Wednesday, August 2, 2017

माहुलीगड - ठाणे जिल्यातील उंच शिखर ( Mahuli Fort )

पावसाळा सुरू झाला की ओढ लागते ती भटकंतीची ..मी समीर ला सांगत होतो कुठेतरी जबरदस्त ट्रेक प्लान करायला, कलावंतीण ट्रेक च्या वेळी तिकोना ठरला होता पण,ऑफिस मध्ये तन्मयने "माहुली किल्याला भेट द्यायची का?" अस विचारलं आणि मग तिकोना चा प्लॅन थेट ठाणे जिल्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या  माहुलीगडावर आला.

मग थोडीशी ऐतिहासिक माहिती गूगल वरून शोधली.किल्याचा इतिहास खूपच रोचक आहे ... 
किल्याची मूळ उभारणी कोणी केली ती माहिती उपलब्द नाही ,शहाजीराजे  निजामशाही चे  संचालक बनल्यावर निजामशाही ला वाचवण्यासाठी त्यांनी माहुलीगडाचा आधार घेतला . १६३५-३६ च्या सुमारास बालशिवाजी आणि माता जिजाऊंना त्यांनी शिवनेरीहून माहुलीला आणले .. पुढे किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला पुढे १६५८ मध्ये शिवरायांनी हा किल्ला मोघलांकडून परत मिळवला .. १६६१ ला परत मुघलांच्या ताब्यात गेला आणि लगेच तो परत जिंकला आणि १६६५ च्या पुरंदर तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले(www.marathimati.net/mahuli-fort/)

अशा ऐतिहासिक किल्याला भेट देण्यासाठी उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. वीकएंड दिवशी माहुलीगडच्या पायथयशी असलेल्या थबठब्यात भिजण्यासाठी तरुणाईची गर्दी होते ,मग गर्दीच्या दिवशीं नको म्हणून  आम्ही गुरुवारी जायचं ठरल .पण,ऑफिसला सुट्टी नसल्याने तन्मय आणि प्रवीण काही येऊ शकले नाही यावेळी समीर आणि महेंद्र सोबत दोघे  घाटकोपरकर  येणार होते समीरचा मोठा भाऊ सचिन आणि त्यांचा मित्र सुरज. 

ठरल्याप्रमाणे भल्या सकाळी उठून आईने दिलेल्या भाकऱ्या,पाऊस जोरदार असल्याने जॅकेट आणि मोबाईलला पिशव्या घेऊन प्रस्थान झाले...घाटकोपर वरून समीरने सांगितलेल्या ६.२५ची ट्रेन बरोबर पकडली. 8 वाजता आसनगावला पोहचलो. सुरज सोडून सर्वाना याआधी भेटलेला मग .सुरजची ओळख समीरने  करून दिली आणि बोलत बोलत पुढे निगालो . स्टेशनलाच एक अण्णा इडली वाला दिसला आणि आत्ता इथेच नष्ट उरकायचा ठरलं, सकाळी लवकर नाश्ता नकरताच निघाल्यामुळे सर्वानीच 'इडली आणि उत्तपावर' मस्त ताव मारला."हल्ली मुंबई मध्ये वडापाव ऐवजी ह्या साऊथ इंडियन इडलीची चव चांगली लागायला लागलीय..."

