा निव्वळ रॉक क्लाइंबिंग .अर्थात पाय-यासुद्धा होत्या. पण पुढे पुढे त्या तुटक होत गेल्या व त्यामध्ये अंतरही खूप जास्त होतं .  प्रथमच आम्ही एक सरळ कातळामध्ये रॉकक्लीम्बिंग चा थरार अनुभवला .प्रथम मी आणि नंतर माही आणि नंतर समीर ने कातळ पार केला . त्यात माझा आणि समीर ला थोड़ी जख्म झाली.अनुभव थरारक होता मग मात्र पायरयनि पुढे जाण्यास सुरुवात केली.... इथून पुढे सर्व रस्ता दगडांच्या स्वरूपातच आहे. मध्ये मध्ये पाय-या व जिन्यासारखी रचना आहे. पण ते तुटलेलेही आहेत. शिवाय मागे काही आधार नाही, एकदम दरीचं एक्स्पोजर आहे.आतपर्यन्त चढताना तितकी अडचण आली नाही ,उतरताना कसं होणार, ही भिती मनात होतीच. दगडी तुटक पाय-यांमधून चढून वर गेल्यावर किल्ल्याचं प्रवेशद्वार लागतं.त्याला भगवा रंग दिला आहे.एका मोठ्या खिडकीसारखं ते आहे. तिथून आत जाऊन परत वर जाण्यासाठी दगडी वाट मिळते. तिथेच ब्राह्मी लिपीत काही शिल्प कोरलेली आहे. तिथून मछिंद्र गडाचा नजारा दिसत होता, थोडा विश्राम करुण पुढे निघालो .

दगडी पाय-यांचा पॅच लवकरच पूर्ण करून किल्ल्याच्या माथ्याच्या पायथ्याजवळ म्हणजे मुख्य सुळक्याच्या प्रारंभिक उंचीवर पोचलो. तिथेच गोरक्षनाथांची मुख्य गुंफा आहे.पाच सहा दगडी पायरया उतरून गुंफे मधे पोहचतो समोर जवळच मच्छिंद्रगड दिसत होता..... आणि बाजूला सर्वत्र नितांत सुंदर नजारा आणि दरी..... आसपास सर्वत्र सह्याद्रीचे पर्वत सखे दिसत होते.....इथे बरंच दगडी बांधकाम केलं आहे . गुहा खुप मोटि आहे त्यला पाच सहा दरवाजे आहेत आत नवनाथचे फ़ोटो लावले आहेत, गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत.गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.गुहेतून निघाल्यावर लगेचच एक पाण्याचं टाकं लागतं. त्यातील पाणी हिरव्या रंगाचं दिसत होतं. पण अधिक महत्त्वाची गोष्ट ही होती, की त्याच्या उजव्या बाजूने पायवाट जात होती आणि त्या पायवाटेपासून दरी  जेमतेम दोन फूटभर अंतरावर होतं.... इथून पुढे नजारा व चित्र कसं असणार आहे, ह्याचा अंदाज त्या वाटेवरून येत होता. जवळ पास एक तासांच्या वरती चाल्यमुळे जो थकव आला होता तो इतल्या निसर्गरम्य आणि गोरखनाथंच पदपर्शाने पावन झालेल्या परिसरात नाहिसा झाला . आता मात्र आम्ही विश्राम करायच ठरवल, जवळच्या एका पिण्या योग्य असलेल्या पानी टाके मधून पानी पिऊन थंड झालो ,ग्लुकोन् डि आणि केळी  खाऊन निवाण शांततेत विश्राम केला.आता पुढे मार्गक्रमण करायच ठरवलं .
गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे यावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. पायऱ्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते. सरळ उभा चड आहे .एक पाय पुढे टाकून नंतर पुडच्या  पायरी मध्ये केलेल्या खचाचा आधार घेत घेत तो पॅच  पार झाला. पायरींवर खांचा केल्यामुळे वरती चडन खुपच सहज होतो. माही ला बराच अनुभव असल्याने तो पटापट पुढे जात होता आम्ही दोघे मात्र सावध आधार घेत त्या  गडाच माथा गाठला .आणि सुटकेचा सुस्कारा टाकला . 

गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे.महादेवाचे वर गडापर्यन्त सुखरूप पोहचवला म्हणून आभार मानले.माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघात असा सर्व परिसर न्याहाळता येतो .तिघानि तो  परिसर नजरेत साठवून काढला.आणि फ़ोटो काढले . वरुण खालच्या परिसर स्पष्ट दिसतो अनेक ट्रैकिंग ला आलेले ग्रुप अगदी मुंग्या रांगेने चालेले दिसत होते.आता आम्ही महादेवचा मंदिराला लागुणच बसून आईने दिलेल्या फराला वर ताव मारला आणि थोडा विश्राम करुण परतीच मार्ग पकडला. आता मात्र उतरण्याच् आव्हान आमचा समोर होत.
आता आम्ही हळू हळू उतरन्यास सुरवात केलि सुरवातीला पायरय  उतरताना थोडी भीति वाटत होती नंतर मात्र पायर्यांना  केलेल्या खाचा आणि कातळाचा आधार घेत आम्ही मुख्य गुहेपर्यन्त पोहचलो.तो पॅच पूर्ण करताना खालची दरी अगदी स्पष्ट दिसत होती मनातच ज्याने कोणी खाचा करून ठेवल्या होत्या  त्याचे मनापासून धन्यवाद मनात होतो. जवळपास वीस मिनिटाचा पॅच  नंतर मुखय गुंफेत  पोहचलो . आता गुहेमधे अजुन काही ट्रेक्किंगचे ग्रुप आले होते . पण त्या ग्रुपचे जे काही प्रताप चालु होते ते बघून खरच राग येत होता ,मोठमोठ्या आवाजाचे फटाके ते त्या गुंफे मध्ये लावत होते.अशा सर्व वागणुकी मुळे तिथे असलेल्या प्राणी पक्षांना नक्कीच त्रास होतो फटाक्यंचा ठिनगी मुळे वनवा लागायचा धोका पण नाकरता येत नाही.तिथलि जी नीरव शांतता पूर्णपने भंग झाली होती आम्ही तेथे नथांबता पुढे निगालो, आपण जेवा आशा गड निसर्गाचा सनिधयत जातो तेव्हा  नेहमी लक्षात ठेवावा "  घेऊन यावेत ते  निसर्गाचा कुशीत घालवलेले सुंदर क्षण आणि ठेवून यावेत  फ़क्त पाऊल खुणा "

मुख्य गुहेपासून आता आम्ही नथांबता भराभर दोन्ही हातांच भार कातळावर देऊन  उतरन्यास सुरवात केली वाऱ्याचा वेग खुप कामी झला होता, त्यामुळे उतरून खूप सोप झालं होत . गडाचा दरवाजपर्यन्त पोहचलो तिथे थोडा विश्राम केला बरेच ग्रुप खालूंन येत होते, परत सवधगिरिने दगडाचे पँच पूर्ण करुण आम्ही गडाचा पायथ्याशी सुखरूप पोचलो.

आता पुढचा प्रवास आमच्यासाठी सोपा होता आता फक्त दुपारचा उन्हाचा त्रास होत होता , आणि पाण्याचासाठा सुद्धा संपल होत.अजूनही जमीन व रस्ता दूर दिसत होता. सभोवती झाडी व नजारा. पण दुपारच्या उष्ण झळा लागत होत्या.  असं झालं होतं कधी आम्ही मंदिरात पोहचतो . आता मात्र समीर चा भाषेत पायतल तेल संपल होत,महेंद्र त्यानी केलेल्या रात्रीच्या ट्रेक्किंचा आठवणी सांगत होता  . हळु हळु उतार कमी झाला; पायवाट सोपी होत गेली आणि झपाझप सुकलेल गवत  तुडवत आम्ही  एकदाचे गोरक्षनाथांच्या मंदीरात येऊन पोचलो!!!! समोरच रस्ता दिसत होता. 

मंदीरात थोडा वेळ टेकलो. विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतलं .  तिथेच भगवे वस्त्र परिधान आणि कानातमोठी कुंडल परिधान केलेल्या बाबांनी  पाणी आणून दिल . बराच वेळ तिथेच बसून राहिलो आणि मग खाली गावात पोचलो. हमीद पटेलांच्या येथे लिंबू सरबत घेतलं . तितुनच आम्हला मुरबाड कडे जाणारी बस भेटणार होती बराच वेळ आराम केला. थोड्याच वेळात बस आली आणि आमचा कल्याण कडचा प्रवास सुरु झाला ..... 


किल्याचे नाव: गोरखगड 

जाण्याचा रस्ता: कल्याण-मुरबाड-म्हसे-देहरी
पाहण्यासारखे: रॉक कॅलिंबिन्गचा थरार , मुख्य गोरखनाथांची  गुहा , दाट  अभयारण्य , पाण्याची तीन टाके , टोकावरचे महादेवाचे मंदिर . गोरखगडावरून दिसणारा मछिंद्र गडाचा सुळका . 

श्रेणी:  मध्यम ते कठीण 

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भीमाशंकर

ऊंची :२१३०फिट