स्टेशन बाहेर माहुलीगावात जाणाऱ्या रिक्षा मिळतात . ५जणांचे ३००रुपये सांगितले .थोडं खर्चिक होत पण बससाठी बराच वेळ असल्याने रिक्षाकरून पुढे निघालो. नाशिक मुंबई मार्गवरून शहापूर फाट्याला रिक्षावळवून  माहुलीगावात निघालो .  पेट्रोल पंप ला रिक्षा थांबवून  रिक्षा वाल्या काकांनी ऑटोला डिझेल चाखाऊ दिला...पुढे जाताना मानसमंदिर लागत...पुढे पक्का रस्ता कच्चा होत गेला..गावात जाताना गडूळ पाण्यानी जोरदार वेगाने खळखळ करत निघालेली नदी लागली...पुढे आत्ता रस्ता म्हणजे निवळ खडे लागले होते ... गावकऱ्यांची शेतीची लगबग चालू होती ,रस्त्याला लागूनच आदिवासी लोकांची घरे लागतात.घर नाही बोलू शकणार आपण याला पाडे बोलू शकतो.निगडी किंवा सरळ झाडांच्या खांदयने बांधून त्यावर लालमतीचा दिलेला लेप...
                           माहुलीगडाची कमानी 
जवळपास ३०ते ४० मिनिटाच्या ४किलोमीटर च्या प्रवासानंतर आम्ही माहुलीगडच्या पायथयशी पोहचलो...किल्याच्या पायथयशी एका काकांची हॉटेलसारखी टपरी आहे .हसून काकांनी स्वागत केलं..चहाची सर्वांनाच गरज होती गरमागरम चहा झाला ...काकांआम्हला पुढे कस जायचं ते सांगत होते .त्याना वाटलंकि आम्ही वॉटरफल मध्ये जाण्यासाठी आलोय...किल्ल्याच सांगीतल्यावर मग त्यानी गेट मधून जाऊन जवळपास ३ तासची चढाई आहे म्हणून सांगितले..गेल्याच रविवारी माहुली  थबधब्यात मद्यधुंद असलेला कुण्या "पाटलाचा पोरगा मेला" ही बातमीही त्यानी आमच्या कानावर घातली..धबधब्यात गेलात तर काळजीपूर्वक जा असं सांगितलं...मग आम्ही निघताना त्यांचाकडेच जेवणाचा बेत आखून पुढे निघालो .
नदीशेजारच बाप्पाचं सुंदर मंदिर. 
ट्रेकची सुरवातच पाऊस आणि नदीशेजारच्या बाप्पाच्या सुंदर दर्शनाने झाली.अप्रतिम मंदिर आहे...पुढे माहुलीगडाच्या कमानीतून आत प्रवेश केला . या परिसराचा महाराष्ट्रसरकारने पर्यटनस्थळ म्हणून विकास केला आहे...गेट वर प्रत्येकी २५ रुपये द्यावे लागतात, परिसरात किल्याची ऐतिहासिक माहिती देणारे फलक लावलेले आहेत ...कृत्रिम पशु आणि पक्षांचे  पुतळे बसवले आहेत...बऱयापैकी विकास केला आहे इथला.माहुलीच्या या सुरवातीच्या जंगलातून जाणारी ही वाट थेट नदीचा कटापर्यंत जाते पूढे सुंदरसा ब्रिज पार करून आम्ही उजवीकडून किल्याचा वाटेकडे निघालो .दोन फुटणाऱ्या फाट्यावर पर्यटनस्थळचे पाट्या लावले आहेत ..आम्ही आत्ता माहुलीच्या जंगलातली मळलीले पायवाट धरली आणि ट्रेक खऱ्या अर्थाने सुरू झाली घनदाट झाडी असल्याकारणाने आजूबाजूचा परिसर नजरेत येत नव्हता ..पावसाने सुरवातीपासूनच जोर घेतला होता..माही आणि सुरज दोघे पुढे पटापट निघाले  मी, समीर आणि सचिनदादा हळू हळू मार्गक्रमण चालत होतो...जवळपास अर्धा तास चालल्यानंतर घनदाट जंगल संपून खडा चड सुरू होतो...खरा ट्रेक चालू झाला होता...दादाची पहिलीच ट्रेक असल्याने सुरवातीला दमछाक होणे साहजिकच होते.
प्रत्येक किल्यावर अस एक ठिकाण असत जिथे पोहचलो की फोटोग्राफी चा मोह आवरत नाही अशा एक पठारसारखा भाग जेथून संपूर्ण आजूबाजूचा परिसर दिसून येत होता तिथे थोड्या वेळ आराम करून आम्ही निघालो....पण धुक्याची शाल पांघरल्यामुळे जास्त काही दिसत नव्हतं...जरावेळ ठावरून पुढे निघलो...

सह्यन्द्रीची अजस्त्र डोंगररांग आणि त्यावरून कोसळणारे धबधबे 
आमची चढाई माहुलीच्या  दिशेने चालू होती..तानसा अभयारण्य म्हणून ओळखला जाणाराहा परिसर अतिशय सुंदर आहे.जोरदार पाऊस असल्याने धुक्याने पूर्ण शाल पांघरलेली.माहुली गडाची डोंगररांग धुक्यामध्ये हरवलेली होती.आम्ही थोडीशी मध्ये मध्ये विश्रांती घेत भराभर चालत होतो..पाऊस आणि धुक्याचा खेळ बघण्याचं भाग्य आम्हला आजलाभत होत.क्षणात दृष्टीस येणारी डोंगररांग क्षणात येणाऱ्या धुक्यामध्ये नाहीशी होयची ... पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे डोंगररांगमधून जोरदार वेगाने कोसळणारे धबधबे स्पष्ट पने दिसत होते.आणि क्षणात हा सर्व परिसर आमच्याकडे येणाऱ्या धुक्यामध्ये हरवून गेला.सर्व काही भन्नाट!!!कवी बालकवींचा काही ओळी आठवतात... 
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे"

येथे मात्र उन्हा ऐवजी धुकं होत.आत्ता भराभर पाऊले टाकत चालो होतो..मागच्या ट्रेकच्या आठवणींना उजाळा देत पावलं पडत होती . विकटगड सारखाच हा परिसर आहे . वाटेत एक दोन रॉकपॅच आहेत..सर्वानी सांभाळून पार केले..अतिउत्साह इथे टाळावा..जवळपास तीन ते चार किलोमीटरचा खडा चड पार करून आम्ही शिडीच्या वाटेपर्यंत पोहचलो.समोरच्याच एका मोठ्या कातळावर बॅग टाकल्या.  कातलावरून पाठीमागचा  पूर्ण सह्यन्द्रीचा परिसर,धबधबे  आणि समोर माहुलीगडाची तटबंदी आणि त्यावर फडकत असलेला भगवा !!!सर्व नजारा अप्रतिम.. !
                          गडावर जाणारी शिडीची वाट 
पाऊस असल्याने तहानजास्त लागली नव्हती ,आम्हीही पाण्याचा फक्त दोनच बॉटल्स आणल्या होत्या..कातळावर बसून मस्त दोनचार फोटो घेतले...माहि बॉटल घेऊन कड्यावरून थेंबथेंब पडणार पाणी बोटलमध्ये भरत होता..सोबत आणलेली बिस्कीट खाऊन शिडी चढायला सुरू केली..वनविभागाने ही शिडी लावलीय...शिडी नसली असती तर गिर्यारोहनचा अनुभव आणि साहीत्य  असणं आवश्यक आहे..लोखंडी शिडी काळजीपूर्वक पार झाली.. इथे काळजीपूर्वक पाय टाकावेत.. प्रथम दादा आणि नंतर सर्वानीच एके एक करत शिडी पार केली...आणि आम्ही आमच्या भगव्या लक्ष्याकडे पोहचलो..वरून दिसणाऱ्या नजऱ्यामुळे तीनकिलोमीटरचा टप्पा पार करून आल्यानंतरचा थकवा पूर्णपणे कुठे तरी निघून गेला...संपूर्ण परिसर म्हणजे निसर्गच नयनरम्य दृश्य ज्याची तुलना कोणाशीही होऊ  शकत नाही...फोटोग्राफीची हौस येथे भागवून घेतली मग  सर्व आसमंत नजरेत साठवत बराच वेळ येथे आम्ही सर्वांनी घालवला, .

गडावर तर पोहचलो आत्ता पुढे जाण्याचा मार्ग कसा कोणालाच माहीत नव्हत सर्वांनी यू ट्यूब वर बघतलेला महादरवाजा आणि देवड्यांचे अवशेष एवढच कायते माहित .पण नेमकं कुठे जायचं हे कोणालाच ठाऊक नव्हतं मग,एक मळल्या वाटेने पुढे जाण्याचं ठरलं ...डावीकडे जाणारी वाट पकडली आणि थोड्यच वेळात आम्हला पाण्याचं टाक लागलं...आम्ही बरोबर चालतोय याची ती खून होती . त्या टाकाची पाहणीकरत थोडा वेळ घालवला आणि पुढे निघालो . 
महादेवाची पिंड 
थोड्याच वेळात आम्हला भंडारगडाकडे जाणारी पाटी दिसली आम्ही तिकडे परतीच्या वेळी जाण्याचं ठरवून आम्ही महादरवाजाचा शोध घेण्यासाठी पुढे निघालो...थोड्याच वेळात आम्ही महादरवाजाच्या परिसरात पोहचलो..निसरड्या वाटेवरून उतरून शेवटी ज्याचा शोध घेत होतो त्या  एतोहासिक महादरवाजा पर्यंत पोहचलो. होतो .भारीच वाटत होत .सुरवातीला एक पाण्याच टाक लागत पुढे पिपळाच्या झडकली भग्नावस्थेतील महादेवाची पिंड त्याचा अगदी समोर महाराजांची छोटीशी सिहासंन आरूढ मूर्ती लागते ...नतमस्तक होऊन पायऱ्या उतरून महादरवाजकडे आलो..दोनीही बाजूला सैनिकांच्या राहण्याचा देवड्या लागतात..आणि नंतर महादरवाजा ...महादरवाजा हा भग्नावस्थत आहे...गडाची तटबंदी बऱयापैकी शाबूत आहे..महादरवाजाचा पायथयशी दोन शरभ शिल्प लागतात आणि एक कामळासारखं शिल्प आढळत...पायऱ्या उतरून नंतर आम्ही बुरुजावरून कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला.. हा सर्व ऐतिहासिक वारसा अनुभवताना सर्वचजण दंग झाले होते...
महादरवाजा 
शरभ शिल्प
 बराच वेळ घालवल्यावर आम्ही पळसगडाच्या शोधात निघालो .आमची मोहीम  उत्तरेकडे वळवली ...पाऊस आत्ता जोरदार चालू झाला होता.वाटेतील ओढे वेग घेऊन वाहू लागले होते.झुडप मानेपर्यंत आली होती.झुडपांमुळे थोडा अंधार झल्यासारखं वाटत होत ..दोनीबाजूला कार्वीच जंगल आणि समोर दिसणारी मळवट वाट भराभर पार करत होतो ...महिच्या पाटी आम्ही झपाट्याने चालत होतो...बराच वेळ चालून ही काहीच भेटत नव्हतं .. थोडी निराशाच झाली मग सर्वांच्या अनुमतीने मग परत फिरायचा ठरलं...धोधो पावसातून  पळसगड शोधण्यासाठी केलेली हि पायपीट खूपच थरारक होती..कधीही नविसरता येणारा अनुभव होता...
अश्वारूढ छत्रपती महाराजांची मूर्ती 

आम्ही परत महादरवाजकडे पोहचलो तर ७ते ८ मुलांचा ग्रुप किल्याची पाहिनी करण्यासाठी आला होता आम्ही काहीच नविचारता पुढे निघालो .चालून खूप थकवा आला होता पाऊसाने विश्रन्ती घेतली होती आम्ही हि सोबत आणलेली बिस्केट फस्त केली. आणि बिस्किटाचे पॉकेट्स पार्ट खिशात टाकून प्रवास चालू ..आता माहुली , पळसगड दोन टोकानंतर आता भंडारगडाकडे मोहीम वळवायची होती. भंडारदर च्या खालचा वाटेकडे पायपीट चालू केली , पाऊसाने परत जोर धरला होता..वाटेमध्ये गुडग्या एव्हडं पाणी असलेलं ओढे हातांची साखळी करत पार केले ..दाट झाडी असल्याने सावधगिरीने खाली वाकून काटेरी झुडपं पार करावी लागत होती.थोड्याच वेळात आम्ही दोन पडक्या वीरगळी पर्यंत पोहचलो पुढे पडलेल्या वाड्याचे अवशेष लागतात .पाऊले पटापट पडत होती सौन्दर्याने नटलेल्या अफाट जंगलातून आम्ही एका पडलेल्या महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहचलो.. मंदिरासमोरच नजर पोहचणार नाही एव्हडा मोठं तळ आहे.सर्व काही बघून थोडं पुढेपर्यंत गेलो मग पुढे काहीच नाही असल्याचा समज करून आम्हीपरतीच्या मार्गाला लागलो ...

आम्हला वाटेमध्ये परत तीच मुलं  भेटली त्यानां  विचारणा केली ,कुठून आलो असविचारल्यावर "हिंदी मे बोलो "
असं बोला मग कळलं कि मध्यप्रदेश वरून किल्याला भेट द्यायला ते आले होते . खरच कुतूहल वाटलं त्यांचं . एकीकडे हि मंडळी एवढ्या लांबून किल्ला बघायला आली होती आणि एकीकडे आमची मराठी तरुणाई मध्यधुंद स्थितीत धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत होती.
निसर्गच्या कुशीतले काही निवांत क्षण 
आम्ही किल्यावरच्या बऱ्याच गोष्टी पाहण्याचा राहून गेल्या होत्या पण वेळेअभावी परत मागे फिरण्याचा निर्णय सर्वानी घेतला .पाऊले पटापट खालच्या मार्गाला लागली .पाऊस ओसरला होता किल्यावर जातांना धुक्यात हरवलेला डोंगरमाळ आणि त्यावरचे पांढरेशुब्र धबधबे आत्ता स्पष्ट दिसत होती निसर्गाच्या अजस्त्र रूपाचा अनुभव आम्ही घेत होतो .सर्वजण शांतपणे नबोलता चालत होते .. पाय अगदी मोडकळीस आले होते उतरताना नेहमीच चढण्यापेक्षा जास्त त्रास होतो...चालताना बरच काही मनात चाक होत बऱ्याच गोष्टी बघायच्या राहून गेल्या होत्या पण, ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी केलेली थरारक आणि जबरदस्त भटकंती , भग्नावस्थेत असलेला महादरवाजा , मंदिराचे अवशेष सर्व काही मनाचा एका कोपऱ्यात घर करून गेलं होत,,!
बराच वेळाच्या पायपिटीनंतर आम्ही टपरीवर पोहचलो जेवण तयार होत पोटात भुकेने  कावळे ओरडत होते . काकांनी जेवण वाढलं ..गरमागरम भाकऱ्या , वांगयची भाजी ,मटण आणि वारणभातावर सर्वानीच ताव मारला .. .संगीतल्याप्रमााने रिक्षा वाले काका आम्हला घायला आले होते..परतीचा प्रवास सुरु झाला... 

आजचा दिवस अगदी सार्थकी लागला होता..ना फोनची रिंग,ना गाड्यांचे आवाज,  निरव शांतता...सर्व काही भारीच...!!!




किल्याचे नाव - माहुलीगड 

प्रकार - गिरीदुर्ग

उंची-2815

श्रेणी - मध्यम ते कठीण

जाण्याचा मार्ग -आसनगाव रेल्वेस्टेशन - माहुलीगाव 

बघण्यासारखं  -  प्राचीन पाण्याची टाके , महादरवाजा , पहारेकार्यनच्या देवड्या , भडारगडावरच भग्नावस्थेतील महादेव मंदिर , समोरचा तलाव पुढे गेल्यावर जांभळाच्या राय आणि नंतर लागते ती माहुली आणि भदारगडामधली खिंड आणि त्यामधला कल्याण दरवाजा , वरून दिसणारा अलंग ,मलंग,हरिश्चंद्रगडाची डोंगररांग

धन्यवाद !
अंकुश सावंत
+९१ ९७६८१५३११४

4 comments:

  1. Ekdum ullekhniy lekhan Mitra...thanks for giving such a lovely memory...God bless you...Keep writing...

    ReplyDelete
  2. KAdak... masta anubhav ahe.. mi pan lavkarach jaycha vichar kartoy

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! नक्की visit दे आणि निसर्गाचेसुंदर रूप अनुभवताना निसर्गाला तू कुठे दुकवनर नाही याची नक्की काळजी घेशील तू याची मला खात्री आहे ☺��

      Delete